डोह

Submitted by तो मी नव्हेच on 2 August, 2020 - 04:26

मी तुला कवितेत माझ्या घट् धराया पाहिले
मऊशार तू रेती परि अलवार सुटाया पाहिले

हे मना कसला तुला हा कैफ वेगाचा तुझ्या
ती मला उमजे परि तू जग फिराया पाहिले

ती जरी असताही माझी भेट ना होते तिची
ज्या ती स्वप्नी येतसे त्या मी स्मराया पाहिले

तीच होती तीच आहे मज भावना तिच्यापरी
त्या भावनेस या भावनेने माझे कराया पाहिले

त्या भावनेला वश कराया डोहही मी शोधिला
माझ्या मनीचा डोह असूनी मी तराया पाहिले

हे तिचे उपकार झाले ना जरी मिळते मला
मी मला जवळून इतके ओळखाया पाहिले

-रोहन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन -चार शेर असे काही आलेत की ...
कुठेतरी वाचणंही असह्य होतं...
काही बोलणंही असह्य होतं...

- फक्त यापुढे गझल पोस्ट करण्याआधी ही कोणत्या वृत्तातील आहे ते देखील सांगाल का प्लीज
माझ्या सारख्या नवशिख्याला वृत्तांची नावे सुद्धा कळतील

धन्यवाद प्रगल्भ.
पण वृत्त वगैरे मला कळत नाही... इच्छा खूप आहे जाणून घेण्याची पण वेळ नाही देऊ शकलो तितका.
मी फक्त सुचेल ते लिहितो अन् ते म्हणताना जीभ अडखळत नाही याची काळजी घेतो बस्स.