मंडळी ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. भारताच्या आर्थिक राजधानीबद्दल २१ प्रश्न दिले आहेत. तुम्ही त्यांची उत्तरे ओळखून (शक्यतो गूगल न करता) पोस्ट करायचे आहे. तुम्हाला माहीत असतील तेव्हढ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
१. भारतातून ब्रिटिश सैनिकांची शेवटची तुकडी निघणारे मुंबईतील ठिकाण
२. मुंबईतील सर्वात मोठा हरित पट्टा
३. 'तुझ्या दर्शनासाठी लोळत येईन' असा नवस बोलला जातो ते मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर
४. मुंबईतील भरसमुद्रात असलेली धार्मिक वास्तू
५. मुबईजवळ भरसमुद्रात असलेली युनेस्कोने गौरवलेली जागतिक वारसा असलेली वास्तू
६. ताजमहाल नंतर सर्वात जास्त फोटो काढले जातात असे युनोस्कोने गौरविण्यात आलेले मुंबईतील ठिकाण
७. क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील भाग
८. सन २००९ मध्ये मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला सेतू
९. ऑस्कर विजेत्या सिनेमाने गौरव केलेला मुंबईतील भाग
१०. मटण स्ट्रीट वर मुंबईमधले प्रसिद्ध बहुरंगी बहुढंगी बाजार
११. मगरांचे वास्तव्य असलेला मुंबई मधील तलाव
१२. मुंबई मधला सर्वात उत्तरेकडचा बीच
१३. मुंबईमधील प्रसिद्ध दादर हिंदू जिमखान्याची जागा
१४. २०० फूट उंचीचा मुंबईमधला एकमेव बसाल्ट कातळ
१५. खुद्द गंगेचे पाणी श्री रामाने मुंबई मधे इथे बाण मारून काढले असे मानले जाते
१६. मुंबई मधील सर्वात महागडे घर
१७. मुंबई मधील पहिली उपनगरीय वास्तव्य योजना खालील ठिकाणी सुरू झाली.
१८. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडित असलेल्या मुंबईतील चौकाचे पूर्वीचे आणि सध्याचे नाव
१९. भारतातला पहिला सरकारमान्य सिनेमा मुंबई मधे इथे प्रीमीयर केला गेला होता
२०. भारतातली पहिली बस मुंबईमधे धावली. तिचा मार्ग काय होता ?
२१. भारतातला पहिला विमानतळ मुंबईमधे कुठे आहे ?
उत्तरे :
१. भारतातून ब्रिटिश सैनिकांची शेवटची तुकडी निघणारे मुंबईतील ठिकाण
गेटवे ऑफ इंडीया
२. मुंबईतील सर्वात मोठा हरित पट्टा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
३. 'तुझ्या दर्शनासाठी लोळत येईन' असा नवस बोलला जातो ते मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर
प्रभादेवी सिद्धिविनायक
४. मुंबईतील भरसमुद्रात असलेली धार्मिक वास्तू
हाजी अली दर्गा
५. मुबईजवळ भरसमुद्रात असलेली युनेस्कोने गौरवलेली जागतिक वारसा असलेली वास्तू
एलिफंटा लेणी
६. ताजमहाल नंतर सर्वात जास्त फोटो काढले जातात असे युनोस्कोने गौरविण्यात आलेले मुंबईतील ठिकाण
छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
७. क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील भाग
मरीन ड्राईव्ह
८. सन २००९ मध्ये मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला सेतू
वांद्रे-वरळी सी लिंक
९. ऑस्कर विजेत्या सिनेमाने गौरव केलेला मुंबईतील भाग
धारावी
१०. मटण स्ट्रीट वर मुंबईमधले प्रसिद्ध बहुरंगी बहुढंगी बाजार
चोर बाजार
११. मगरांचे वास्तव्य असलेला मुंबई मधील तलाव
पवई लेक
१२. मुंबई मधला सर्वात उत्तरेकडचा बीच
गोराई
१३. मुंबईमधील प्रसिद्ध दादर हिंदू जिमखान्याची जागा
शिवाजी पार्क
१४. २०० फूट उंचीचा मुंबईमधला एकमेव बसाल्ट कातळ
गिब्रालटर हिल, अंधेरी
१५. खुद्द गंगेचे पाणी श्री रामाने मुंबई मधे इथे बाण मारून काढले असे मानले जाते
बाणगंगा तलाव, वाळकेश्वर
१६. मुंबई मधील सर्वात महागडे घर
अंटिला, वडाळा
१७. मुंबई मधील पहिली उपनगरीय वास्तव्य योजना खालील ठिकाणी सुरू झाली.
