बोलका अबोला

Submitted by गंधकुटी on 21 September, 2020 - 10:22

बोलला तू ना काही
ऐकले मी ही नाही
अबोला मात्र आपला
गूज उलगडत राही

क्षणात बरसे रुसवा
क्षणात जिव्हाळा मनाचा
बोलका अबोला तुझा
खेळ रिमझिम श्रावणाचा

न बोलता सांगून गेला
सांगावा तुझा अबोला
दारचा प्राजक्त माझ्या
बहरून आज आला

तुझे निरोप फुले देती
तुझेच गीत झरे गाती
अबोल तू असशी जरी
तू माझा सदा रे सांगाती.

न बोलताही काही
अर्थ जाणवे अंतरी
बोलका हा अबोला
वाढवी प्रेमाची खुमारी

Group content visibility: 
Use group defaults