Submitted by संयोजक on 28 August, 2020 - 01:40
नमस्कार मंडळी,
मायबोली 2020 गणेशोत्सवाला जो प्रतिसाद मिळत आहे याने संयोजक सदस्यांना अतीव आनंद झालेला आहे.
-----------------------------मायबोलीकरांचे खूप खूप कौतुक--------------------------
ह्या गणेशोत्स्वाला 21 वर्ष पुर्ण होत असल्याने आम्ही झब्बू या प्रकारात एकवीस गोष्टींची नावे लिहीण्याचे सदर उघडले आहे.
एकवीस गोष्टींची नावे देण्याचा जो झब्बू सुरु आहे यातील आजचे पुष्प आहे....
'आठवणीं मधले 21 खेळ'
...अहो बघताय काय...व्हा सुरु!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
1. लपाछपी
1. लपाछपी
2. आईस्प्रुट(आस्प्रेट) डबा
3. विटी दांडू
4. आदोली कदोली
5. गोट्या (रिंगण आखून)
6. ढब(घळ करून 10 20 आणि ज्याच्यावर राज्य येईल त्याला भर दुपारी शेतातून फिरवणे)
7. तळ्यात मळ्यात
8. खटोरी
9. क्रिकेट
10. लगोरी
11. अबाधोबी
12. लंगडी
13. खोखो
14. खांबापाणी
15. टूपणी
16. गाडा
17. हॉकी
18. स्विमिंग
19. पाच तीन दोन
20. मेंढी कोट
21. पिंकी पिंकी रंग कोणता?
22. भोवरा
1.Zimma
1.Zimma
2.Fugdya
3.Hututu
4.Lagori
5.Viti dandu
6.Vishamrut
7.Sagargotya
8.Aai maz patr harwal
9.Marcopolo
10.Tipitipi tiptop,what color
11.abadhabi
12.lapachapi
13.langadi
14.palati
15.kabddi
16football
17 Criket
18.kachapani
19.patte
20.carom
21.bhovra
22.bhatukali
23.Bharat bharat bharat
24dori udya
१. टिपरीपाणी
१. टिपरीपाणी
२. आठ-चल्लस
३. सागर गोटे
४. नवा व्यापार
५. जोड साखळी
६. चोर-पोलीस
७. माझ्या आई च पत्र हरवलं
८. लीडर लीडर ऍक्शन चेंज
९. आमच्या घरात ४० चोर शिरले
१०. घर-घर
११. शाळा -शाळा
१२. टिचकी मारुनी जावे - याचं नाव नीट आठवत नाहीये
१३. रुमाल पाणी
१४. तीन पायांची शर्यत
१५. दगड का माती /डोंगरपाणी
१६. मधला कावळा
१७. टीपी टीपी टीप टॉप
१८. डब्बा एक्सप्रेस /ऐसपैस
१९. शिरापूरी पुढच्या घरी
२०. आंधळी कोशिंबीर
२१. आय बिना
खेळांची नाव वाचून नॉस्टॅल्जिक
खेळांची नाव वाचून नॉस्टॅल्जिक झाले. काचा पाणी मला खुप आवडायचा. नंतर त्या काचांचं काहितरी चित्र व्हायचं
आलेल्या व्यतिरिक्त २१ लिहिणे
आलेल्या व्यतिरिक्त २१ लिहिणे शक्य नाही.
आमच्याकडील काही खेळांना वेगळी नावे होती.
वर आलेल्या व्यतिरिक्त खेळ:
१. दानकाडी : सर्व खेळाडूंच्या हातात दोन फूट लांब काठ्या. ज्यावर राज्य आहे त्याने विरुद्ध दिशेला तोंड करून दोन्ही हात उंच करून त्यावर अलगद काठी ठेवायची. मग कुणीतरी मागून काठीने ती काठी शक्य तितकी लांब भिरकवायची आणि पटकन आपली काठी कुठल्या दगडावर टेकवायची. बाकी सगळ्यांनी आपल्या काठ्या दगडावर टेकवून ठेवायच्या. मग ती काठी लांब ढकलत न्यायची. दरम्यान जर कुणाची काठी दगडावर नसताना राज्य असलेल्याने त्याला शिवले की खेळ संपून त्यावर राज्य. ज्याच्यावर आधी राज्य होते त्याने त्या काठी पासून सुरवातीच्या जागे पर्यंत लंगडत जायचे.
