खरंतर माझ्या माहेरची लोकं फारच अरसिक..सिनेमा, नाटकं, गाणी.. कसली म्हणजे कसलीच आवड नाही..त्यामुळे एखाद्या सिनेमातील इमोशनल सिन बघताना रडणं तर दूर पण साधं एक टिप्पूसही कोणाच्या डोळ्यात आलं तर शप्पथ ..मी त्यांच्या अगदीच विरूद्ध..अर्थात नाॅर्मल.. इतरांसारखेच सिनेमा, गाणी, कॅरम, पत्ते यांसारखे शौक..आमच्या आवडी निवडी आणि स्वभावातील तफावत पाहता मला ह्यांनी लहानपणी खरच एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवरून उचलून आणलेले असावे असच कायम वाटायचं .. मग मोठेपणी ठरवलं की लग्नानंतर आपल्याला मिळणारं सासर तरी निदान थोडंफार..नाही नाही, बऱ्यापैकी रसिकच असाव..मग हिच ‘इच्छा माझी पुरी करा’ म्हणत पोह्यांचे कार्यक्रम उरकले.. म्हणजे, पोह्यांच्या कार्यक्रमात सासरच्यांना गाणी किंवा कोणते डायलाॅग्ज वगैरे मारायला लावले नाहीत..पण एका कोपऱ्यात लाजत खुर्चीवर बसण्याऐवजी त्यांच्याशी थेट संवाद साधत, त्यांच्या आणि माझ्या आवडीनिवडी कितपत जुळतात हे जाणून घ्यायलाच मी उत्सुक असायचे..
असो, तर अशा प्रकारे देवाच्या नव्हे तर स्वःतच्याच कृपेने मी असं रसिक सासर पदरात पाडलं..
लग्न झाल्यावर सुरूवातीच्या तीन एक आठवड्यातच सासऱ्यांसोबत ‘दोस्ती’ चित्रपट पहाण्याचा योग आला..ब्लॅक ॲंड व्हाईट सिनेमा बघायची माझी चौथीच वेळ असावी... चित्रपट सुरूवातीपासूनच कमालीचा इमोशनल..त्यात “चाहूॅंगा मै तुझे सांज सवेरे” गाणं लागताच मन भरून आलं..आता सासऱ्यांसमोर लगेचच आपल्या अश्रूंना पाय फुटायला नकोत म्हणून मी सोफ्यावरून एक पाय खाली ठेवत तिथून सटकणार तितक्यातच हा भला मोठा हुंदका..माझा नव्हे, सासऱ्यांचा..माझ्याआधी त्यांच्याच अश्रूंनी उंबरठा ओलांडला होता..मी लगेचच रूमालाच्या शोधात लागले..तितक्यात सासू आतून टाॅवेल घेऊन आली आणि म्हणाली “रूमालाने नाही भागणार आज टाॅवेलच लागणार” (सासूला अशाच वेळेस बरोबर काव्य सुचतं).. एव्हाना माझ्या लक्षात आलेले की हे नेहमीचंच प्रकरण आहे..त्यांच रडणं बघून मला थोडंफार हसूही आलं.. थोडक्यात सांगायचं झालं तर “मर्द को भी दर्द होता है “ हे कळालं आणि ते सांगताही येतं आणि दाखवताही येतं ह्यावर विश्वास बसला .. मग काय..त्यानंतर आम्हा दोघा ढवळ्या-पवळ्याची जोडी चांगलीच जमली.
त्यांना गोडधोड खायला आवडतं मला बनवायला आवडतं..
त्यांना पत्ते पिसायला आवडतात मला लोकांचे पत्ते कट करायला आवडतात..
त्यांना जुनी गाणी ऐकायला आवडतात मला ती म्हणायला आवडतात..
त्यांना ग्लासभरून व्हिस्की आवडते तर मला ताटभरून चकना..
