
अनंत काळ ज्या फुलाचा सुगंध किंवा घमघमाट आपल्या मनात दरवळत राहतो त्या फुलाला नाव म्हणूनच अनंत असे दिले असावे.
काही व्यक्ती अष्टपैलू नसतात मात्र त्यांचा एकच गुण इतका भक्कम असतो की आपलं त्यांच्यातील इतर गोष्टींकडे लक्षच जात नाही. अनंताचही काहीस असंच आहे ह्या फुलांचा सुगंध इतका हृदयस्पर्शी असतो की आपलं ह्या फुलाच्या इतर गोष्टींकडे (रंग,रूप,इ) लक्षच जात नाही.
हे फूलझाड जमिनीत लावण्यासाठी उत्तम आहे. परंतु कुंडीत लावल्यावरही फुलांचा बहर छान मिळतो. कुंडी कमीत कमी मध्यम आकाराची असावी (१२"-१४" किमान) या झाडाची ३-४ महिन्यातून एकदा काटछाट (pruining) करावी. अनंताला कीड-बुरशी अगदी क्वचितच लागते. त्यामुळे या झाडाची तितकीशी काळजी घ्यावी लागत नाही. ह्या झाडाला direct sunlight आणि नियमित पाणी देणे गरजेचे आहे. २०-२५ दिवसांतून एकदा खत द्यावे.
बाल्कनीत विराजमान, शुभ्र कांती असलेले अनंताचे झाड संध्याकाळी बाल्कनीत चहा पिताना त्याच्या फुलाच्या हृदयस्पर्शी सुगंधाची अनुभूती देऊन जाते. अनंताच्या फुलांचा सुगंधित अनुभव काही औरच !!
छान फूल असतं हे. आमच्याकडे
छान फूल असतं हे. आमच्याकडे होत हे झाड पूर्वी. पण रिडेव्हलपमेंटमध्ये गेलं
खूप आवडतो मला अनंताचा सुगंध.
खूप आवडतो मला अनंताचा सुगंध.
कसं लावायचं? फांदी लावून जगते का?
@वावे
@वावे
ह्याच्या बीया मिळतात की नाही हे नाही माहित मला. मी फांदी लावली होती.
@जाई.
@जाई.
होय. खरंच... (छान फूल असतं हे)
खूप छान लेखमाला आहे फुलांवर..
खूप छान लेखमाला आहे फुलांवर.. शाळेत असताना जाणा - येणाच्या वाटेवर अनंताच फुलांनी बहरलेलं झाड लागायचं.. मग काय आम्ही सर्व मैत्रिणी झाडाकडे धाव घ्यायचो आणि दोन वेण्यात फुले माळून डोक्याची शोभा वाढवायचो. अनंताच्या पांढऱ्या शुभ्र आणि सुवासिक फुलांकडे पाहील ना की खरचं खूप सात्विक पणा जाणवतो फुलांमध्ये...
ठेविले अनंते तैसेचि रहावे.
ठेविले अनंते तैसेचि रहावे. असेच असावे या फुलाच्या बाबतीतसुद्धा. घरात येणाऱ्या थोड्या सुर्यप्रकाशात सुद्धा वाढते हे झाड. घरातील वातावरण सुगंधित करण्यास हातभार.
Mazyakade kahi वर्षांपूर्वी
Mazyakade kahi वर्षांपूर्वी ह्याचे कलम होते.कुंडीत लावलेल्या foot-didfoot झाडाला एकेक फूल यायचे एकदा एकदम 3 फुले आली, तर खूप छान वाटले होते.झाड
मरायच्या आधी तर 11 फुले आली होती.
सुरेख लिहीलयं. अनंत आभार .
सुरेख लिहीलयं. अनंत आभार
.
सुवास विसरले आहे ह्याची आठवण आली. आता बघते कुठे रोप मिळतं का !!
रूपालीचा प्रतिसाद आवडला.
>>>मरायच्या आधी तर 11 फुले
>>>मरायच्या आधी तर 11 फुले आली होती.>>> अॅट ए टाइम ११? वाह!!! काय सुगंधी झालं असेल घर.
