"आपली ऑर्डर काय आहे सर?"
"एक चहा."
"ओके सर. कसला चहा सर?"
"म्हणजे?"
"म्हणजे आसाम टी की दार्जिलिंग टी सर?"
"अं.... मेक इट आसाम."
"ओके सर. सर लिप्टन की ब्रुक बॉण्ड?"
"जेम्स बॉण्ड आहे काय?"
"नो सर. त्याचा भाऊच आहे. ब्रुक बॉण्ड."
बर बर.. आणि तो शेन बॉण्ड?
तो व्हॅगाबॉण्डचा नातू आहे सर.
"ओके ओके.. बर.. लिप्टन घे."
"चहा कोरा की दूधवाला सर?"
"ऑफकोर्स दूध घातलेला! हा हा!"
"ओके सर. सर दूध गायीचं की म्हशीचं सर?"
"अं? गायीचं चांगलं लागतं?"
"यूअर चॉईस सर."
"ओके. गायीचं."
"ओके सर. जर्सी गाय की न्यू जर्सी गाय सर?"
"न्यू जर्सी? ते तर अमेरिकन स्टेट आहे ना?"
"हो सर. आम्ही देशी गायीला न्यू जर्सी म्हणतो सर."
"ओह...के...! जाऊ दे. म्हशीचं दूध घे."
"ओके सर. सर म्हैस जाफराबादी, सुरती की म्हैसाणा सर?"
"यमाच्या म्हशीचं मिळेल काय?"
"सॉरी सर. यम कडे रेडा असतो सर. रेडा दूध देत नाही सर."
"ओ ओ... खरंच की. बरं मग जाफराबादी घे."
"ओके सर. सर चहा गोड की अगोड सर?"
"अरे.. गोडच कर. मी डायबेटिक नाही. हाहा!"
"ओके सर. सर साखर घालू की गूळ सर?"
"खडीसाखर घालता येते का?"
"नाही सर. सर ती लवकर मेल्ट होत नाही सर."
"बर. साखर घाल. साखर पांढरी की काळी विचारू नकोस."
"ओके सर. सर कप मध्ये आणू की किटलीत सर?"
"कपात आण रे बाबा.."
"ओके सर. सर कप प्लॅस्टिक की पोर्सलेन?"
"कुठलाही आण पण लवकर आण."
"ओके सर. सर ट्रे मध्ये आणू की हातात घेऊन येऊ?"
"हे बघ. तो चहा तूच पी."
ओके सर, कसा पीऊ? चमच्याने, स्टाॅने का सरळ कप तोंडाला लावून?"
" बशी घे, त्यात ओत, फुर्र कर आणि पी."
"अरे सर का उठताय? कुठे चाललात आपण सर?"
"अरे माझी किल्ली गाडीलाच राहिली. तू तो चहा पिऊन टाक, फुर्र. मी चहाशी ब्रेक अप केलाय, बाय...!"
....
परेश रावळ आठवला जुदाई
परेश रावळ आठवला जुदाई चित्रपटातला.
(No subject)
"हे बघ. तो चहा तूच पी." >>
"हे बघ. तो चहा तूच पी." >> पुढे असं नाही विचारलं का त्याने “ओके सप, कसा पीऊ? चमच्याने, स्टाॅने का सरळ कप तोंडाला लावून“![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हॅगाबॉण्डचा नातू...
व्हॅगाबॉण्डचा नातू...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
.
जर्सी गाय की न्यू जर्सी गाय.
मोठा "चहा"टळ निघाला की वेटर
छान लिहिलयं.
हा हा हा हा , छान लिहीलंय
हा हा हा हा , छान लिहीलंय
(No subject)
@ म्हाळसा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ओके सप, कसा पीऊ? चमच्याने, स्टाॅने का सरळ कप तोंडाला लावून“ Happy
>>>>>
माझ्याही डोक्यात अगदी हेच आलेले. फ्लोमध्ये हेच बोलायला हवे होते. पण तो बोलला नाही. याचा अर्थ तो मेला ढोंग करत होता, येडा बनून पेढा खात होता
मार खायची वेळ आणण्यापेक्षा
मार खायची वेळ आणण्यापेक्षा आता आवरलेले बरे असाही विचार केला असेल वेटरने.
नावात टर आहे म्हणून वेटरने
नावात टर आहे म्हणून वेटरने उडवलेली दिसत्येय
@म्हाळसा, तुम्ही सांगितल्या
@म्हाळसा, तुम्ही सांगितल्या प्रमाणे बदल केला आहे. छान सुचवलेत!
आता आणतोय का देऊ एक ठेऊन....
आता आणतोय का देऊ एक ठेऊन.... असं वाटलं.. :0
गम्मत आहे अगदी. मला जेव्हा
गम्मत आहे अगदी. मला जेव्हा चहा करायची इच्छा नसते पण अहोना हवा असतो तेव्हा मी डिट्टो असे प्रश्न विचारते लेखातले जवळजवळ 60 टक्के ते पण हातात मोबाईल नाहीतर पुस्तक असताना. यात माझी अजून अडिशन असते ती म्हणजे साखर हवी म्हणल्यावर -- किती चमचे ? 1 चमचा म्हणल्यावर कसला चमचा ? साखरेच्या डब्यातला, नाश्त्याचा की भाजीआमटीचा ?
छान लिहिलाय.
(No subject)
भाजीआमटीचा म्हणजे पळी असेल ना
भाजीआमटीचा म्हणजे पळी असेल ना?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुमच्या कथेतील ग्राहक 'फुसका'
तुमच्या कथेतील ग्राहक 'फुसका' निघाला!!! ग्राहक असा हवा!!!
https://www.youtube.com/watch?v=npPwoJpwedQ
भारीए
गार पडला.
गार पडला.