बरं, आमच्या ह्या आवडी-निवडीच्या लिस्टला चार चांद लावायला अजून दोन गोष्टी आहेत.. पहिली म्हणजे कॅरम खेळताना आम्हा दोघांचाही राणीसाठी केला जाणारा आटापीटा..त्यांना कॅरम खेळताना बघून मला कायम मुन्नाभाईतल्या पारसी बावाचीच आठवण होते.. मग वाटतं एवढी चांदीसारखी बायको असताना (सासूचे सगळे केस पिकलेत त्यामुळे सोन्याऐवजी चांदीसारखीच म्हणावं लागेल) का बरं त्या राणीच्या पाठी पडायचं?
तर दुसरी गोष्ट म्हणजे दोस्ती नंतरचे ‘सूर्यवंशम’ चित्रपटावर असलेले आम्हा दोघांचे अतोनात प्रेम ..
लोकांनी ह्या चित्रपटाला कितीही नावं ठेवली तरी “नाव काढलं बाप लेकाने” असं म्हणत आम्ही दोघे हा विचित्रपट दरवेळेस बघतो..
घरच्यांना मात्र आम्हा बापलेकाचे सूर्यवंशम वरचे प्रेम खटकतं.. हा सिनेमा लागणार म्हटल्यावर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागतं..मग त्यावर तोडगा म्हणून आम्हाला हा विचित्रपट लागण्याआधी थोडीशी जय्यत तयारी करावी लागते -
जसं की सगळ्यात आधी कामवाली बाई, बिनबुलाए मेहमान किंवा नेमक्या ह्याच वेळेस गाॅसिप नावाचा मसाला वाटायला दारात येणाऱ्या शेजारपाजारच्या बायका, अशांचा पत्ता कट करण्यासाठी दारावरची बेल बंद करून ठेवायची, लगेहात लॅंडलाईनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवायचा, त्यानंतर “अहो जरा ‘आम्ही सारे खवय्ये’ लावा ओ” अशी दर पाच मिनिटाला वाजणारी सासूची खरखर कॅसेट बंद करण्यासाठी
तिच्या फोनवरून माझ्या तीनही विवाहीत नंदांना मिसकाॅल मारायचा .. जेणे करून ताशी १ या हिशोबाने ३ तासांसाठी तीचापण पत्ता कट..
हे सगळं उरकल्यावर छान दोन पाण्याच्या बाटल्या .. हो पाण्याच्याच बाटल्या भरायच्या..एक सासऱ्यांसाठी दुसरी माझ्यासाठी, डोळे नाक पुसायला २ नॅपकिन्स आणि अधेमधे चरायला मिठी भात घ्यायचा (ज्यांनी सूर्यवंशम मन लाऊन बघितलाय त्यांनाच ह्या मिठी भाताची गोडी कळेल).. ह्या सगळ्या गोष्टींनी सोफ्यासमोरचा टेबल सजवायचा आणि मग टेबलाच्या दोन्हीबाजूंनी दोघांनी तंगड्या पसरवत एकदाचं सेटमॅक्स लावायचं.. मग त्याच त्याच प्रसंगांवर यथेच्छ रडायचं.. आणि सिनेमा संपला की टिव्ही बंद करून दोघांनी एकाच वेळी आणि एकाच सुरात म्हणायचं “आखिर हिरा(ठाकूर) है सदा के लिए”
आज माझ्या ह्याच भानुप्रतापचा उर्फ सासऱ्यांचा ७० वा वाढदिवस ..आता ठाणे सोडून अमेरीकेत आले त्याला जवळजवळ अडीज वर्षे झाली ..अर्थात तो टेबल सजून, एकत्र सिनेमा बघत रडून आणि त्यानंतर एकमेकांची चेष्टा करूनही तितकीच वर्षे झाली.. आता मात्र ह्या कोरोनाने चांगलीच गोची करून ठेवली आहे .. त्यामुळे आता फक्त वाट बघायची..
फिरसे वही मैफिल सजेगी..
जब मिल बैठेंगे तीन यार,
सून,सासरे और सूर्यवंशम
म्हाळसा हा ऋन्मेषचा नवा अवतार
म्हाळसा हा ऋन्मेषचा नवा अवतार आहे असं दिसतंय.
