मन आहे की आहे चेष्टा ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 August, 2020 - 00:44

स्वप्नांमध्ये येतो माझ्या
डोळ्यांवरती नसतो चष्मा

घाव मिळाले की पालवते
मन आहे की आहे चेष्टा ?

तो माझ्या डोळ्यातिल काजळ
रेखू वा ना रेखू ...दैना !

गझल म्हंटले की तो येतो
मारत बसते म्हणून गप्पा

डोळ्यांमध्ये डोळे मिसळू
हातात हात नसेनात का

गरजेपुरते उरतो आपण
कुठला मोहन कसला पेंद्या

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users