।।श्री गणेश स्तवन ।।

Submitted by अस्मिता. on 25 August, 2020 - 14:19

अजं निर्विकल्पं निराकारमेकं

निरानान्दमानान्दं-अद्वैतापूर्णम्

परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं

परब्रह्म-रूपं गणेशं भजेम

आज तुझ्या या अशाश्वत मूर्तरूपाची भक्ती व पुजन करू की तुझ्या त्या नित्य अमर्याद, शाश्वत व निराकार रूपावर प्रेम करू. मला सद्गुणांचा आशीर्वाद देणाऱ्या अरे गणेशा , मला तू दोन्ही रूपांत अत्यंत प्रिय आहेस.

गुणातीतमानं चिदानन्दरुपम्

चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्

मुनिन्ध्येयमाकाशारुपं परेशं

परब्रह्म-रूपं गणेशं भजेम

उमेच्या मांडीवर सोंडेशी खेळणाऱ्या तुझ्या गोजिऱ्या रूपाला पहाते तेव्हा मीच साक्षात गौरी होते. इतके लोभस रूप असताना , तुला स्वहस्ताने मोदक भरविल्याशिवाय मला कसे बरे रहावेल !


जगत्-कारणं कारण- ज्ञानरुपं

सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं

जगद्व्यापिनं विश्र्ववन्द्यं सुरेशं

परब्रह्म-रूपं गणेशं भजेम

सर्व सत्याचा, प्रार्थनांचा आणि आविष्काराचा प्रकाश आहेस तू , तुझ्याशिवाय कुणाचे स्तवन करू मी !! सर्व जगातील ज्ञानाचे, प्रगतीचे , सुखांचे कलागुणांचे स्त्रोत असूनही मूळ निर्गुण निराकार असलेल्या तुला मी वंदन करते.

असाच दरवर्षी मूर्तरूपाने-मूर्तीरूपाने ये आणि माझ्या ह्रदयातील अज्ञानाचा व माझ्या जीवनातील दुर्भाग्याचा अंधःकार दूर कर , पण अमूर्तरूपातील वरदानासह माझ्या मतीत मात्र नित्य वास कर !!

।। श्री गणेशाय नमः ।।
।। शुभं भवतु ।।

*श्री शंकराचार्य लिखित गणेश स्तव .
हस्तलेखन स्पर्धेसाठी रचलेले.
ह्याची हीच चाल माझी आवडती आहे. माझी विनंती आहे की एकदा तरी ऐकाच !! तुमची गणपतीची आवडती स्तोत्रे, गाणी प्रतिसादात शेअर करा.
-अस्मिता Happy
गणेशोत्सव २०२०

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले. छान.

गणपतीचे स्तवन, मंगलस्तवन नेहमीच आवडते. प्रत्येक पोथीतील मंगलस्तवन वाचण्याचा छंद आहे. मग पुढे सरस्वती, माता-पिता, गुरु, सज्जन-संत व श्रोते आदिंचे स्तवन येते ते किंवा पोथी वाचतेच असे नाही.

धन्यवाद प्राचीन, रूपाली, सामो.

सामो, काही काही स्तवनांना सुरेख नाद असतो , आणि सहसा खूप मोठे नसते. काही ठिकाणी यालाच स्थावक आणि काही वेळा स्तव लिहिले आहे. (आंतरजालावर) पण ही चाल फार शांत आणि गंभीर आहे. AR Rehmaan ची आहे बहुदा!

शिवाय श्रीशंकराचार्य अद्वैतमताचे पुरस्कर्ते असल्याने गणेशाच्या परब्रम्ह रूपाचे स्तवन आहे. जे सहसा इतर गणेशाच्या स्तोत्रांमध्ये आढळत नाही. आचार्यांचा No nonsense, transparent, straight forward, confident, super intelligent approach , आणि आशयघन स्तुती (पाल्हाळ नसणे ) फार फार आवडते मला Happy ! बहुतेक स्तोत्रांमध्ये जाणवतेच मला. इंग्रजीचा आधार घ्यावा लागला, whatever !! Happy

>>>>>शिवाय श्रीशंकराचार्य अद्वैतमताचे पुरस्कर्ते असल्याने गणेशाच्या परब्रम्ह रूपाचे स्तवन आहे. जे सहसा इतर गणेशाच्या स्तोत्रांमध्ये आढळत नाही. >>>> हा मुद्दा अवघड होता लक्षात येणं. अन्य मंगलस्तवनांमध्ये सगुणोपासनाच आढळलेली आहे हे सत्य आहे.