२. खुप्पस: पावसाळ्यातला खेळ. साधारण अर्धफुट लांब सळई हाताने वरून ओल्यामातीत भिरकवायची. ती जमिनीत घुसून उभी राहिली पाहिजे. असे एकामागून एक सगळ्यांनी करत जायचे. ज्याची सळई पडली त्याने लंगडत सुरवातीच्या जागी जायचे.
३. अंडेफोडणी/कुरघोडी.
४. नदी का पहाड
५. बेंदा बायको: दोन गट असत. एका छोट्या चौकोनात एका गटाने आपल्या गोट्या ठेवायच्या. दुसऱ्या गटातील खेळाडूंनी अंगठा जमिनीवर टेकवून मधल्या बोटाने नेम धरून आपल्या गोटीने त्या गोट्यांना मारायचे. दोन संध्या असायच्या. एकवेळ नेम हुकला तर चालतो एकवेळ मात्र गोटीला गोटी लागली पाहिजे. पहिली संधी गोटी जवळ जाण्यासाठी वापरायची दुसरी संधी मारण्यासाठी. असे करून त्या गोट्या शक्य तेवढ्या लांब घेऊन जायच्या. गटातील सर्वांच्या दोन्ही संध्या हुकल्या की राज्य संपले. मग राज्य असणाऱ्या गटातील प्रत्येकाने आपापली गोटी ढोपराने ढकलत परत चौकोनात न्यायची.
६. चाबडुबल्या: - सूर पारंब्या सारखा खेळ, कुठल्याही मोठ्या झाडावर खेळायचा.
७. नोटा: विविध सिगारेट किंवा आगपेटीच्या डब्यांची फक्त पुढची बाजू कापून घ्यायची- या झाल्या नोटा. अशा नोटा गोळा करायच्या. खेळात ज्यावर राज्य आहे त्याने एका वर्तुळात आपल्या ठराविक संख्येत नोटा ठेवायच्या. दुसर्याने पाच सहा फूट लांबून खापर फेकून त्या नोटा वर्तुळाबाहेर काढायच्या. पहिल्या फेकीत एकतरी नोट बाहेर निघाली पाहिजे म्हणजे त्याला अजून फेकी मिळते, नोट बाहेर निघाली नाही की त्याचा डाव संपला. जितक्या नोटा वर्तुळा बाहेर तो काढू शकला तितक्या त्याच्या.
1. लपंडाव
1. लपंडाव
2. डबा एक्सप्रेस
3. तळ्यात मळ्यात
4. भातुकली
5. अंताक्षरी
6. डोंगर की पाणी
7. पळापळी
8. खो खो
9. कब्बडी
10. दोरी उड्या
11. सापशिडी
12. काचाकवड्या
13. टेनिस
14. आंधळी कोशिंबीर
15. आईचं पत्र हरवलं
16. राजा-राणी-चोर-पोलीस
17. व्यापार
18. लुडो
19. लंगडी
20. कॅरम
21. पत्ते ( पाच-तीन-दोन,गुलामचोर, गाढव, जोडी, मेंढीकोट)
1.beduk udya
1.beduk udya
2.chamchalimbu
3.gajge
4patang udvine
सूर पारंब्या.
सूर पारंब्या.
een मीन तीन अथवा राम लक्ष्मण सीता
डोंगर पेटला पळा पळा.
रुमाल टाकी.
उभा खो खो
खांब खांब खांबोली दही भात आंबोली (हे वर वेगळ्या नावाने लिहिलेय वाटते कोणी कोणी)
पतंग/वावडी उडवणे
सगळे खेळ वाचून लहानपणीचे दिवस
सगळे खेळ वाचून लहानपणीचे दिवस आठवले.किती मजा असायची तेव्हा.