दादर, माटुंगा, वडाळा, सायन
१८. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडित असलेल्या मुंबईतील चौकाचे पूर्वीचे आणि सध्याचे नाव
फ्लोरा फाऊंटन, हुतात्मा चौक
१९. भारतातला पहिला सरकारमान्य सिनेमा मुंबई मधे इथे प्रीमीयर केला गेला होता
Olympia Cinematograph
२०. भारतातली पहिली बस मुंबईमधे धावली. तिचा मार्ग काय होता ?
अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट
२१. भारतातला पहिला विमानतळ मुंबईमधे कुठे आहे ?
जुहू एरोड्रम
3. सिध्दीविनायक
3. सिध्दीविनायक
4. हाजी अली
६.गेट वे ऑफ इंडिया
७.नरिमन पॉईंट
१६. अंबानी चे घर असावे
2. संजय गांधी नॅशनल पार्क
2. संजय गांधी नॅशनल पार्क
5. घारापुरी लेणी
8. सी - लिंक
9. धारावी
15 बाणगंगा
18. फ्लोराफाउंटन, हुतात्मा चौक
७. मरीन ड्राईव्ह, नरिमन
७. मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट नाही.
१२. गिरगाव चौपाटी
**उप्स! मी दक्षिणेकडचा लिहिला.
१. भारतातून ब्रिटिश सैनिकांची
१. भारतातून ब्रिटिश सैनिकांची शेवटची तुकडी निघणारे मुंबईतील ठिकाण - गेटव ऑफ इंडिया
२. मुंबईतील सर्वात मोठा हरित पट्टा - आरे कॉलनी
३. 'तुझ्या दर्शनासाठी लोळत येईन' असा नवस बोलला जातो ते मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर - सिद्धिविनायक , प्रभादेवी
४. मुंबईतील भरसमुद्रात असलेली धार्मिक वास्तू - हाजी अली
५. मुबईजवळ भरसमुद्रात असलेली युनेस्कोने गौरवलेली जागतिक वारसा असलेली वास्तू - घारापुरी - एलिफंटा केव्ह्ज
६. ताजमहाल नंतर सर्वात जास्त फोटो काढले जातात असे युनोस्कोने गौरविण्यात आलेले मुंबईतील ठिकाण - गेटवे ऑफ इंदिया
७. क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील भाग - मरिन ड्राइव्ह
८. सन २००९ मध्ये मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला सेतू - वांद्रे वरळी सी लिंक
९. ऑस्कर विजेत्या सिनेमाने गौरव केलेला मुंबईतील भाग - धारावी
१०. मटण स्ट्रीट वर मुंबईमधले प्रसिद्ध बहुरंगी बहुढंगी बाजार - चोर बाजार?
११. मगरांचे वास्तव्य असलेला मुंबई मधील तलाव - पवई तलाव
१२. मुंबई मधला सर्वात उत्तरेकडचा बीच - गोराई
१३. मुंबईमधील प्रसिद्ध दादर हिंदू जिमखान्याची जागा - हिंदू जिमखाना मरीन लाइन्सला आहे. दादरला शिवाजी पार्क जिमखाना आहे. - शिबाजी पार्क इथे.
१४. २०० फूट उंचीचा मुंबईमधला एकमेव बसाल्ट कातळ - कान्हेरी गुंफा?
१५. खुद्द गंगेचे पाणी श्री रामाने मुंबई मधे इथे बाण मारून काढले असे मानले जाते - बाणगंगा
१६. मुंबई मधील सर्वात महागडे घर - अँटिला
१७. मुंबई मधील पहिली उपनगरीय वास्तव्य योजना खालील ठिकाणी सुरू झाली.
१८. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडित असलेल्या मुंबईतील चौकाचे पूर्वीचे आणि सध्याचे नाव - फ्लोरा फाउंटन - हुतात्मा चौक
१९. भारतातला पहिला सरकारमान्य सिनेमा मुंबई मधे इथे प्रीमीयर केला गेला होता - वॅटसन हॉटेल - एस्प्लनेड मॅन्शन
२०. भारतातली पहिली बस मुंबईमधे धावली. तिचा मार्ग काय होता ? - अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट
२१. भारतातला पहिला विमानतळ मुंबईमधे कुठे आहे ? - जुहू
भरतजी... खूप छान.
