सगुण स्वरुप स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन
तुच माझा राम, तुच माझा शाम
कैवल्याचे धाम तुची, मुखी तुझे नाम
मी तुझे बालक, स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन
करुणाकरा तू, तूची दयाळा
माता पिता तूची, सखा तू कृपाळा
माहेरची माझे स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन
संकटात येसी, तूची रे धावुनी
योगायोग तूची, देसी घडवुनी
भक्तांची काळजी, तुला गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन
आशिर्वचन द्यावे, हेची आता देवा
सत्संग घडावा, घडो नित्य सेवा
कृपाछत्र माझे स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन
सगुण स्वरुप स्वामी गजानन
आनंदनिधान स्वामी गजानन
____________
गौरी सुता हे गणराया
संकटातूनी ताराया
राहो आम्हावरी सदा
तुझ्या कृपेची ही छाया
वरदविनायक गणराया
दया क्षमा अन शांतीप्रिया
अजाण बालक मी तुमचे
मातेसम असू दे माया
विघ्नविनाशक गणराया
कृपासिंधू तू गणराया
रक्षण करण्या भक्तांचे
धाव घेई रे गणराया
गजाननकृपेने ही सेवा घडली. मी निमित्तमात्र, लेखनिक म्हणता येईल.
मस्तच ग
मस्तच ग
धन्यवाद अवल
धन्यवाद अवल
खूप छान. दोन्ही छान आहेत.
खूप छान. दोन्ही छान आहेत.
लेखनिक तोच आपण केवळ निमित्त! _//\\_
वा, छानच
वा, छानच
छान आहे.
छान आहे.