व्हॅक्युम क्लीनर घ्यावा की नाही? घ्यावा तर कोणता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 September, 2020 - 15:03

अखंड बालपण झाडू मारण्यात गेले आहे. ती सुद्धा खास आमची कोकणातली झाडू. दर गणपतीला न चुकता खाजे आणि लाडूंसोबत झाडूही गावातून घेऊन यायचो. व्हॅकुम क्लीनर वगैरे हे आमच्याकडे मोठ्या लोकांचे फॅड (चोचले) समजले जायचे. गेले चार वर्षे मोठ्या घरात राहूनही ते केवळ भाड्याचे आहे म्हणून व्हॅक्युम क्लीनर घ्यायचा कधी विचारही केला नाही. जो आता नवीन घरात करत आहोत.

तर नवीन गाडी घेताना जसे सेकंडहॅण्ड वा साध्या गाडीवर हात साफ करावा तसे आधी साधाच घेऊ म्हटले. त्या हिशोबाने युरेका फोर्ब्सच्या वेबसाईटवर एक साडेचार (कि साडेपाच?) हजाराचा चेक केला. Forbes quick clean DX vacuum cleaner (वरचा फोटो याचाच)

जमलं तर जमलं नाहीतर गेले पैसे निर्वातात असे समजून घ्यायचा ठरवले. तोच बायकोचे कोणीतरी कान भरले, भाई लेना है तो अच्छाही लेना है... वरना अच्छाही लेना है

झालं ! आज एक माणूस आमच्या घरात १५ हजार २९० रुपयांच्या व्हॅक्युम क्लीनरचा डेमो देऊन गेला. Euro clean WD X2 Vacuum Cleaner
सोफ्यातील कचरा, कीबोर्डमधील धूळ, घरात सांडलेले (त्यानेच सांडवलेले) पाणी, भिंतीवरची जळमटे, छतावरचा पंखा, अगदी मच्छरजाळीही छान साफ करून दाखवली.

भाई लेना है तो अच्छाही लेना है मधील "अच्छा" हाच यावर आमच्या घरात एक मताने शिक्कामोर्तब झाले. (ते एक मत अर्थात माझ्या बायकोचेच)

पण हा वॅक्युम क्लीनर सर्वात पहिले माझा खिसा साफ करणार असल्याने म्हटले चार जाणकार लोकांकडे चौकशी करूया. म्हणून हा धागाप्रपंच !

धन्यवाद ईन ॲडव्हान्स Happy

१) व्हॅक्युम क्लीनरबाबत सर्वात पहिला जो बदनामीकारक मजकूर वाचनात येतो तो म्हणजे नव्याचे नऊ दिवस. त्यानंतर तो घरात पडून राहतो.
हे खरे आहे का? असल्यास तो घरात पडून राहणारा व्हॅक्युम क्लीनर वरीलपैकी पाचसहा हजारावाला असतो की पंधरा हजारावाला? की दोन्ही?
आधीच वर्षानुवर्षे काही फूड प्रोसेसर, टोस्टर, ज्युसर वगैरे मशीनी घरात पडून आहेत. त्यात भर नकोय.

२) घरगुती वापरासाठी खरेच महागडा व्हॅक्युम क्लीनर घेणे गरजेचा असतो का साधाही चालतो? कि तो पंधरा हजारावाला जो मला महागडा वाटतोय तोच साधा वा नॉर्मल आहे?

३) वॅक्युम क्लीनर २०-२५ वर्षे चालेल असे मोठ्या उत्साहात तो डेमोमॅन म्हणाला खरे. पण खरेच ईतका काळ टिकतो का? की न वापरल्याने अडगळीत जातो आणि म्हणून टिकतो?

४) वॅक्युम क्लीनर घरकामाला येणारया आंटीला वापरायला द्यावा का? की त्यांचे झाडू पोछा त्यांना करू द्यावे आणि आपण अध्येमध्ये सुट्टीच्या दिवशी तो बाहेर काढून घर साफ करून घ्यावे?

५) घराचा स्वच्छ्ता ईंडेक्स उत्तम राखायला वॅक्युम क्लीनर वापराची साधारण वारंवारता काय असते? काय असावी? दर आठवड्याला, दोन आठवड्यांनी, महिन्याला, सणासुदीला वगैरे...

६) वॅक्युम क्लीनर वापराचे काही साईड ईफेक्ट आहेत का? जसे की घरात कचरा करायची टेंडेंन्सी वाढते वगैरे. लाईक, होऊ दे कचरा. वॅक्युम क्लीनर आहे घरचा.