हे माझे निरीक्षण आहे हं , मी चूक असू शकते Happy ! माझा स्वतःचा ओढा बहुतेक निर्गुण निराकाराचाच आहे म्हणून बरोबर चित्त तिकडेच आकर्षित होते. त्याशिवाय काही जीवाला विसावा वाटत नाही.

नमो देवदेवा नमो विघ्नहर्ता
नमो बुद्धीदाता नमोजी समर्था
नमो विश्वकर्ता अनादी अनंता
नमो भालचंद्रा कृपाळू स्वभक्ता

छान लेख. किती उच्च कोटीचे आध्यात्मिक विचार आहेत तुमचे. सध्याच्या काळात अमेरिकेला अश्या विचारांची गरज आहे.

आज सकाळी आम्ही वॉक वरून येत होतो. छान सकाळ ची वेळ. सुरेख उन्हे. स्वच्छ हवा आणि हिरवी झाडे गवत वगैरे. याच क्षणी क्लीन अप मु़ंबईचा भला मोठा गार्बेज कलेक्षन ट्रक सोसायटीच्या आवा रात शिरला व रोजच्या सवयीने वळण घेउन नेहमीच्या जागी उभा राहिला. रोजचीच बाब पण आज त्यांनी गजानना श्री गणराया आधी वंदु तुज नायका हे अगदी जुने गाणे लावले होते. ते ऐकून मला अगदी गहिवरून आले. साधे पण छान गाणे आहे. पुण्यात आमच्या घराशेजारच्या श्रीकृ ष्ण मंडळाच्या गणेश मंडपात ह्या व अश्या गाण्यांची टेप सकाळी लावत असत. त्याची आठवण आली. अवघ ड करोना काळातही मुंबई सारखे महानगर स्वच्छ ठेवणारे आपले मराठी बंधू बघुन मला जीवनातील आशा निराशा चक्रात गजानना सारख्या सकारात्मक प्रतिमेची आजच्या घडीला किती गरज आहे ते प्रकर्षाने जाणवले.

तुम्ही म्हणता तसा निर्गुण गणेश प्रेझेन्स असा कधी कधी जाणवून जातो.

स्पॉटिफाय वर एम एस सुब्ब लक्ष्मी ह्यांचे वातापि गणपति भजे हम हे उत्तम भजन आहे. मी हंसध्वनी राग सर्च करत होते त्यात आले . ते ऐकूनच मी गणेश उत्सव साजरा केला.
मोरया.

 
किती उच्च कोटीचे आध्यात्मिक विचार आहेत तुमचे. ... >>>>कसंच काय अमा , आणि मला प्लीज अगं तुगं करा , माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ व्यक्तीने मला अहोजाहो केले की कसंतरीच होतं.
सध्याच्या काळात अमेरिकेला अश्या विचारांची गरज आहे....>>>>
अहो इथे मायबोलीवर सुद्धा कोणी वाचत नाही लवकर , अमेरिकेत कोण विचारणार Happy ! ज्या लोकांच्या पोस्टी धार्मिक / किंवा तत्वज्ञान विषयावरच्या असायच्या ते सुद्धा आताशा मायबोलीवर दिसत नाहीत . मला वाटायचं काही संवाद साधता येईल , जाऊ द्या. हा विषय लोकप्रिय नाही या वास्तवाशी तडजोड केली आहे मी.

तुम्ही म्हणता तसा निर्गुण गणेश प्रेझेन्स असा कधी कधी जाणवून जातो..... >>>>>
अगदी हेच म्हणायचे होते मला Happy , कुणाला आपले लेख आवडल्यापेक्षा विचार कळल्याचा जास्त आनंद होतो मला .

गजानना श्री गणराया आधी वंदु तुज नायका...>>>>. हे गाणे मलाही आवडते माझ्या बालपणीच्या घराजवळील गणेशमंडळात नेहमी वाजायचे. हे वाचून पुन्हा मनात निनादले !

स्पॉटिफाय वर एम एस सुब्ब लक्ष्मी ह्यांचे वातापि गणपति भजे हम हे उत्तम भजन आहे. मी हंसध्वनी राग सर्च करत होते त्यात आले . ते ऐकूनच मी गणेश उत्सव साजरा केला....
नक्कीच गुगलून बघते / ऐकते धन्यवाद. हंसध्वनी राग रोचक वाटतोय.

