निम्न

Submitted by तो मी नव्हेच on 18 August, 2020 - 04:56

भावनांचे कोडे विलक्षण अवघड वाटतं
एकदा भावलेली पुन्हा नाही भावत तशीच
त्याच आर्ततेने, तन्मयतेने
गात्रांत, श्वासात, मनात, स्पर्शात,
रंध्रारंध्रात झिरपून गेलेली, नितळ अगदी..
कधीकधी येतेही जवळपास तशीच
पण जवळपासच....
भेटते ती पुन्हा पुन्हा.... पण...
स्वतःचेच निम्न रूप घेऊन दरवेळेस
भावना स्वजातीभक्षक असतील कदाचित

-रोहन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी खरंय!!! तीच भावना दुसर्यांदा टोकदार होऊन येईलच असं आपण सांगु शकत नाही!!!!