तुर्तास ईतकेच. ईतर शंका प्रतिसादात (कोणी सिरीअस्स्ली दिल्यास (आणि ते प्लीज द्या)) मिटवतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेम्स बॉन्ड कुठला शब्द बदललाय?

असो
आजही ट्रेनिण्ग द्यायला तोच डेमोमॅन आलेला.
त्यादिवशी सारे कसे झपझप साफ होते हे दाखवून आम्हाला खुश केले होते.
आज एकेक अटेचमेंटची जोडाजोड कशी करायची हे बोअरींग काम समजावले.
हुशार असतात हे लोकं म्हणजे. त्या दिवशी यातलं काहीच दाखवले नाही जे बघून आम्ही डगमगून जाऊ

असो
बायकोच्या चेहरयावर मात्र हम होंगे कामयाब टाईप्स आत्मविश्वास दिसला. त्यामुळे मी तिलाच ती ट्रेनिंग एंजॉय करू दिली. मी त्या व्हॅक्लीच्या आवाजाने घाबरणारया माझ्या पोराला कडेवर उचलून आयपीएल बघत बसलो. ट्रेनिंग घेतलीच नाही तर कामही करावे लगणार नाही हा दुसरा (खरे तर पहिलाच) सुप्त हेतू Happy

ट्रेनिंग घेतलीच नाही तर कामही करावे लगणार नाही हा दुसरा (खरे तर पहिलाच) सुप्त हेतू>>>>>> माझाही हाच हेतू होता.२५ वर्षांपूर्वी नको नको म्हणत असतानाही ६ हजारांचा झाडू घरी आला.म्हटले तुझे तूच पहा.१-२ वेळा वापरला. नंतर ठेऊन दिला.

ऋन्मेष, व्हॅक्लीचे मॉडेल मस्त आहे.

एकदम फर्स्टक्लास !
नोव्हेंबरला मुलाचा आणि नुकतेच मार्चला मुलीचा बड्डे झाला..
तेव्हा छान वापर झाला Happy

नाहीतर दरवेळी मेला तो पंप हाताने पुढेमागे करत जीव जायचा फुगे फुगवताना..

आम्ही Xiomi cha वापरतो..3 वर्ष झाली घेऊन..mopping ची फॅसिलिटी नव्हती तेव्हा..आताच्या मॉडेल ना असेल...उत्तम अनुभव आहे... सुखं सुख म्हणतात ते काय हे कळलं रोबोट घेतल्यावर...आयुष्यातला एक सर्वोत्तम निर्णय होता रोबोट घेण्याचा

आमच्या़कडे इकोव्हॅक्सचा टी८ आयव्ही आहे. मॉपिंगपण आहे त्यात. छान आहे.
सांडलेल्याचे मोठे डाग असतील तर मात्र निघत नाही पण फरशी क्लिन वाटते.

अच्छा... म्हणजे फुगे फुगवण्यापलिकडे साफसफाई साठी वापर नाही होत तर.
>>>>>
सध्या स्विमिंगची क्रेझ आहे फार घरात. तर स्विमिंग रिंग फुगवायलाही वापरतो.
(प्रिंटरच्या धाग्यावर विषय निघाला तेव्हा हि बहुमूल्य माहिती ईथे अपडेट करावीशी वाटली)

आणि पण उपयोग आम्ही केलेला फुटबॉल की आणखी कुठला बॉल फुगवायला, छोटी बाळं अंघोळ करतात तो टब फुगवायला.

मी हे कधी लिहीन असं वाटलं नव्हतं Lol
पण आम्ही दीड वर्षापूर्वी Agaro कंपनीचा हँडी व्हॅक्यूम क्लीनर घेतला आहे. https://www.amazon.in/AGARO-800-Watt-Handheld-Cleaner-Durable/dp/B07SRM5...
सोफा, डायनिंग टेबलच्या खुर्च्या (त्यांना कुशन्स आहेत), अजून एक खिडकीजवळ बसण्याची जागा आहे तिथली गादी, मुलांच्या खुर्च्या हे सगळं त्याने मस्त स्वच्छ होतं. खाचाखोचा छान स्वच्छ होतात. स्लायडिंग खिडक्यांच्या खाचाही स्वच्छ करतो. हलका आहे. वायर लांब आहे त्यामुळे सोपं पडतं. त्यामुळे 'व्हॅक्यूम क्लीनर लावायचा' या विचाराने 'बापरे' असं होत नाही हे महत्त्वाचं.
बराच वेळ चालवला की जरा गरम होतो. मग थोडा वेळ थांबून परत सुरू करतो. बऱ्यापैकी नियमितपणे वापर होतोय.

Pages