तुम्ही मनमोकळा आणि दीर्घ प्रतिसाद दिल्याने खरंच छान वाटले. आभार. Happy

सकारात्मक प्रतिमेची आजच्या घडीला किती गरज आहे ते प्रकर्षाने जाणवले....>>>>>सहमत. अश्या सामुहिक लो मोमेन्ट्स मधून सकारात्मकताच बाहेर काढू शकते. संकटावर मात करण्याची उमेद मिळते.

*********
शिवाय गणपती प्रत्यक्ष येऊन आपले विघ्न दूर करत नाही तर तो आपल्याच प्रज्ञेने संकटावर मात करायची प्रेरणा/ बुद्धी देतो. या अर्थाने तो निर्गुण रूपात आपल्या प्रज्ञेत नित्य असतोच. पण हे तत्त्व क्रियाशील होण्यासाठी आपल्याला त्याच्याशी भौतिक रूपात कनेक्ट व्हावे लागते. सहवासाने नाते निर्माण होते तसे काहीसे....म्हणून मगं सगुणरूपी उत्सवाचा नियमितपणे आधार घ्यावा लागतो. त्यानेच ही सुप्तावस्थेत असलेली प्रज्ञा , मेधा , बुद्धी , ऋतुंभरा आदि क्रियाशील होतात व सकारात्मक विचार ऊर्जा येते असं वाटतं मला.
हे अचानकपणे सुचलं.

>>>>त्यानेच ही सुप्तावस्थेत असलेली प्रज्ञा , मेधा , बुद्धी , ऋतुंभरा आदि क्रियाशील होतात व सकारात्मक विचार ऊर्जा येते असं वाटतं मला.>>>>छान मनन अस्मिता.

मनी आठवीता जरी मोरयाला
करी वृत्ती निवृत्त तेचि क्षणाला
समाधान शांती मिळे भाविकाला
प्रसादे निका लोपवी आपदाला

निका... खरा. नेमका, सुयोग्य
लोपवी ... नष्ट करतो, संपवतो
आपदा... संकटे, दुःख, कष्ट

मनापासून श्रीगणेशाचे स्मरण केले असता अंतःकरण वृत्ती निवृत्त होते. अशा भाविकाची सर्व संकटे दूर होऊन समाधान व शांति या खर्‍या प्रसादाचा लाभ होतो.

___/\___

अती साजिरी मूर्ती विघ्नेहराची
भुलावूनि भक्ता गुणानिर्गुणाची
रुळे शुंडही, कोर माथा शशीची
प्रभा फाकली नेत्री ती दिव्यतेची

खूप छान, पुरंदरे शशांक.
. अशा भाविकाची सर्व संकटे दूर होऊन समाधान व शांति या खर्‍या प्रसादाचा लाभ होतो....हे आवडले. तुम्ही अर्थ दिलाय त्याबद्दल आभार.
फारच छान जमलीये कविता, आरती वाटतेयं.
खूप खूप आभार.

सर्व आस्तिक/नास्तिक, श्रद्ध/अश्रद्ध लोकांसाठी हीच प्रार्थना मी मनापासून करते . सर्वांनी निरामय असणे कोरोनामुळे महत्त्वाचे वाटतेय. आज हीच प्रार्थना गणेशाला !

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ _/\_

धन्यवाद Happy

आदि शंकराचार्यांची सर्वच स्तवने खूप छान आणि अर्थपूर्ण आहेत. त्यातला छंदही ऐकायला छान वाटतो. तो नक्कि कुठला ते मला नीट कळत नाही, कारण तेवढा अभ्यास नाही. पण ऐकून भारी वाटतं.

रच्याकने, "श्री शंकराचार्य लिखित गणेश स्तव .
हस्तलेखन स्पर्धेसाठी रचलेले" >> ह्याचा अर्थ कळला नाही. स्तवन श्री शंकराचार्यांनी रचलेलं आहे ना? मग हस्तलेखन स्पर्धेसाठी काय रचलं आहे? ह्यात्लं कुठलं कडवं तुम्ही रचलेलं आहे की काय? तसं असल्यास हमारा दंडवत कुबुल करो!

कडवं नाही मध्ये मध्ये जे मराठीत लिहिलयं ते मी रचलय !
हस्तलेखन स्पर्धेसाठी गणेशाचे कुठलेतरी स्तोत्र लिहायचं होतं पण तेवढच कुठे म्हणून थोडी माझी प्रार्थना मध्ये रचली.
https://www.maayboli.com/node/76228 इथे हस्तलेखन बघू शकता.
धन्यवाद Happy