Submitted by निशिकांत on 4 September, 2020 - 00:07
वर्ख माझ्या चेहर्याचा आज कोणी काढला?
वास्तवचा घोट कडवा का असा हा पाजला?
लूट झाली मंदिरी तो पंचनामा वाचला
"रात्र सारी चोर जागे देव होता झोपला"
अंतरीच्या वेदना मी का जगाला दाखवू?
दु:ख ज्याने ओळखावे तोच परका भासला
हासणे छदमी तयाचे पाहता रागावले
एक ठोकर मारली अन् आरसा मी फोडला
टाळण्या नजरा विषारी चेहरा झाकू किती?
बंडखोरी शस्त्र उरले खूप गुदमर सोसला
वाट अवघड चालते मी पण जमाना का असा
पाय माझा घसरण्याची वाट पाहू लागला?
वाढदिवशी चार भिंती थंड होत्या सोबती
पण शुभेच्छांचा उबारा फेसबुकवर लाभला
चोर बडव्यांच्या घरातुन धूर सोन्याचा निघे
एक वारी मी चुकवता देव भारी कोपला
अंध ते "निशिकांत", त्यांनी तेज नाही पाहिले
भास एका कवडशाचा सूर्य त्यांना वाटला
निशिकांत देशपांडे, पुणे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंतरीच्या वेदना मी का जगाला
अंतरीच्या वेदना मी का जगाला दाखवू?
दु:ख ज्याने ओळखावे तोच परका भासला....
अप्रतिम....