"बस स्टँड "मला जेव्हा जेव्हा एकटे वाटत तेव्हा मी बस स्टँड वर जाऊन बसतो. का कुणास ठाऊक बस स्टँड मला आवडतं. मला कुठे जायचं नसले तरिही मी एक दोन तास जाऊन बसायचो किवा मुद्दाम कुणालातरी सोडायला किवा आणायला जायचो.कॉलेज ला मी विजापुरला होतो तर तेव्हा मला खुप एकटे वाटायच पहिल्यांदा घरातून बाहेर पडलो होतो थोडसं निराश वाटायचं.
तर मी बस स्टँड वर का जातो कारण मला तिथे विविध लोक त्यांची लाईफ त्यांचे विचार अनुभवायची संधी मिळते. मी काय creative फ़ील्ड मध्ये नाहिये पण मला दुसर्याच्या मनात डोकावणे आवडते .
तिथे कोण बाजार करुन बाजुच्या च असलेल्या गावातल्या घरी जात असतो.कोण जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या घरातल्या कोणा वृद्ध व्यक्तीला दवाखान्यात दाखवण्यासाठी घेउन आलेला असतो.
तर कोणी आपले कॉलेज संपवून आपल्या घरी जाणार्या गाडी ची वाट बघत आज कॉलेज मध्ये काय काय झालं याची टिंगल टवाळी करत असतो.
पण आता तुम्ही म्हणाल यात इंटरेस्टिंग असं काय आहे, तर जेव्हा तुम्ही sad असता तेव्हा तुम्ही या लोकांचं आयुष्य ही तुमच आहे असं जगुन बघा. कल्पना करा की यातल्या कोणा एकाच आयुष्य तुम्ही जगणार आहे.
मी असच एकदा जाउन बसलो स्टँड वर मला असं वाटत होत की मी एकटा आहे माझं अस कोणीच नाहिये माझ्या आयुष्यात.
तिथे एक आज्जा दिसले एकटेच होते वय असेल सत्तरिच्या आसपास असेल. एका हातात जनावरांसाठी तयार केलेला नायलॉन ची रस्सी होती,आणि एका हातात पिशवी होती त्यात बरेच सामान होते. पांढरा अंगरखा आणि धूऊन धूऊन पिवळे झालेलं पण मुळ रंग पांढरे असलेले असे धोतर पायात प्लास्टिकचे स्वस्तातल्या चपला. डोक्यावर पांढरी टोपी , झुबकेदार पांढरीफकट मिश्या असा त्याचा पेहराव. एकंदरीत त्याच्या हालचालीवर तो एकटाच आहे असे वाटत होत.
तो काय करेल घरी जाऊन त्याच्या मनात काय चालू असेल?
मी विचार करु लागलो, त्याच्या एकंदरीत चेहर्यावरुन असे वाटत होत की खुप खर्च झाला याचे त्याच्या मनात दुख असावे. मी त्यांचे आयुष्य जगू लागलो.
" आज लैच खर्च झाला, पण हे सगळं पहिजेच होतं शिवाय पोराला खायला नेलं नाही तर ते रडत बसतो अर्धा तास पिशवी मध्ये बघत रहातो वेड्या आशेने खायला मिळेल म्हणून आणि त्याची निराशा झालेली बघवत नाही. आणि दावण्या तर लागणारच होत्या. पैशाचा प्रश्न कसा सोडवायचा दिवसेंदिवस आपली तब्येत साथ देत नाहीय. मुलगा काही काम करुन मिळवेल असे वाटले होते पण त्याच पण काही खरं दिसत नाहीय. असो आलेला दिवस ढकलायचा."
मला माहिती आहे हे सगळं खुप निगेटीव्ह आहे आणि अशी त्या आज्जांची परिस्थीती नसावी पण हे सगळं मी बघीतलं आहे.
आंणि हे विचार मनाला सुन्न करतात पण एवढी आयुष्य कुठं अनुभवायला मिळणार.
Pratisad baddal dhanyavad
Pratisad baddal dhanyavad