"हस्तकला स्पर्धा-{शिवणकाम}-{sariva}" प्रवेशिका क्र.1

Submitted by sariva on 28 August, 2020 - 20:37

मास्क

वैशिष्ट्ये

1तीन पदरी(3 layered)

2 हातशिलाई करून बनवलेला

3 सुती

साहित्य: ड्रॉइंग पेपर,पेन्सिल,कात्री,मोजपट्टी-पॅटर्न काढून घेण्यासाठी,सुती कापड,सुई-दोरा,इलॅस्टिक,इस्त्री इ.
कृती:

1)27सेमी×20सेमी आकाराच्या ड्रॉइंग पेपरवर हवा असलेला पॅटर्न कापून घेतला.

2)मग त्याच्या सहाय्याने त्याच आकाराचे कापडाचे 3 तुकडे कापून घेतले.

3)ते तुकडे एकमेकावर अशा पध्दतीने जुळवून घेतले,की वरच्या व खालच्या तुकड्याची उलट बाजू बाहेरच्या बाजूस राहील.

4) साधारण 4 सेमी जागा सोडून जुळवलेल्या कापडाच्या तुकड्यांच्या कडा पुरेसे मार्जिन ठेवून धावदोऱ्याने शिवून घेतल्या.मग मोकळ्या ठेवलेल्या जागेतून आतील सुलट बाजू बाहेर काढल्या.मोकळी ठेवलेली जागा शिवून घेतली
1IMG_20200827_192907__01_copy_800x484.jpg

2IMG_20200827_201401__01_copy_800x509.jpg
5) मास्कच्या *हनुवटीवर येणाऱ्या बाजूपासून व नाकावर येणार असलेल्या बाजूपासून6-6सेमी अंतर मोजून कापडाची घडी करून इस्त्री केली व त्या खुणांवर हातशिलाई केली.

6)नंतर फोटोतल्याप्रमाणे फोल्ड केलेल्या भागांच्या बाजूला शिवून घेतले.

7) मधल्या पट्टीच्या दोन्ही कडांवर प्रत्येकी 20 सेमी लांबीचे इलॅस्टिक ठेवून त्यावर कड दुमडून इलॅस्टिक बसवले.इलॅस्टिकची सुटी टोके शिवली.

8) तयार झालेला मास्क उघडून त्याला नीट इस्त्री केली व योग्य तो आकार दिला.
1 IMG_20200828_081052_copy_800x257.jpg

2IMG_20200828_082918_copy_701x652.jpg

3IMG_20200802_163405__01_copy_976x530.jpg

4IMG_20200802_182312__01_copy_800x790.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त शिवलाय मास्क.एकदम चांगला फिट बांधता येईल असा.स्टेप बाय स्टेप पण चांगले दिले आहे.एखादा डिझायनर मॅचिंग मास्क शिवेन स्वतःसाठी, एखाद्या कॉटन ड्रेसवर.

मस्त आहे

मला एक शंका आहे . मास्क शिवण्यासाठीच कापड कुठे मिळते ?

Sariva, अतिशय सुंदर मास्क शिवले आहेस ग. तुझे कौतुक करावे तितके कमीच.

जाई, मी उगीच अप्लिक वर्क करावे वगैरे विचार करून टेलरकडून ढिगाने चिंध्या आणल्या होत्या. लॉकडाऊन मध्ये डझनभर मास्क शिवले त्यांचे.

वा छानच
पूर्ण झाकलं जातय नाक तोंड। उपयुक्त एकदम