Submitted by सुप्रिया जाधव. on 12 August, 2020 - 23:41
बाचा-बाची थोड़ीशी आहे तर आहे
माझी माझ्याशी दोस्ती आहे तर आहे
मी माझ्या कवितेचे अत्तर शिंपत जाते
आयुष्याला दुर्गंधी आहे तर आहे
निर्भर माझी मन:स्थिती ह्या आभाळावर
घागर माझी आज रिती आहे तर आहे
सुटला आहे हमरस्ता तर सुटू देत ना
पायवाटही पायाशी आहे तर आहे
प्रश्न तसाही फक्त तुझ्या इच्छेचा नाही
उत्तरात माझी मर्जी आहे तर आहे
इकडे बिलकुल फिरकू नकोस नैराश्या तू
गाठ तुझी मग माझ्याशी आहे तर आहे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा