मोदक...
अत्यंत जिव्हाळ्याचा पदार्थ..
स्पर्धा जाहीर झाल्यापासुन वेगळं काय करता येइल बरं असं म्हणुन बराच विचार केला पण मोदक म्हणजे ...उकडीचेच...
नारळ, गुळ, वेलची, तांदुळ पिठीची उकड हे कॉम्बिनेशन सोडुन दुसरं काही सुचेचना...
त्यामुळे सादर आहेत यावेळी बाप्पाला प्रसाद म्हणुन केलेले हे मोदक.
आपले पारंपारीक उकडीचेच मोदक फक्त सारण थोडं वेगळं बनवायचा प्रयत्न केलाय.
तर कृती..
साहित्य :
दोन नारळ खवणुन ( साधारण ४.५ ते ५ वाट्या होतात)
२ वाट्या गुळ
१ वाटी मिल्कमेड
२-३ चमचे बदाम- काजु भरड (ऑप्शनल)
वेलची पुड
केसर
४ वाट्या तांदुळ पिठी
४ वाट्या पाणी
२ चमचे तुप
चवीपुरते मीठ
कृती:
सारण : नारळाचा चव आणि गुळ एकत्र करुन १ तासभर ठेवायचं. मग बारीक गॅस वर शिजवायला ठेवायचे. गुळ विरघळत आला की १ वाटी भरुन मिल्कमेड घालायचे. सुरवातीली मिश्रण चिकट झालं असं वाटेल पण घाबरायचं नाही. हळुहळु होईल कमी. मिल्क्मेड घातलं की साधारण ५ मिनिटात मिश्रण घट्ट होत जाइल. मिल्कमेड मुळे मिश्रण ओलसर राहतं. कोरडं पडत नाही. आणि एकदम क्रीमी लागतं सारणं. शेवटी काजु बदाम पुड आणि केशर काड्या घालुन गॅस बंद करायचा. हे सारण नुसतं खायला खुप मस्त लागतं त्यामुळे अदल्या दिवशी केलं असेल तर घरच्यांपासुन लपवुन ठेवा नाहीतर मोदकात घालायला शिल्लक राहाणारच नाही
उकडः
थोडं तांदुळ पिठी बद्दल - उत्तम न चिरणारी उकड निघण्यासाठी ताजी आणि फक्त ताजीच पिठी हवी. मी पुण्यात अग्रज ची पिठी वापरते आहे गेले काही वर्ष. अतिशय सुंदर उकड निघते आणि मोदक संध्याकाळपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहातो.
उकड करायची पद्धत सेमच पण तरी माझ्या आईची एक खास टीप.
उकड करताना पाणी गॅस वर ठेवलं की पाणी उकळायची वाट बघायची नाही. पाण्याला तळाशी थोडे बुडबुडे आलेले दिसले की लगेच पिठी पाण्यात टाकायची.आणि भराभर हलवुन झाकण ठाकायचे. २-३ वाफा दिल्या की उकड चकचकीत दिसायला लागते. एक छोटी गोळी हातावर घेउन बघितली की कळतच उकड शिजलेली.( अर्थात हा थोडा सरावाचा भाग आहे पण जमतं हळुहळु)
तेल पाण्याचा हात घेउन उकड छान मळुन घेतली की झालंच. पुढचं सगळ्यांना माहित आहे.:-)...लिंबाएवढा गोळा, पारी, मुखर्या करणे, मोदक तयार करुन वाफवणे ई ई ई...
आणि हो मोदक वाफवायला ठेवायच्या आधी प्रत्येक मोदकावर एक केशर काडी जरूर घाला...मोदक वाफवताना त्याचा सुरेख केशरी रंग मोदकावर उतरतो आणि एकदम छान पारीजातका सारखे दिसणारे मोदक तयार होतात
बाप्पाचा प्रसाद आहे...छान तर होणारच...:-)
गणपती बाप्पा मोरया
सारण थोडेसे पांढरट दिसेल.
कलाकुसर
तय्यार
पारीजातकाची फुलेच जणु
नैवेद्य
मोदक खाउन बाप्पा खुश
मस्त! तोंपासू
मस्त! तोंपासू
सुंदर
सुंदर
हे केशर वाले मोदक मी सगळीकडे पहिल्यांदाच यावर्षी पाहतेय
मागच्या वर्षे पर्यंत नुसतेच पांढरे मोदक फेसबुक आणि इथे बघत होते.
केशर छान दिसतं पांढर्या वर.
मस्त. पारी किती सुंदर दिसतेय.
मस्त. पारी किती सुंदर दिसतेय.
अन्य एका कृतीत पाणी रटारट उकळल्यावर पिठी घालायची आहे. इथे तळाशी बुडबुडे आल्यावर.
प्रत्येकाची पद्धत निराळी.
मस्त, खूप सुरेख दिसत आहेत
मस्त, खूप सुरेख दिसत आहेत मोदक!