मजा आली वाचायला
मजा आली वाचायला
म्हाळसा हा ऋन्मेषचा नवा अवतार
म्हाळसा हा ऋन्मेषचा नवा अवतार आहे असं दिसतंय. < >> एकंदरीत भाषेवरुन मला पण तेच वाटतेय.
बस्स करा लोकहो..
बस्स करा लोकहो..
एखादा नवीन आयडी आहे. ओरिजिनल डीपी लावतोय. ते देखील फॅमिलीसोबत. तरीही तुमच्या डु आयडी शंका मिटत नाहीत
नवीन येणारया प्रत्येक आयडीला का हि डु आयडी टेस्ट द्यावी लागते. का उगाच जिथे तिथे एखाद्या चांगल्या लेखावर हे असे प्रतिसाद?
अवांतर - @ म्हाळसा, प्रोफाईल पिक छान आहे. मलाही असेच मुलांसोबत ठेवलेला डीपी आवडतो. किंबहुना गेले कैक वर्षे मी फेसबूक व्हॉटसपवर पोरांचाच वा पोरांसोबतचा डीपीच ठेवला आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी लेक लहान असताना "मै
माझी लेक लहान असताना "मै करुंगा", मै खावुंगा" अशा टाईप बोलायची.
लेखात तस झालय खरं.
@सान्वी,कंसराज, धनुडी -
@सान्वी,कंसराज, धनुडी - सगळ्यांचे खूप धन्यवाद!
पुढे तुमच्या घरी सुन येईल तेव्हा हीच पद्धत माकड आणि टोपीवाला प्रमाणे परंपरा पाळेल हेही लक्षात असू दया>> धन्यवाद माणीकमोती.. मला दोन लेकी आहेत त्यामुळे माझ्या सासरच्यांना मिळणारं सूनेचं सुख
माझ्या नशिबात नाही
तरीही तुमच्या डु आयडी शंका मिटत नाहीत>> ऋन्मेष त्यांना तसं म्हणायचं नसेल कदाचित.. भाषा सारखी वाटत असावी.
म्हाळसा हा ऋन्मेषचा नवा अवतार आहे असं दिसतंय>> धन्यवाद.. मी हे ॲज अ काॅंप्लिमेंट म्हणूनच घेईन.. तसंही लेखात लिहील्याप्रमाणे मला नेहमीच वाटायचं की मला कुठल्या तरी मंदिराच्या पायऱ्यांवरून उचलून आणलेलं असावं .. कुणास ठाऊक, आम्ही दोघं लहानपणी जत्रेत हरवलेले जुळेच असू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी लेक लहान असताना "मै करुंगा", मै खावुंगा" अशा टाईप बोलायची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेखात तस झालय खरं >> जेम्स बाॅंड..
लेखात तसं नक्की कुठे झालयं ते सांगाल का? हिंदी चित्रपटाविषयी लिहीलंय तर थोडाफार हिंदी शब्दांचा धिंगाणा ही लेखाची गरज वाटली आणि मी जन्माने मुंबईकर त्यामुळे लिखाणात हिंदी टच कायम असणारच तेही तितकंच खरं
परकाया प्रवेशात कधी कधी तोल
परकाया प्रवेशात कधी कधी तोल जातो! चालायचंच!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आँ आता हे काय? पण म्हाळसा
आँ आता हे काय? पण म्हाळसा आयडीचं हे लेटेस्ट उत्तर वाचून खरंच ही स्टाईल ऋन्मेषचीच आहे असं वाटतंय. जाऊ द्या. एखाद्याला आयुष्याचा अर्थच जर नवनवीन ड्यु आयडी काढण्यात गवसत असेल तर आपलं काय जातंय.
. कुणास ठाऊक, आम्ही दोघं
. कुणास ठाऊक, आम्ही दोघं लहानपणी जत्रेत हरवलेले जुळेच असू>> हे आवडलं. ऋन्मेष वर टीका करणार्यांनो खबरदार..ध्यानात ठेवा आता ताई आहे सोबतीला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋन्मेष वर टीका करणार्यांनो
ऋन्मेष वर टीका करणार्यांनो खबरदार..ध्यानात ठेवा आता ताई आहे सोबतीला>> काय वीरू.. विसरलात तुम्ही .. माझ्या दुसऱयाच धाग्यावर आपण एकत्र मिळून त्यांच्याशी वाद घातला होता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग म्हाळसा! झोपतेस कधी?
