Submitted by निशिकांत on 26 August, 2020 - 00:08
मनाच्या तावदानाला तडे हे पाडले कोणी?
खड्यांना आठवांच्या, शांत डोही टाकले कोणी?
कुणाची साथसंगत लाभली तर सोडले कोणी
कुणी उत्साह वाढवला, नि मागे ओढले कोणी
जरी खाते हवामानातल्या बदलास वर्तवते
मनाच्या वादळाला का कधी सांभाळले कोणी?
कसे दोघातले नाते अताशा सैलसर झाले?
विचारा आपुल्याला, घट्ट टाके उसवले कोणी ?
अनाथाचे जिणे जगली तरी का घाट श्राध्दाचा?
मरायाच्या अधी आईस का ना पोसले कोणी?
नको ते नेमके घडते, असे का? सांग आयुष्या
मनाजोगे घडे ज्यांच्या, असे का जन्मले कोणी?
विठूच्या कार्तिकी वारीत जाणवले प्रकर्षाने
प्रवासी जास्त होते अन् जरा भक्ताळले कोणी
न जमते नाचणे ज्यांना तयांचे वाकडे अंगण
म्हणोनी राजकारण क्षेत्र हे लाथाडले कोणी
मनी "निशिकांत" च्या आहे, चढावे ऊंच शिखरावर
असावी ती अशी उंची, जिथे ना पोंचले कोणी
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनाच्या तावदानाला तडे हे
मनाच्या तावदानाला तडे हे पाडले कोणी?
खड्यांना आठवांच्या, शांत डोही टाकले कोणी?
कसे दोघातले नाते अताशा सैलसर झाले?
विचारा आपुल्याला, घट्ट टाके उसवले कोणी ?
छान..
कुणाची साथसंगत लाभली तर सोडले
कुणाची साथसंगत लाभली तर सोडले कोणी
कुणी उत्साह वाढवला, नि मागे ओढले कोणी
नको ते नेमके घडते, असे का? सांग आयुष्या
मनाजोगे घडे ज्यांच्या, असे का जन्मले कोणी?
अप्रतिम.....
पशुपत, Chasmish, आभार
पशुपत, Chasmish, आभार दोघांचेही दिलखुलास प्रतिसादासाठी.