भाजीआमटीचा म्हणजे पळी असेल ना
भाजीआमटीचा म्हणजे पळी असेल ना? Lol <<< हो
:
मस्तच, एखाद्याला अगदी चहाची
मस्तच, एखाद्याला अगदी चहाची तल्लफ आली असेल तर तो वेटर खरंच मार खाईल.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
म्हाळसा, छान सुचवलं,
वर्णिता, Lol, 1 कप चहाला आमटीच्या पळीने साखर
<<<भाजीआमटीचा म्हणजे पळी असेल
<<<भाजीआमटीचा म्हणजे पळी असेल ना? Lol <<< हो.>>>
आपण आचमन करतो ती पळी असते ना? तुम्ही भाजी आमटीसाठी पळी म्हणालात म्हणून एक शंका आली. तुम्हाला पळी ऐवजी डाव म्हणायचे आहे काय? तुम्ही एक कप चहाला एक पळी साखर टाकत असाल तर ते फार कमी आहे असे वाटते. पण पळी म्हणजेच डाव असेल तर मग चहा फार फार गोड होईल. पळी, मग चमचा, मग डाव हीच चढती भाजणी आहे ना? कृपया शंका समाधान करावे.
बिथोवन आमच्या घरी आणि गावी
बिथोवन आमच्या घरी आणि गावी पळी म्हणजे ताम्हण - पळी मधली आचमनाची पळी. वरण - आमटीचा डाव.
पण नंतर कळलं की इतर ठिकाणी डावाला सुद्धा पळीच म्हणतात. माझी बायको नागपूरची त्यांच्याकडे डावाला पळी म्हणतात. लग्न झाल्यावर एकदा आम्ही बाहेरून येताना तिला आठवलं की पळी घ्यायची आहे, कुठले दुकान माहीत असेल तर घेऊन चल. मग मी तिला घराजवळ असणाऱ्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात घेऊन गेलो तर ती म्हणाली इथे नाही, चांगलं भांड्याचं दुकान बघ. मला वाटले इथे ती येऊन गेली असेल आणि इथे पळी उपलब्ध नसेल म्हणुन भांड्यांच्या दुकानात गेलो. तिथे तिने डाव आणि चमचे घेतले आणि बिल कितना हुआ विचारले. मी तिला आठवण करून दिली की ज्यासाठी आलो ती पळी घ्यायची राहिली ना. ती डाव दाखवून म्हणाली, ही काय. तेव्हा मला कळले की डावालाही पळी म्हणतात.
बिथोवन, मानव यांनी बरोबर
बिथोवन, मानव यांनी बरोबर सांगितलंय. जनरली आमटी भाजीचा डाव असतो आणि आचमन करताना ताम्हण ,भांड, पळी म्हणतो. कधीकधी भाजी पण पळीवाढ करायची असं म्हणतो ना त्यातली पण पळी म्हणता येईल. किंवा फोडणी करायची लोखंडी पळी असते .
:
तर मग चहा फार फार गोड होईल. <<< मी ते गमतीत म्हणते जेणेकरून त्यांनी म्हणावं या प्रश्नोत्तरांपेक्षा माझा मी चहा करून पितो.
चहा टाक गं जरा असं म्हणल्यावर मी सुरवात तर कुठला चहा डीप डीप वाला की गाळून वाला , नन्तर कशातून गाळू, स्टीलच्या गाळणीतून, प्लास्टकच्या गाळणीतून की टपरीवर असतं तसं फडक्यातून गाळू अशी करते
चहा टाक गं जरा असं म्हणल्यावर
चहा टाक गं जरा असं म्हणल्यावर >>
पुढल्या वेळी: "कशाला टाकू? खराब झालाय का?" अशी सुरवात करून बघा.
मस्तच, एखाद्याला अगदी चहाची
मस्तच, एखाद्याला अगदी चहाची तल्लफ आली असेल तर तो वेटर खरंच मार खाईल.
>>>
हो ना
विचार करतोय हे कोणी खरेच दारूच्या ऑर्डरला केले तर काय होईल त्याचे
मस्तच, एखाद्याला अगदी चहाची
मस्तच, एखाद्याला अगदी चहाची तल्लफ आली असेल तर तो वेटर खरंच मार खाईल.
>>>
हो ना
विचार करतोय हे कोणी खरेच दारूच्या ऑर्डरला केले तर काय होईल त्याचे
<<<चहा टाक गं जरा असं
<<<चहा टाक गं जरा असं म्हणल्यावर >>
पुढल्या वेळी: "कशाला टाकू? खराब झालाय का?" अशी सुरवात करून बघा.>>> हाहाहा...!
पण डावाला पळी नागपूर वाले म्हणत असतील तर वर्णिता या नागपूरच्या असाव्यात. तसं असेल तर नागपुरात चहा टाकत नाहीत, चहा मांडतात असं ऐकलं आहे.
आमच्याकडे चहा ठेवतात...
आमच्याकडे चहा ठेवतात...
पुढल्या वेळी: "कशाला टाकू?
पुढल्या वेळी: "कशाला टाकू? खराब झालाय का?" अशी सुरवात करून बघा. <<< भारी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझा नवरा आधीच मोडेस्ट होऊन
माझा नवरा आधीच मोडेस्ट होऊन विचारतो. चहा करशील का ?
आमच्या कडे 'चाय बनावू क्या?'
आमच्या कडे 'चाय बनावू क्या?' असतं.
टाका, ठेवा, मांडा, बनवा, करा
टाका, ठेवा, मांडा, बनवा, करा यातील कोणतीही क्रिया असू देत.
परंतु ह्या क्रियेच्या शेवटी गरमा गरम, वाफाळता एन्ड प्रॉडक्ट समोर आला कि अहाहा ...
Pages