आर्टिकल १५ चित्रपट आणि हाथरस

Submitted by हस्तर on 7 October, 2020 - 07:53

आर्टिकल १५ चित्रपट आणि हाथरस

आर्टिकल १५ चा रिव्यू माबो वर वाचला
त्यातले एक वाक्य परत टाकावेसे वाटते "यापुढे सिक्स पॅक वाले , 10 गुंडांना लोळवणारे , कुत्तों का झुंड कितना भी बड़ा हो उनके लिए एक शेर ही काफी होता है , आता माझी सटकली - असले नाटकी संवाद असलेले पोलीस पडद्यावर कधीही बघवणार नाहीत

यात मुख्य नायकाने कोणाला चापट पण मारलेली नाहीये..."

चित्रपट तूंनळी वर होता ,आता काढलाय तिथून
चित्रपटातून थोडा बदाऊ आणि उना प्रकरण का संदर्भ आहे असे वाचलेय
चित्रपट मध्ये एक सीन आहे पोलीस ऑफिसर सरळ पोस्ट मार्टेम वाल्या डॉक्टर ला सांगतो बलात्कार झाला नाही असे लिहा ते बघुन हाथ् रस आठवले

बरेच लोकांनी विरोध केला कि एका जातीवर डूख धरलाय पण हिरो पण त्याच जातीचा आहे

मुख्य म्हणे चित्रपट रिऍलिस्टिक आहे ,आपल्या हाताखालचे पासून वरिष्ठ सगळ्यांशी लढून हिरो न्याय मिळवतो

ह्यात झीशान अयुब चे पात्र चंद्रशेखर वर बेतलेले आहे ,त्याचा एन्काऊंटर का केला हे कलीअर नाही

उत्तरदायित्वास नकार :- हाथर्स मध्ये नेमके काय झाले हे पोलीस रिपोर्ट व शासन ठरवेल .मी फक्त योग योग दर्शवू इच्छितो मीडिया रिपोर्ट अनुसार

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

+1
पहिल्याच दिवशी आठवण झाली होती, पण प्रत्यक्षात सगळीकडे हिरो नसतो हे लक्षात आल्याने फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या

देशाची अवस्था अराजतेकडे जात आहे.
गुन्हा करणार आणि गुन्ह्याच्या बळी ठरलेल्या व्यक्तीची जाती वरून,धर्मा वरून विभागणी केली जाते आणि त्या मध्ये मूर्ख मीडिया,सरकार ,प्रशासन,जनता सहभागी असते त्या देशाला काहीच भवितव्य नाही.

गुन्हा करणार आणि गुन्ह्याच्या बळी ठरलेल्या व्यक्तीची जाती वरून,धर्मा वरून विभागणी केली जाते
>>Submitted by Hemant 33 on 7 October, 2020 - 23:11>>
>>>>>>
हे खूपच चुकीचे आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या गोष्टी वाढतच चालल्या आहेत.

बरेच लोकांनी विरोध केला कि एका जातीवर डूख धरलाय पण हिरो पण त्याच जातीचा आहे//

मी हा चित्रपट पाहिला नाही पण हा बदायू रेप केस वर आधारित आहे ना? त्यात रेपिस्ट्स यादव होते, चित्रपटातही यादवच दाखवले आहेत ना? हिरो ब्राह्मण आहे, राईट? पण मग ब्राह्मण जातीवर डूख धरलाय असं का लिहिलंय?

हाथरस ट्रायल हल्लेखोरामुळे खंडित.

हाथरस ट्रायल मध्ये एका वकिलाने आणि सोबत मॉबने (ज्यात वकील होते.) न्यायालयात घुसखोरी केली आणि पीडितेच्या भावाला आणि वकीलाला धमकावण्याचा प्रयत्न केला. हे पाहून डिस्ट्रिक्ट कोर्टाने न्यायालयात पोलीस बंदोबस्त केला.

ह्या घटनेची सत्यासत्यता तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.