लागणारे जिन्नस
टोकरीसाठी मैदा, जिरे, ओवा आणि गरम तेल पाणी
रगडा पॅटिस साठी
पांढरे वाटणे (भिजवलेला), बटाटा, लाल तिखट, जिरे पूड, धने पूड, अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, २ कांदे, २ टोमॅटो, पोहे व तांदूळ वाटून,
चटणी साठी
पुदिना, कोथिंबीर, मिरची, लिंबू, चिंच, खजूर, गूळ,
मीठ, चाट मसाला, फरसाण, पापडी, शेव, दही
क्रमवार पाककृती
रगडा
पांढरे वाटाणे आणि बटाटे कूकरमध्ये शिजवून घ्यावे. मी ४ शिट्ट्या झाल्या की बटाटा काढून घेतला आणि वाटाणा हळद आणि मीठ घालून अजून ४ शिट्ट्या होइपर्यंत शिजू दिला. आता फोडणी साठी बारीक चिरलेला कांदा कढईत कढईत २-३ चमचे तेल गरम करा. चिरलेला कांदा तेलात परतून घ्या. त्यात अद्रक लसूण पेस्ट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, लाल तिखट आणि टोमॅटो टाकले. त्यात शिजवलेले वाटाणे घालावे. ७ ते ८ मिनिटे शिजवून घ्या.
पॅटिस
पॅटिस साठी शिजवलेला बटाटा मॅश करून घेतला. क्रिस्पीपणा साठी पोहे आणि तांदूळ वाटून त्यात मिक्स करून घेतले. मिश्रणात अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरे पूड, धने पूड, लाल तिखट आणि चवी नुसार मीठ टाकून त्याचे पॅटिस बनवून घेतले.
पुदिना चटणी :- १/२ कप पुदीना पाने, १/२ कप कोथिंबीर, १/४ फुटाणे डाळ, २ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १/४ जिरा पावडर, १/२ टिस्पून लिंबाचा रस, चवीपुरते मिठ हे सर्व मिक्सर मध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्या. गरजेनुसार थोडे थोडे पाणी टाका.
गोड चटणी
खजूर आणि चिंच थोडा वेळ भिजत घालावे. मग एका भांड्यात गूळ, चिंच आणि खजूर थोडं पाणी टाकून मंद आचेवर उकळावे. चिंचेचा कलर कमी झाला की ते गाळून दुसऱ्या भांड्यात काढा. चिंचेचा कलर बदले पर्यंत रिपीट टेलीकास्ट करत राहा. आता तयार चटणी मध्ये लाल तिखट आणि जिरे पूड टाकून घ्या. चटणी तयार.
एवढा करायचा कंटाळा असल्यास बाजारात खजूर इमली चटणी मिळते. १ वाटी साखरेच्या पाकात १ ते २ चमचे ही चटणी टाकायची. मग त्यात जिरे पूड आणि लाल तिखट टाकलं की रेडी.
टोकरी/कटोरी
मैद्यात जिरे, ओवा आणि गरम तेल टाकून मळून घ्या. मळताना गरज वाटेल तसं पाणी टाका. आता एक पातळ चपाती लाटून घ्या. त्याला काटा चमचा ने छिद्र करा. एक साधारण मध्यम आकाराची वाटी घ्या. त्याला बाहेरून तेल लावून ती चपाती लावून घ्या.
आणि वाटी तेलात सोडा.
एकदा कटोरी भाजू लागली की वाटी आपोआप बाहेर येईल ती चिमट्याने काढून घ्या. नंतर कटोरी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
आता कटोरित पॅटिस चुरून टाका. त्यावर रगडा टाका. मग फरसाण, पापडी, चिरलेला कांदा, टोमॅटो टाका. मग चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ टाका. मग पुदिना चटणी, गोड चटणी आणि फेटलेल दही टाकून घ्या. वरून शेव टाका. कटोरी चाट रेडी.
फोटो काढायला जरा उशीरच झाला. रगडा तर संपला होता. चटण्या थोड्या थोड्या होत्या त्या टाकल्यात.
ह्याला बनवायला खूप वेळ लागतो पण खाऊन ५ मिनिटात होतो
पाककृती स्पर्धा ३ - {फास्टफूड स्पर्धा} - टोकरी/कटोरी चाट
Submitted by Aaradhya on 4 September, 2020 - 06:32
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी दिसतेय कटोरी चाट!!
भारी दिसतेय कटोरी चाट!! पॅटिसचा फोटो कसला खरपूस दिसतोय. मस्त!
टोकरी तळणं कितपत सोपं असतं? तेल उडतं का आजूबाजूला?
दिसतंय मस्त..
दिसतंय मस्त..
कटोरीला मेहनत आहे.. मला वाटते वाटी पेक्षा लाकडाचा खोलगट डाव असेल तर.. हात जरा लांब ठेवता येईल तेलापासून..
धन्यवाद
धन्यवाद
टोकरी तळणं कितपत सोपं असतं? तेल उडतं का आजूबाजूला? >> फार सोप्पय फक्त पेशन्स हवे. गॅस बारीक ठेवायचा आणि वाटी थोडी बाहेर आली की सुरीने चिकटलेला भाग वेगळा करूनवाटी चिमट्याने अलगद उचलून बाजूला ठेवायची.
छान दिसतेयं कटोरी चाट...
छान दिसतेयं कटोरी चाट...
Yummy
Yummy
माझी अत्यंत आवडती dish आहे.
रस्त्याच्या कडेला उभे राहून 4 मैत्रिणी मिळून पोटभरून चाट खाणे हे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरवायचं आहे
छान आहे हे
छान आहे हे
करुन बघेन....नव्हे नव्हे..
करुन बघेन....नव्हे नव्हे...करुन खाऊ
रस्त्याच्या कडेला उभे राहून 4
रस्त्याच्या कडेला उभे राहून 4 मैत्रिणी मिळून पोटभरून चाट खाणे हे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरवायचं आहे >> हे दिवस पण येतील लवकरच
करुन बघेन....नव्हे नव्हे...करुन खाऊ >> कराल तेव्हा इकडे फोटो शेअर करायला विसरू नका
धन्यवाद सर्वांना.
जबरदस्त तोंपासू पदार्थ.
जबरदस्त तोंपासू पदार्थ.
शेवटचा फोटो पण मोहक आहे.
आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी घरी करायचो तेव्हा बास्केट पूर्ण बटाट्याच्या थोड्या कोरड्या केलेल्या किसाला तळून बनवायचो.एकंदर श्रमाच्या मानाने पदार्थ 5 जणात खूप पटकन संपायचा.त्यामुळे बनवणे बंद केले
आता परत एकदा करून बघेन नीट या रेसिपी ने.
मस्त दिसतोय प्रकार. कटोर्या
मस्त दिसतोय प्रकार. कटोर्या आधी केलेल्या असतील तरच फास्ट फूड.
मस्तच कटोऱ्या. चाट ते चाटच !!
मस्तच कटोऱ्या. चाट ते चाटच !! मस्त रेसिपी आणि पोटभरीची वाटतेयं. छान.

