देशात निर्भया प्रकरण घडले नी देशात आक्रोश सुरु झाला सत्ताधारी बँकफुटवर गेले तर विरोधकांनी स्वार्थाची पोळी भाजुन घेतली ,शासनाने बलात्काराच्या शिक्षेत वाढ केली ईतकेच नव्हेतर कायद्याने बलत्काराची व्याख्याही बदलली फासट ट्रँक कोर्टात केस चालली नी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली पण शिक्षा अमलात आणण्यासाठी न्यायालयात लढा व कित्येक वर्षांचा कालावधी लागला कायदा कडक झाला पण बलात्कारांची संख्या घटली नाही वाढतच राहिली आताही हथरस प्रकरणात एक निर्भया बळी पडली आणि या प्रकरणात तर पोलिसांनी शव रात्री जाळुन टाकत री पोस्ट मार्टमचा मार्गच बंद करुन टाकला राज्यकर्ते बदलले पण मानसिकता तिच राहीली आज या प्रकरणाला जातीय रंग दिला जात आहे पोलिसांना बळीचा बकरा बनवून शासनकर्ते स्वताची गेलेली लाज झाकण्यासाठी प्रयत्नशील असतीलच विरोधकही यावर राजकारणाची पोळी भाजतील पण पिडीतेला न्याय मिळेल कि प्रकरण दाबले जाईल हा खरा प्रश्न आहे।
हथरसची निर्भया ।
Submitted by ashokkabade67@g... on 6 October, 2020 - 12:09
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा