कुर्त्याच्या बाह्या ज्या वापरल्या गेल्या नाहीत पण कापड चांगले आहे म्हणून टाकूनही द्याव्याशा वाटल्या नाहीत. अशाच बाह्यांचे कापड वापरून मी मास्क हातशिलाईने शिवला आहे.
बाह्यांचे कापड एकावर एक ठेऊन माझ्याकडे वापरात असलेला मास्क त्यावर ठेऊन पेनाने तसा आकार काढला. मग थोडी जागासोडून तो कापला.
अश्याच मापाने दुसरे कापड कापून घेतले.
त्यानंतर गोलाईचा भाग शिऊन दोन्ही कापडांना (बाह्या आणि अस्तर) एकावर एक ठेवून त्याचे काठ एकसारखे करून शिवले.
आतल्या बाजूने शिवताना...
मग बाहेरचे कापड आतल्या बाजूस ढकलून त्यात इलॅस्टिक जोडून शिलाई केली.
अचूक मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ बघू शकता... https://youtu.be/u4SfTm38GIk
पहिली बाजू...
आणि ही दुसरी बाजू...
खालच्या फोटोत मापासाठी घेतलेला आणि मी शिवलेला असे दोन्ही मास्क.....
या स्पर्धेच्या निमित्ताने मास्क शिवायचा प्रयत्न केला आणि जमलाही.
आता वर्षभर मास्क वापरायचेच आहेत तर ड्रेसला मॅचिंग मास्क शिवता येतील
सुंदर झालेत, आयडिया छान.
सुंदर झालेत, आयडिया छान.
खूप छान झालेत. टाकाऊतून टिकाऊ
खूप छान झालेत. टाकाऊतून टिकाऊ पण!
छानच की!! मॅचिंगसाठी शुभेच्छा
छानच की!! मॅचिंगसाठी शुभेच्छा
https://youtu.be/6zn7O3FiWtw?t=5247
(No subject)
सुंदर शिवलेत मास्क
सुंदर शिवलेत मास्क
मास्क शिवायचा प्रयत्न छान
मास्क शिवायचा प्रयत्न छान जमलाय...
सुपर्ब! हे खरेच विकु शकता...
सुपर्ब! हे खरेच विकु शकता... डिझाईनर मास्क .
आत कार्बन फिल्टर घालू शकता का?
मस्त झालाय मास्क
मस्त झालाय मास्क
मस्तच
मस्तच
छानेय आय्ड्या
छानेय आय्ड्या
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
आत कार्बन फिल्टर घालू शकता का?>>> कडेने थोडी फट ठेवली तर फिल्टर आत घालता येउ शकेल.
छान शिवलेत.
छान शिवलेत.