खरेच खूप सुगंधी फूल असते
खरेच खूप सुगंधी फूल असते अनंताचे. मी 2 वर्षांपूर्वी नर्सरी मधून आणले होते.. वर्षभर छान राहिले, बऱ्याच कळ्या गळून पडायच्या. थोडी फुले मिळाली, पण सुगंधी अनुभूती देऊन गेली. मग ते झाड मरुनच गेले. खूप प्रयत्न केले, पण नाही जगले. यावेळी पावसाळ्यात पुन्हा एक रोप आणलेय नर्सरी मधून. कळ्या आल्यात बऱ्याच, अजून फूल नाही आले. खूप उत्सुकतेने वाट पाहतोय आम्ही सर्वजण , त्या फुलण्याची.
लहानपणी अंगणात होतं अनंताचं
लहानपणी अंगणात होतं अनंताचं झाड. सुवास खूप छान असायचा. रुपाली मी पण सेम , दोन बो मध्ये दोन फुल खोचून शाळेत जायचे .
अनंत फारच आवडतो. सुवास, रंग,
अनंत फारच आवडतो. सुवास, रंग, पाकळ्यंचा पोत सगळंच. पण हे झाड बर्यापैकी डिमान्डिंग आहे. अनंताला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवले की हा लगेच रुसणार, मग पानं काय पिवळी पडतात, कळ्या काय गळतात. प्रकाश हवा पण डायरेक्ट ऊन नको, पाणी हवं पण एवढंच की माती ओलसर राहिली पाहिजे. याच्या पानांना पण आर्द्रता हवी असते, मग झाडाला पाणी घालून झालं की पानांवर शिंपडा. त्याला एकट्यानं करमत नाही म्हणून इतर झाडांच्या संगतीत लावा. आतापर्यंत २-३ तरी रोपं आणली आणि मारली आहेत. आता एवढ्यात एका मैत्रिणीनं विंटर हार्डी रोप दिलं आहे, ते शिपिंग-हॅन्डलिंगच्या शॉकमधून सावरून आता छान वाढतंय आणि २-३ फुलं पण येऊन गेली. एक बोनसाय सुद्धा घेतलं आहे. त्याला भरपूर पानं आलीत पण फुलांच्या बाबतीत ढिम्म आहे पण जगलं आहे हेच खूप.
अनंताला कोकणात चटक चांदणी
अनंताला कोकणात चटक चांदणी म्हणतात.(मीच 4 पिढ्यान् पासून मुंबईकर.तरी कोकण म्हटले की गहिवर येतो) आता म्हणतात की नाही ते माहित नाही.अगदी समर्पक नाव आहे.
खूप वर्षांपूर्वी एका नातेवाईकांकडे गेले असता त्यांनी बरीच अनंताची झाडे घरासभोवार लावली होती.सर्वच्या सर्व झाडे फुलांनी डवरली होती.फार सुरेख दृश्य होते.एकही फूल तोडावेसे वाटले नाही.शाळकरी वयात खूप हौस होती फुलांची.
अनंत म्हणजे लोभावणारा सुगंध.
अनंत म्हणजे लोभावणारा सुगंध. माझ्या एका दिराचे नाव अनंत आहे. त्यामुळे अनंत आवडतो, माझा लाडका वगैरे जरा जपून बोलावं लागतं.
:
जरा जपून बोलावं लागतं.......
जरा जपून बोलावं लागतं.......
वरती प्रतिसादामध्ये अजून फूले
वरती प्रतिसादामध्ये अजून फूले आले नाहीत, असे म्हटले होते. काल एक फूल आले अखेर. तेही इतके मोठे, टपोरे, की दुरून पहिले, तर गुलाबाचे फूल च वाटावे ! त्याच्या त्या देखण्या रुपड्याने आणि अवर्णनीय सुवासाने इतके दिवस प्रतीक्षा करावी लागल्याचा आमचा कृतक कोप कुठल्या कुठे पळून गेला !
2)
किती छान!
किती छान!
सुंदर!
सुंदर!