तणाव म्हणजे काय?
साधारणपणे ७५ ते ९० टक्के प्रौढ व्यक्ति तणावाशी निगडित समस्यांसाठी चिकित्सकांस भेट देतात. ' मला खूप तणाव आहे'. हे तीन शब्द इतर कुठल्याही पालुपदापेक्षा आपण अधिक वेळा ,वारंवार वापरतो. परंतु आपल्या मनाविरुध्द घडलेल्या बाबींसंबंधी निराशा व्यक्त करण्याचे, तणाव हे फक्त एक विशेषणच नाही ,याची किती जणांना जाणीव आहे? पुढे जावून बहुशः त्यामुळे गंभीर स्वरूपाचे शारिरिक व मानसिक परिणाम होणार्या वैद्यकीय स्थिती निर्माण होवू शकतात.
एक उदाहरण पाहूया: माया ही नोकरी करणारी २७ वर्षांची ,एकटी रहाणारी स्त्री आहे. नमुन्यादाखल,एका दिवसाभरात तिला या प्रमाणे सामना करावा लागतो/तोंड द्यावे लागते.
सकाळी ७ वाजता : जागी झाले.काल रात्री उशीरापर्यंत काम केल्याने जरा थकवा जाणवतोय.
७.३० वा. : मनाला जागे करण्यासाठी एक कप कॉफी.
८.१५ वा. : आंघोळ,कपडे केले अन बाहेरच्या जगाचा सामना करायची तयारी.
९.२०. वा.: कुठ्ल्या तरी बेकार बांधकामामुळे मंदावलेल्या वाहतूकीत त्रासून गेले.
१० वा. : बॉसपुढे प्रेझेंटेशन केले,त्याला ते खूप आवडले. अन मग त्यांत सत्राशे साठ
बदल केले.
दुपारी १२ वा.: काम,काम,काम.
२ वा. : प्रचंड भुकेजले आहे पण आणखी थोडे काम संपविल्यावर खाईन.
३ वा. : दोन चिकन बर्गर अन फ्रेंच फ्राईजवर आदिमानवासारखा ताव मारला.खूपच
घाई घाईत खाल्ले अन आता थोडसं पोटात दुखतंय.
५ वा. : घरी जावसं वाटतंय. हे घड्याळ एवढं हळू का चालतंय?
संध्याकाळी ७.२५ वा : वैतागलेय!! आधी दिलेल्या नियोजित अंतिम मुदतीच्या एक आठवडा आधीच
साहेबाला बजेट (अंदाजपत्रक)चा प्रस्ताव हवाय. परत उशीरापर्यंत काम
करावं लागेलसं दिसतंय.
९.३० वा. : या टॅक्सीवाल्यांचा मला तिटकारा आहे. त्या मूर्ख टॅक्सीवाल्याने मला
ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला अन माझ्या कारच्या बंपरवर धडक दिली.
नुकसान झालं नाही पण मी त्याच्या कानाचे पडदे माझ्या किंचाळण्याने फाडले
तर नाहीत!
रात्री ११ वा.: शेवटे घरी पोहोचले तर अन जेवायला चायनीज मागवले
मध्यरात्री १२.४५ वा.: थकून गेलेय्.आज रात्री चांगली झोप लागू दे.बिछान्यावर पोहोचले.डोक्याला
अजून टॅक्सीवाला छळतोय.
सुदैवाने आपण सर्वजण रोज मायासारख्या दिव्यातून जावे जात नसलो तरी देखील आपली ही परिस्थिती खूपच ,तशीच नाही का? तुम्ही नोकरी करणारी स्त्री असू शकता अन दोन वृध्द आईवडील,शाळेत जाणारी तीन मुले,घर अन सर्व हे पुरेसे नाही म्हणून महिनाभर सुट्टीवर गेलेली मोलकरीण ,अशी तारेवरची कसरत करीत असाल. किंवा परिक्षेच्या तीव्र चिंतेने अन पालकांच्या अत्युत्कृष्टतेच्या अपेक्षेच्या भुणभुणीने गांजून हळूहळू आपल्या मानसिक संतुलनाचा कडेलोट होण्याच्या टोकावर पोहोचलेले तुम्ही विद्यार्थी असू शकता.किंवा रोज बेशिस्त वाहतूकीशी दोन हात करणारा, रस्त्यावरील बेफाम क्रोधाचा सामना करणारा अन गाडीच्या भोंग्याचा उन्मत्त कोलाहल सहन करणारा दैनंदिन प्रवासी असू शकता. अन हे फक्त रोजचेच नाटक आहे म्हणून नाही बरं. आपली आयुष्यच गुंतागुंतीची झाली आहेत : नाती अन लग्ने सुध्दा सदोदित तणावाखाली आहेत; आपल्या नोकर्यात आपला बराच वेळ खर्च होतो ; आपल्याला पहिल्यापेक्षा खूप जास्त प्रवास करावा लागतो;आपल्या महत्त्वाकांक्षानी खूप उंची गांठली आहे.या सर्वांनी आपल्या मनावर आणि शरीरावर एक अदृश्य आघात केला आहे.
हI दबाव म्ह॑णजे तणाव. " जेंव्हा आपण कितपत सहन करू शकते या धारणेहून कितितरी पटीने अधिक सहनशक्तीची मागणी एखादी परिस्थिती करते तेंव्हा तणाव निर्माण होतो. तुमच्याकडे उपलब्ध साधने व परिस्थितीची मागणी यातील ही तफावत आहे.
तणाव
Submitted by रेव्यु on 30 July, 2020 - 04:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप छान लिहिलयं...
खूप छान लिहिलयं...
बरोबर आहे. पण आपल्या
बरोबर आहे. पण आपल्या सहनशक्तीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सहनशक्तीची मागणी परिस्थितीच करीत असेल अन अशा वेळा दिवसातून अनेक वेळा येत असतील तर करावे तरी काय?
खूप छान लिहाय पण नुसती
खूप छान लिहाय पण नुसती सहनशक्तीची असून चालत नाही अशा परिस्थिती मध्ये टिकून राहून बदल ही करावा लागते
बरोबर लिहिलयं. पटतय.
बरोबर लिहिलयं.
पटतय.