अग म्हाळसा! झोपतेस कधी? एव्हढ्या पहाटे पहाटे मायबोलीवर? लहानपणी ताटातूट झालेल्या भावाला मदत करायला?
काळजी घे ग!
माझ्या दुसऱयाच धाग्यावर आपण
माझ्या दुसऱयाच धाग्यावर आपण एकत्र मिळून त्यांच्याशी वाद घातला होता>> अरे हो.. विसरलोच होतो. शारुखवरुन चर्चा सुरु होती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग म्हाळसा! झोपतेस कधी?
अग म्हाळसा! झोपतेस कधी? एव्हढ्या पहाटे पहाटे मायबोलीवर? लहानपणी ताटातूट झालेल्या भावाला मदत करायला? >> गुड माॅर्निंग.. रात्री ९ वाजताच मुली झोपतात तेव्हा झोपते आणि सराळी ५ लाच उठते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंय ! बहुतेक सूना
मस्त लिहिलंय ! बहुतेक सूना साबुंना टरकून असतात पण तुमची छान गट्टी आहे.
वत्सला
वत्सला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला तर वेमा आणि ऍडमिन सोडून कोणाचाही भरवसा नाही राहिला. बाकी धागा छान आहे.
वर लिहिल्याप्रमाणे} जर खरंच
वर लिहिल्याप्रमाणे} जर खरंच डु आयडी वगैरे प्रकरण असेल तर कमाल आहे .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद केशव तुलसी
धन्यवाद केशव तुलसी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, प्रणवंत,जाई - मी ऋन्मेष अथवा कटप्पा, या दोघांचाही ड्यु आयडी नाही. इन्फॅक्ट मला ऋन्मेष यांचा प्रतिसाद वाचून ते ओव्हररीॲक्ट होत आहेत असं वाटलेलं म्हणूनच असा प्रतिसाद दिला होता - “तरीही तुमच्या डु आयडी शंका मिटत नाहीत>> ऋन्मेष त्यांना तसं म्हणायचं नसेल कदाचित.. भाषा सारखी वाटत असावी” .. पण इथे खरच बऱयाच जणांना माझा आयडी ड्यु आयडी असल्याची शंका आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला नाहीय शंका.
मला नाहीय शंका.
निदान तुम्ही आणि ऋन्मेष ड्युआयडीज नक्की नाहीत.
म्हाळसा,ओके आणि सॉरी.
म्हाळसा,ओके आणि सॉरी.
मला नाहीय शंका.
मला नाहीय शंका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेख आवडल्याबद्दल धन्यवाद
निदान तुम्ही आणि ऋन्मेष ड्युआयडीज नक्की नाहीत >>
म्हाळसा,ओके आणि सॉरी >> साॅरी वगैरे नको
मला लिहिण्याची स्टाईल सारखी
मला लिहिण्याची स्टाईल सारखी वाटतेय पण तुम्ही ड्यु आय असा अथवा नसा, मला काही फरक पडत नाही. लेखनासाठी शुभेच्छा.
ओके म्हाळसा. बहुतेक
ओके म्हाळसा. बहुतेक गैरसमजपायी हे झाले असावे. लिहीत रहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू लिहीत रहा ग
तू लिहीत रहा ग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हाळसा यात लोकांचाही दोष
म्हाळसा यात लोकांचाही दोष नाही फारसा. लोकं फसणे स्वाभाविक आहे.
१) तुमची लिखाणाची शैली थोडीफार माझ्यासारखी आहे. स्पेशली ते भाकरीचा पुडींग पाककृतीत तुमचा एक्स बॉयफ्रेंडचा उल्लेख मलाही माझ्या पिण्ट्या आणि मॅगी लेखाची आठवण देऊन गेला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२) तुमची प्रत्युत्तराची सवय देखील माझ्यासारखीच दिसत आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
३) एखाद्या नवीन सभासदाने पटापट धागे काढणे हे ईतके सोपे नसते. त्यामुळे त्यावर डुआयडी शिक्का सहज बसतो.