भरतजी... खूप छान.
प्रश्न क्र. 17 मधील पहिली
प्रश्न क्र. 17 मधील पहिली उपनगरीय वास्तव्य योजना>>>> म्हणजे रहिवासी गृहसंकुल का?
१४. २०० फूट उंचीचा मुंबईमधला
१४. २०० फूट उंचीचा मुंबईमधला एकमेव बसाल्ट कातळ>>> गिल्बर्ट हिल- अंधेरी.
१७. वांद्रे किंवा चेंबूर?
१७. वांद्रे किंवा चेंबूर?
१२. मुंबई मधला सर्वात
१२. मुंबई मधला सर्वात उत्तरेकडचा बीच - गोराई >>> गोराई बृहन्मुंबई मनपात येते का?
अन्यथा जुहू चौपाटी?
भरतजी एकदम सगळीच उत्तरे दिली.
भरतजी एकदम सगळीच उत्तरे दिली..
१७. बहुतेक बांद्रा असावे.. तिथे सरकारी वसाहत आहे.
गोराई मनपात येते.
गोराई मनपात येते.
११. मगरांचे वास्तव्य असलेला
११. मगरांचे वास्तव्य असलेला मुंबई मधील तलाव>>> तुळशी तलाव. पवईत मगरी आढळतात पण तुळशी तलावात खुप पूर्वीपासून मगरींचे वास्तव्य आहे.
17) तालमकी वाडी, ताडदेव.
17) तालमकी वाडी, ताडदेव.
१४) गावदेवी/ गिल्बर्ट हिल अंधेरी
६) हे कदाचित छत्रपती शिवाजी
६) हे कदाचित छत्रपती शिवाजी टर्मिनस असू शकेल.
प्रश्न क्र. 6 चे ऊत्तर
प्रश्न क्र. 6 चे ऊत्तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू शकते असे मला सुध्दा वाटते.
17) तालमकी वाडी, ताडदेव.>>
17) तालमकी वाडी, ताडदेव.>>
हीरा, ताडदेव उपनगरीय?
ताडदेव म्हणजे दक्षिण मुंबई..
ताडदेव म्हणजे दक्षिण मुंबई..
६.चे उत्तर धोबी घाट आहे असे
६.चे उत्तर धोबी घाट आहे असे वाटते
भरत मस्त उत्तरे.
भरत मस्त उत्तरे.
2 चे उत्तर अरे कॉलनी नसून नॅशनल पार्क असावे असं वाटतंय
11. तुळशी
11. तुळशी
१७. हिंदू कॉलनी दादर?
दादर म्हणजे उत्तर मुंबई..
दादर म्हणजे उत्तर मुंबई..
१७. नवी मुंबई ???
१७. नवी मुंबई ???
भरत , मस्त उत्तरे
भरत , मस्त उत्तरे
२. मुंबईतील सर्वात मोठा हरित
२. मुंबईतील सर्वात मोठा हरित पट्टा - संजय गांधी नॅशनल पार्क
६. ताजमहाल नंतर सर्वात जास्त फोटो काढले जातात असे युनोस्कोने गौरविण्यात आलेले मुंबईतील ठिकाण - ताजमहाल हॉटेल
१३. मुंबईमधील प्रसिद्ध दादर हिंदू जिमखान्याची जागा - प्रश्न गंडलेला आहे.
दादर हिंदू जिमखाना या नावाची संस्था अस्तित्वात नाहि, दादर जिमखाना म्हणुनहि नाहि. दादर पारशी जिमखाना म्हणुन एक आहे, पण तो पारशी लोकांचा आहे, अर्थात पारशी कॉलनी, दादर इथे. दादर युनियन (गावस्कर, वेंगसरकर फेम) आहे, जो माटुंग्यात आहे. आणि दादर क्लब आहे, तो हिंदू कॉलनीत आहे. गावस्कर पुर्वि जिथे रहायचा तिथुन काहि पावलांवर...
राज १३ वा प्रश्न बरोबर आहे.
राज १३ वा प्रश्न बरोबर आहे. थोडा विचार केला तर उत्तर लक्षात येईल. तुम्ही आसपासच आहात.
१३. आंध्र महासभा जिमखाना / पी
१३. आंध्र महासभा जिमखाना / पी. जे . हिंदू जिमखाना ?