माझ्या मुलांना हे काहीच खेळायला मिळत नाही याचे वाईट वाटते.
2. डबा एक्सप्रेस >> हा काय
2. डबा एक्सप्रेस >> हा काय खेळ आहे?
डबा एक्सप्रेस >> हा काय खेळ
डबा एक्सप्रेस >> हा काय खेळ आहे? > ; लपाछपीसारखाच...मैदानात मध्यभागी एक रिंगण आखून त्यात एक डबा उलटा ठेवायचा. राज्य असेल त्याने गड्यांना शोधून आऊट करायचे. कोणी पळत येवून डबा रिंगणातून उडवला, तर परत राज्य त्याच गड्यावर यायचे.
आम्ही डब्बा ऐस पैस म्हणायचो.
आम्ही डब्बा ऐस पैस म्हणायचो.
शिवाय गल्लीतले टेनिस क्रिकेट
पिक पिक पिक ( कोणीतरी अक्षर द्यायचं आणि इतरांनी भराभर त्या अक्षराने सुरू होणारे सहा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द लिहायचे जसे की फूल फळ, प्राणी गाव वगैरे)
मस्त यादी सगळ्यांचीच! ठिक्कर
मस्त यादी सगळ्यांचीच! ठिक्कर बिल्ला , बिट्ट्या , झीम्मा, फुगड्या वेगळे आठवले
पत्त्यांचे २१ :
पत्त्यांचे २१ :
१. ५-३-२ हुकूम बोलून
२. ५-३-२ हुकूम लपवून
३. ब्रिज
४. भिडू भिडू
५. ३०४ चौघांचे
६. ३०४ तिघांचे
७. गुलामचोर
८. नॉट अट होम
९. साधी रमी
१०. रशियन रमी
११. ७-८ हुकूम बोलून
१२. ७-८ हुकूम लपवून
१३. सांगितल्याइतकेच डाव करणे (८ ते १ पाने असे ८ डाव )
१४. भिकार सावकार
१५. एक पानी झब्बू
१६. गड्डा झब्बू
१७. बदाम ७
१८. १०८
१९. मेंढीकोट
२०. Challenge
२१. उनो पत्ते (विशिष्ट संच)
आम्ही पण डबा ऐसपैस म्हणायचो.
आम्ही पण डबा ऐसपैस म्हणायचो. आणि हिरा म्हणताएततसे दोन वेगळे खेळ आम्ही खेळायचो,
१) एक तर नाव गाव फळ फूल रंग अडनाव सिनेमा मार्क :- प्रत्येक जण कागद घेऊन बसणार , एक शब्द घ्यायचा त्यावरून पटापट हे सगळं लिहायचं आणि जो फास्ट पूर्ण करेल तो जिंकला मग मार्क द्यायचे.
२) सांगा सांगा,
लवकर सांगा,
काही
फळांची/गावांची/ फुलांची...................
नावे सांगा
बी क्विक
हा तोंडी खेळायचा खेळ होता, टिचक्या वाजवत खेळायचं. ते बी क्विक चं नंतर पिक पिक पिक झालं असेल
मानव तुमच्या कडच्या खेळांची नाव भारी आहेत
आमच्याकडे हा बी क्विक खेळ
आमच्याकडे हा बी क्विक खेळ कुणीतरी आणला. पीक पीक म्हणुन. चांगला खेळ म्हणून बाबांनी नीट ऐकले आणि आम्हाला सांगितले की ते बी क्विक असावे, पण आम्ही पीक पीक च म्हणत असू.
स्मरणशक्ती पण खेळायचो ...
स्मरणशक्ती पण खेळायचो ... मुलांची नाव, पदार्थांची नाव , गावांची नाव
ह्या बाबतीत आपले मित्र
ह्या बाबतीत आपले मित्र मैत्रिणी जास्त बरोबर असं वाटत आपल्याला.