४) तुम्ही अमेरीकेत आहात. कटप्पा सुद्धा अमेरीकेत होते. तर मी अमेरीकेचा डु आयडी काढू शकतो असे ईथे बरेच लोकांना आधीपासून वाटते. भले ते ईतके सोपे नाही... आणि कटप्पाही माझे आयडी नाहीत.
५) त्यात भरीस भर म्हणजे कटप्पा गेले आणि तुम्ही आलात.
त्यांनीही अमेरीकेत घर घ्यायचा धागा काढलेला. तुम्हीही काढला. आणि माझीही ईथे तीन घरे फेमस आहेत. आणि नुकतेच मी चौथेही घेतले आहे.
गंमत म्हणजे कटप्पा आणि म्हाळसा हि दोन्ही नावेही ऐतिहासिक आणि पौराणिक आहेत.
६) तुम्ही मुलांसोबत फोटो ठेवलात आणि मी सुद्धा तसे ठेवतो. आता खरे तर हे साम्य पकडले तरी जर तुमचा फोटो ओरिजिनल असेल तर तुम्ही डुआयडी नाही आहात हे तिथेच सिद्ध होते. पण एकदा माणसाच्या मनात शंका आली कि लॉजिकल विचार करणे अवघड होते. तो वाहावत जातो.
७) अजून अजून अजून... थांबा आठवेल तसे भर टाकतो
अर्थात मला माहीत आहे तुम्ही ओरिजिनलच आहात. आणि आपण दोघेही ते चुटकीसरशी सिद्ध करू शकतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मला पर्सनली हा टाईमपास आवडतो.
पण तुम्हाला जर तुमची आयडेंटीटी अशी गेलेली आवडत नसेल तर अर्थात हे कोणालाही आवडत नाहीच. आणि याला जे काही मी जबाबदार असेल तर त्याबद्दल मनापासून माफी मागतो. पण तुम्ही तुमच्या वतीने कोणाला काही उत्तर द्यायचेय. काही पुरावे द्यायचेय तर देऊ शकता. मी यात तुमची हवी ती मदत करायला तयार आहे. पण जर तुम्हाला उगाच स्वत:ला सिद्ध करत बसण्यात रस नसेल आणि बोलणारयांकडे दुर्लक्ष करणे जमत असेल तर चालू द्या. एंजॉय आणि शुभेच्छा
कसं ओ..कसं जमतं तुम्हाला हे
कसं ओ..कसं जमतं तुम्हाला हे सगळं लिहायला.. जब वी मेट चा डायलाॅग आठवला “ये जो आप ग्यान बाटते हो.. ये मुफ्त का है या इसके कुछ पैसे चार्ज करते हो“![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा केली हं.. बाय दवे वर लिहीलेलं समजून घ्यायला २-४ वेळा व्यवस्थित वाचावं लागेल
ऋन्मेष=भन्नाट भास्कर=तुमचा
ऋन्मेष=भन्नाट भास्कर=तुमचा अभिषेक =अंड्या...... *but not म्हाळसा*
मला म्हाळसा यांचा प्रोफाईल फोटो original वाटतो आहे.
मला अजिबात वाटलं नव्हतं हं की
मला अजिबात वाटलं नव्हतं हं की तू कुणाचीही ड्यु आयडी आहेस. संशय घेणे असेही फार थकवते मला , म्हणून विश्वास ठेवणे सोपे सहज वाटते.
!
तू लिहीत रहा. The baby in the picture is super cute
लेख छान आहे.बाकी मामींनी
लेख छान आहे.बाकी मामींनी म्हटल्याप्रमाणे ...
डू आयडी आहे की नाही हा प्रश्न
डू आयडी आहे की नाही हा प्रश्न गौण आहे.
तुम्ही छान लीहले आहे.
असच bondig असावे सासरी .
खूप छान वाटला तुमचा लेख.
Pages