हे केशर वाले मोदक मी सगळीकडे
हे केशर वाले मोदक मी सगळीकडे पहिल्यांदाच यावर्षी पाहतेय
मागच्या वर्षे पर्यंत नुसतेच पांढरे मोदक फेसबुक आणि इथे बघत होते.>>>>>> अगदी अगदी.माझी पहिली सुरुवात मधुराज किचनने झाली.मलाही करायचे होते.पण मोदकासाठी खाली बसल्यावर केशराची आठवण झाली.मग राहूनच गेले.
सॉरी फॉर अवांतर. मोदक मस्तच झाले आहेत.केशराची एकेक काडी मोदकावर लावणे पेशन्सचे काम आहे.
भरतना धन्यवाद.त्यांच्या पिठीच्या प्रतिसादामुळे नीट वाचले गेले.
सुरेख दिसताहेत मोदक!
सुरेख दिसताहेत मोदक!
"मिल्कमेड"च्या सारणाचे
"मिल्कमेड"च्या सारणाचे "पारंपारिक" मोदक वाचून
मस्त!!
मस्त!!
केशराच्या काडीसाठी अनु +१
मोदक मस्त!
मोदक मस्त!
मस्त!!
मस्त!!
मस्तच! गुळगुळीत दिस्तायत
मस्तच! गुळगुळीत दिस्तायत एकदम
हे केशर लावलेले मोदक पाहिले
हे केशर लावलेले मोदक पाहिले नि प्राजक्ताच्या फुलांची आठवण आली. सुंदर झाले!
(नाहीतर एरवी "मोदकाला मेकअपची गरज नाही" गटात... फारच "गार्निश"ची हौस असेल तर तुळशीपत्र ठेवा. शास्त्र असतं ते!)
बंगाली साबा बनवतात असे मिश्रण
बंगाली साबा बनवतात असे मिश्रण, आणि पारी सेम असते, त्यांच्यात सगळीकडे दूध, मावा घालायची पद्धत आहे. छान लागते.
दूध पुली म्हणतात.
छान
छान
एक सांगायचे राहिले, मुखर्या
एक सांगायचे राहिले, मुखर्या हा शब्द खुपच कमीजणांकडून
एकलाय, अगदी कोकणातल्या आजीची आठवण झाली.
कमी लोकांना माहिती असतो हा शब्द.
मस्त दिसतायत मोदक
मस्त दिसतायत मोदक
वाह सुरेख झालेत मोदक.
वाह सुरेख झालेत मोदक.
दोन्ही गणपतीबाप्पा अप्रतिम आणि बाप्पा आणि समोर मोदक ठेवलेत तो फोटोही अप्रतिम.
सर्वांचे प्रतिसादासाठी खुप
सर्वांचे प्रतिसादासाठी खुप खुप आभार.
अन्य एका कृतीत पाणी रटारट उकळल्यावर पिठी घालायची आहे. इथे तळाशी बुडबुडे आल्यावर.
प्रत्येकाची पद्धत निराळी. >> हो खरय @भरत...आई चं लॉजिक नाही माहिती नक्की...पण मला वाटतं एखादी वाफ जास्त द्यावी लागत असेल या प्रकारात..आणि पाणी रटरट उकळले की पाण्याची वाफ होउन प्रमाण थोडे का होइना बदलत असावे असे मला वाटते
केशराची एकेक काडी मोदकावर लावणे पेशन्सचे काम आहे. >> हो @देवकी , ते काम मुलीला दिलं होतं ..त्यामुळे जमलं
कारण मोदक वळता वळता तेला पाण्याच्या हाताने केशर काडी लावायला अवघड जाते.
मुखर्या हा शब्द खुपच कमीजणांकडून एकलाय, >> होय @झंपी..बरेच जणांना पटकन कळत नाही...मला खुप आवडतो हा शब्द.
माझी आजी अगदी न चुकता, असे
माझी आजी अगदी न चुकता, असे ठेवणीतले शब्द वापरायची, तिची आठवण झाली.
तोंपासू
तोंपासू
मस्त दिसत आहेत मोदक नाजूक
मस्त दिसत आहेत मोदक नाजूक नाजूक.
माझ्याच्याने असे लहान मोदक वळलेच जात नाहीत.
सुंदर नाजूक मोदक.
सुंदर नाजूक मोदक.
बाप्पा अन मोदक दोन्ही पाहून
बाप्पा अन मोदक दोन्ही पाहून मन प्रसन्न झाले
<<<हे केशर वाले मोदक मी सगळीकडे पहिल्यांदाच यावर्षी पाहतेय
मागच्या वर्षे पर्यंत नुसतेच पांढरे मोदक फेसबुक आणि इथे बघत होते.
केशर छान दिसतं पांढर्या वर.>>> +१११
मला केसर चव आवडत नाही, पण बघायला छान वाटतायेत