मला फास्टफूड मध्ये सगळंच आवडतं. 2 मिनिटात होणाऱ्या मॅगी पासून सूप पर्यंत सगळंच. पण करायची वेळ आली की फक्त सँडविच येतं. कारण ते सोप्पं आहे आणि मलाही प्रचंड आवडतं. सँडविच चे नावाप्रमाणेच खूप सारे प्रकार आहेत. कोणी फक्त ब्रेड टोस्ट करून खातं तर कोणी टोमॅटो कांदा काकडी च्या चकत्या करून खातं. चकती वाला प्रकार जरा हेक्टिक वाटतो मला म्हणूनच कोणीतरी अश्या प्रकारच्या सँडविच चा शोध लावला असावा. सँडविच मध्ये बऱ्याच गोष्टी विकतच्या रेडिमेड असतात म्हणून तो ह्या स्पर्धेत चालेल की नाही शंकाच आहे.
लागणारा वेळ :- १० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१मध्यम शिमला मिरची(मिळेल/आवडेल त्या कलर मध्ये), १ मध्यम कांदा, टोमॅटो, काकडी एक (ह्यात ऋतू आणि आवडीनुसार मिळणाऱ्या भाज्या म्हणजे गाजर, बीट, कोबी तसेच पनीर पण घालू शकता), मेवनिज, चाट मसाला, सेंद्र मीठ, पुदिना चटणी, सॉस, तूप/बटर, चीज, जिरे पूड, तंदुरी/किचनकिंग मसाला आणि ब्रेड
क्रमवार पाककृती:
कांदा, काकडी, शिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरून घ्या.
मग त्या एका प्लेट मध्ये एकत्र करा त्यात चवीनुसार मीठ, चाट मसाला, जिरे पूड टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. वरून एक चमच मेवनिज, अर्धा चमचा तंदुरी मसाला आणि टोमॅटो सॉस टाकून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्या. किसलेलं चीझ आणि जिरे पूड टाकून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्या.
अलमोस्ट सँडविच रेडी आहे. आता २ ब्रेड च्या स्लाइस ला बटर लावून घ्या. ब्रेडच्या एका स्लाइस ला वरून पुदिना चटणी आणि दुसऱ्याला टोमॅटो सॉस लावा.
तयार मिश्रण ब्रेडच्या एका स्लाइस वर ठेऊन दुसरा स्लाइस त्यावर ठेवून टोस्ट/ग्रील करा.
टोस्टरमध्ये बटर लावून टोस्ट करा.
टोस्ट करून झाल्यावर आवडत असेल तर पुन्हा एकदा किसलेला चीज टाका.
पुदिना चटणी :- १/२ कप पुदीना पाने, १/२ कप कोथिंबीर, १/४ फुटाणे डाळ, २ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १/४ जिरा पावडर, १/२ टिस्पून लिंबाचा रस, चवीपुरते मिठ हे सर्व मिक्सर मध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्या. गरजेनुसार थोडे थोडे पाणी टाका
अवांतर : वरील मिश्रण डोसा पॅन वरती असतानाच टाकून थोडं फ्राय होऊ दिलं की डोस्याला छान चव येते
वडापाव सोबत पण खायला चांगला लागतं, जेवताना कोशिंबीर म्हणून ही खाता येईल.
जर टोस्टर घरी नसेल तर शिमला आणि कांदा थोडा परतून घेऊन मिश्रण करा. आणि ब्रेड तव्यावर भाजून एकत्र करून खा. भरपूर चीज असेल तर चवीला छान लागतं तब्येतीचं काय माहीत नाही.
माहितीचा स्रोत :- स्ट्रीट फूड
ही रेसिपी लिहण्यापेक्षा बनवायला जास्त सोपी आहे.
पाककृती स्पर्धा ३ - {फास्टफूड स्पर्धा} - स्पेशल टोस्ट सँडविच
Submitted by Aaradhya on 28 August, 2020 - 11:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे ही पाककृती.
मस्त आहे ही पाककृती.
सँडविच बघूनच तोंडाला पाणी
सँडविच बघूनच तोंडाला पाणी सुटले.
छान दिसतय सँडविच, शेवटून
छान दिसतय सँडविच, शेवटून दुसऱ्या फोटोतलं सँडविच उचलन खावसं वाटतय मस्त खरपूस दिसतय. चटणी चा रंग पण छान
छान दिसतेय.
छान दिसतेय.
शेवटून दुसऱ्या फोटोतलं सँडविच
शेवटून दुसऱ्या फोटोतलं सँडविच उचलन खावसं वाटतय मस्त खरपूस दिसतय.
,+७८६
मस्तच.
मस्तच.
खलास!!! अप्रतिम झालय.
खलास!!! अप्रतिम झालय.
खलास!!! अप्रतिम झालय.
खलास!!! अप्रतिम झालय.
छान झालेय सँडविच!
छान झालेय सँडविच!
मला हे आताच्या आता हवंय
मला हे आताच्या आता हवंय
तोंपासू
तोंपासू
मस्त. गरमागरम व्हेज चीज
मस्त. गरमागरम व्हेज चीज सँडविच एकदम ऑटाफे! फोटो मस्त.
धन्यवाद
धन्यवाद
मस्त दिसतंय सँडविच!!
मस्त दिसतंय सँडविच!!
सँडविच बघूनच तोंडाला पाणी
सँडविच बघूनच तोंडाला पाणी सुटले.>>>+1