Submitted by सुप्रिया जाधव. on 9 October, 2020 - 14:59
जागरण केले जरी आयुष्यभर मी
लावले रिपिटेडली तरिही गजर मी
घाम टिपण्याचा निखळ उद्देश होता
पसरला नव्हता तुझ्यापाशी पदर मी
गर्व नाही वाटला केव्हा कशाचा
मात्र नाही ठेवली माझी कदर मी
गावचा नव्हताच माझ्या तो तसाही
मानले माझे जरी त्याचे शहर मी
वादळांच्या घालते डोळ्यात डोळे
झुकवली आहे कुठे माझी नजर मी ?
छाटुनी फांद्या किती छाटाल माझ्या ?
गाडले आहे स्वतःला खोलवर मी
मागतो आहे उतारा खुद्द मृत्यू
जीवनाचे पचवले इतके जहर मी
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! अप्रतिम
वा! अप्रतिम
ओळखी कित्येक केल्या मी
ओळखी कित्येक केल्या मी दुजांच्या
मात्र नाही ठेवली माझी खबर मी
आणिल्या लंकेहुनी स्वर्णी विटा परि
बांधिली माझ्या घरी माझी कबर मी
सुप्रियाचे पाहुनी पुढचे रचोनी
चूक का, हर्पा म्हणे, केली अशी मी?
वाह! अप्रतिम
वाह!
अप्रतिम
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी