फ्रे-नांग बीच.. क्राबी-सयाम

Submitted by अ'निरु'द्ध on 4 October, 2020 - 16:15

फ्रे-नांग बीच.. क्राबी-सयाम

मुखपृष्ठ : लाँग टेल बोट

सयामच्या क्राबी बेटावरून एक चार बेटांची सफर स्पीड बोटीमधून करायचा योग आला.
त्यापैकी पहिला बीच म्हणजे फ्रे-नांग बीच.

या पहिल्याच बेटावर जाताना बोटीची सफर, समुद्रप्रवास, सुंदर बीच, तिथे असलेल्या गुहा, चुनखडीचे डोंगर, समुद्राची मस्त निळाई आणि हिरवाई, मधे मधे बेटांचे उभे राहिलेले दगडी सुळके, त्यांच्यावरची झाडंझुडपं आणि आजूबाजूला हे सगळं वातावरण एन्जॉय करणारे पर्यटक असा सगळा एक छान आणि मस्त माहौल होता.

ही सफर करताना काही नितांतसुंदर जागा पहायला मिळाल्या, सुंदर अनुभव घेता आले आणि काही बऱ्यापैकी छायाचित्रंही मिळाली…
त्यातली काही छायाचित्र तुमच्यासाठी...

प्रचि ०१ : फ्रे-नांग बीचला जाणाऱ्या बोटी सुटतात त्या ह्या आओनँग बोट धक्क्यावरुन..

फ्रे-नांग बीचला पोहोचण्यासाठी या धक्क्यावरुन पुढे साधारण पणे वीस मिनिटांचा बोटीचा प्रवास आहे.

आमची स्पीड बोट साधारणपणे 25 जणांची होती आणि हेच प्रवासी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 'चार बेटं यात्रा' करेपर्यंत कायम राहणार होते.

प्रचि ०२ : हे वाटेत लागलेलं को-रँग नाॅक बेट किंवा को-रँग नाॅक रॉक…

प्रचि ०३ : समोर दिसतोय तो फ्रे-नांग बीच…

प्रचि ०४ : फ्रे-नांग बीच आणि मागे चुनखडीच्या टेकड्या...

प्रचि ०५ : मगाचचा को-रँग नाॅक रॉक आता बीच वरून…

प्रचि ०६ : फ्रे-नांग बीचचा कोपरा. इथे जवळच एक मस्त केव्ह आहे…

प्रचि ०७ :

प्रचि ०८ :

प्रचि ०९ : को-रँग नाॅक राॅकचा क्लोजप..

प्रचि १० : समुद्रामध्ये कयाकिंग..

प्रचि ११ : जवळचा रिसॉर्ट मधल्या बीच चेअर्स…

प्रचि १२ : बीच रिसॉर्ट…

प्रचि १३ : बाहेर कितीही उन्ह तळपत असलं तरी अशा सावलीत डोळ्यांना ही थंडावा मिळतो आणि मनाला ही..

प्रचि १४ : दोन झाडाच्या फ्रेममधून को-रँग नाॅक रॉक...

प्रचि १५ : फ्रे-नांग बीचचे हे प्रिन्सेस केव्हज जवळचे दुसरे टोक...

प्रचि १६ : हिरव्यापिवळ्या पानांच्या दाट सावलीत :
बीच वरचे घर कौलारू….
आणि नेमका त्या पानांच्या रंगसंगतीचा स्विमिंगसूट परिधान केलेली ललना..

प्रचि १७ : हि मुखपृष्ठामधली लॉन्ग टेल बोट...
ह्या बोटीमधून प्रवास करणं, आजूबाजूच्या बेटांना भेटी देणं, हा एक अनोखा अनुभव असतो आणि ह्या लाँग टेल बोटींच्या प्रवासाची इकडे बरीच क्रेझ आहे. आणि त्यात मजा तर आहेच..

प्रचि १८ : बाय-बाय को-रँग नाॅक रॉक…
आणि अर्थातच बाय बाय फ्रे-नांग बीच..

हा छोटासा डोंगर, खडक किंवा बेट चमकणाऱ्या Plankton/ Algae यासाठीही प्रसिद्ध आहे. midnight swim, night snorkelling, plankton sunset tours अशा संध्याकाळनंतरच्या बऱ्याच टुर्स इथे असतात.
समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे हा खडक खालून झिजल्यामुळे त्याच्या खूप जवळ गेलं तर अंगावर येणारे Overhangs दिसतात.
त्यामुळे याच्या जवळून, खालून बोटीने जाऊन किंवा स्वतः कयाकिंग करत संपूर्ण बेटाभोवती फेऱ्या मारणारे बरेचजण दिसतात.

या बीचवरुन निघाल्यावर इथून आमचा पुढच्या तीन बेटांचा प्रवास चालू झाला..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरूदा,
झक्कास!!!!!
कोविड परिस्थितीत घरबसल्या पर्यटन उडवल्याबद्दल धन्यवाद.

सगळे फोटो एकसोएक सरस आहे. माझ्या लॅपटॉपवर मायबोली बॅन आहे, नाहीतर मोठया स्क्रीनवर डोळ्यांना थंडावा दिला असता जरा...

<<<टारझन कुठे राहतो तुम्ही जाता तेव्हा?>>>

तेव्हा टारझन नव्हता. तो आत्ता जस्ट तीन वर्षांचा झालाय.
आणि खरं तर गेल्या तीन वर्षात आम्ही सगळे एकत्र असे कुठे गेलोच नाही. कोणीतरी एक घरी असतंच..
आणि सगळे आरण्यकला जातो तेव्हा तो ही असतो सोबत हुंदडायला..

<<तो कौलारु घराचा फोटो अफलातुन आलाय!>>
मलाही ते घर आणि आजूबाजूचा माहौल प्रचंड आवडला..

<<माझ्या लॅपटॉपवर मायबोली बॅन आहे, नाहीतर मोठया स्क्रीनवर डोळ्यांना थंडावा दिला असता जरा...>>

अहो त्यात काय... "Phra Nang Beach - Krabi" (Images) असा सर्च द्या आणि गारेगार व्हा..

चिन्नु, रुपाली विशे-पाटील, श्रवु... धन्यवाद..

श्रवु, हा छोटासा डोंगर, खडक किंवा बेट चमकणाऱ्या Plankton/ Algae यासाठीही प्रसिद्ध आहे. midnight swim, night snorkelling, plankton sunset tours अशा संध्याकाळनंतरच्या बऱ्याच टुर्स इथे असतात.
समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे हा खडक खालून झिजल्यामुळे त्याच्या खूप जवळ गेलं तर अंगावर येणारे Overhangs दिसतात.
त्यामुळे याच्या जवळून, खालून बोटीने जाऊन किंवा स्वतः कयाकिंग करत संपूर्ण बेटाभोवती फेऱ्या मारणारे बरेचजण दिसतात.

झकास !!