ओके, शिवाजी पार्क जिमखान्याचं
ओके, शिवाजी पार्क जिमखान्याचं आधीचं नांव दादर हिंदू जिमखाना होतं हे आज मला गुगल मार्फत कळलं. पण तो गेल्या ७५+ वर्षांपासुन शिवाजी पार्क जिमखाना म्हणुनच ओळखला हातो. सो आयँम गोइंङ टु स्टिक टु माय कामेंट - १३वा प्रश्न गंडलेला आहे...
१. भारतातून ब्रिटिश सैनिकांची
१. भारतातून ब्रिटिश सैनिकांची शेवटची तुकडी निघणारे मुंबईतील ठिकाण
२. मुंबईतील सर्वात मोठा हरित पट्टा : संजय गांधी नॅशनल पार्क
३. 'तुझ्या दर्शनासाठी लोळत येईन' असा नवस बोलला जातो ते मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर : सिद्धीविनायक
४. मुंबईतील भरसमुद्रात असलेली धार्मिक वास्तू : हाजिआली दर्गा
५. मुबईजवळ भरसमुद्रात असलेली युनेस्कोने गौरवलेली जागतिक वारसा असलेली वास्तू : एलिफंटा केव्हज
६. ताजमहाल नंतर सर्वात जास्त फोटो काढले जातात असे युनोस्कोने गौरविण्यात आलेले मुंबईतील ठिकाण : गेटवे ऑफ इंडीया
७. क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील भाग : मरिन ड्राईव्ह
८. सन २००९ मध्ये मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला सेतू : वांद्रे वरळी सि-लिंक
९. ऑस्कर विजेत्या सिनेमाने गौरव केलेला मुंबईतील भाग : धारावी
१०. मटण स्ट्रीट वर मुंबईमधले प्रसिद्ध बहुरंगी बहुढंगी बाजार : काळा घोडा
११. मगरांचे वास्तव्य असलेला मुंबई मधील तलाव : पवई लेक
१२. मुंबई मधला सर्वात उत्तरेकडचा बीच : मढ आयलंडा
१३. मुंबईमधील प्रसिद्ध दादर हिंदू जिमखान्याची जागा : पिवायसी हिंदू जिमखाना ?
१४. २०० फूट उंचीचा मुंबईमधला एकमेव बसाल्ट कातळ :
१५. खुद्द गंगेचे पाणी श्री रामाने मुंबई मधे इथे बाण मारून काढले असे मानले जाते : बाणगंगा
१६. मुंबई मधील सर्वात महागडे घर : अंबानींचे घर ?
१७. मुंबई मधील पहिली उपनगरीय वास्तव्य योजना खालील ठिकाणी सुरू झाली.
१८. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडित असलेल्या मुंबईतील चौकाचे पूर्वीचे आणि सध्याचे नाव : हुतात्मा चौक
१९. भारतातला पहिला सरकारमान्य सिनेमा मुंबई मधे इथे प्रीमीयर केला गेला होता
२०. भारतातली पहिली बस मुंबईमधे धावली. तिचा मार्ग काय होता ?
२१. भारतातला पहिला विमानतळ मुंबईमधे कुठे आहे ? : सहार
१७) साठी संभाव्य उमेदवार :
१७) साठी संभाव्य उमेदवार : हिंदू कॉलनी. पारसी कॉलनी, दादर पश्चिम खांडके बिल्डिंग, वरळी बी डी डी चाळी, खार येथील धुरंधर मार्गावरची कॉलनी. वांद्रे पूर्व येथील गांधीनगर, एम आय जी कॉलनीज, अंधेरी पश्चिम वेसावे येथील ढाके कॉलनी , अंधेरी एस वी रोड इथली टाटा कॉलनी. लल्लूभाई पार्क, विले पारले पूर्व इथल्या परांजपे स्की मस् गोरेगाव पश्चिम सिद्धार्थ नगर, गोरेगाव पूर्व जयप्रकाश नगर, बोरिवली बाभई परांजपे योजना , बोरिवली पूर्व श्रीकृष्ण नगर
पण दादर खार भाग सोडला तर बाकी सगळ्या योजना 1950-60 दरम्यानच्या आहेत म्हणजे फार जुन्या नव्हेत.
दादर टी टी इथल्या हिंदू कॉलनीज वगैरे १९२८ च्या आहेत.
पूर्वेला घाटकोपरला काही जुन्या वसाहती आहेत.
https://www
https://www.indiaheritagewalks.org/blog/dadar-quaint-parsi-colony