मी पण एकदा केल्या होत्या पण बिन पॅटिसच्या आणि रगड्या ऐवजी वाफवलेले मोड आलेले मूग मटकी हेबर्स किचन रेसिपी. कटोरी तशी अवघड नाही छिद्रे आरपार गेली नाही तर पुरी सारखी फुगते मात्र. माझी एक तशीच झाली मगं छिद्राचे महत्त्व कळले.
छान आहे की. प्रेझेन्टेबल व
छान आहे की. प्रेझेन्टेबल व सारण पौष्टिक भरले की पौष्टिक.
भारी!
भारी!
मस्त! तोंडाला पाणी सुटले.
मस्त! तोंडाला पाणी सुटले.
अत्यंत आवडता प्रकार. शेवटचा
अत्यंत आवडता प्रकार. शेवटचा फोटो फारच तोंपासु.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
अगदी तोंपासु रेसीपी आहे !
अगदी तोंपासु रेसीपी आहे !
भारी रेसिपी!
भारी रेसिपी!
छान दिसतेयं कटोरी चाट...>>>>>
छान दिसतेयं कटोरी चाट...>>>>> +!१.
मस्त!
मस्त!
मस्त आहे, फोटोही छान.
मस्त आहे, फोटोही छान.
मस्त!
मस्त!
भारी
भारी
सही!
सही!
केली होती टोकरी चाट
केली होती टोकरी चाट
टोकर्या तळणं थोडं रिस्की वाटलं, पण जमलं, टोकरी चवीला पण छान झाली होती!

१.
२.
३.

यम्मी दिसतेय टोकरी चाट
यम्मी दिसतेय टोकरी चाट
वाह
वाह
दोन नंबरचा फोटो काय दिसतोय.
कुरकुरीत सोनेरी ब्राऊन बास्केट आणि त्यात चाट
कुरकुरीत सोनेरी ब्राऊन
कुरकुरीत सोनेरी ब्राऊन बास्केट आणि त्यात चाट >> टोकरी कुरकुरीत झाली होती, चिंचेची चटणी त्यात मुरलेली, त्यामुळेच मस्त लागली.
काय आयडिया आहेत.
काय आयडिया आहेत. मला खुपच आवडली...
(किमान दोन मतं द्यायला प्रवानगी हवी मतदानात.)
विनीता-झकास, तुम्ही एकदम जोशात... मस्त.
धन्यवाद झंपी रगडा पॅटीस
धन्यवाद झंपी
रगडा पॅटीस आवडतोच, यावेळी मुद्दाम टोकरीसाठी बनवला. मेहनत सफल झाली.
Pages