Submitted by अविनाश राजे on 28 July, 2020 - 09:44
फेकले फासे जिथे, ती शुभशकुनाची स्थाने होती
तरीही जी आली वाट्याला, विपरीत ती दाने होती
महामारीतून वाचलो,मी प्रभूचा पुत्र आहे
जी मेली ती,सारी सैतानाची संताने होती
मलाही कुत्राच समजा, चांगलेसे हाडुकही फेका
सोडा त्या गर्जना, ती प्रसिद्धीची कारस्थाने होती
इवल्याशा त्या बीजाचा, जरी थोरला वृक्ष झाला
ना कधी तो फुलला, ना फळला, नुसतीच पाने होती
वाळवंटामधून त्या, मी सुखरूपच येणार होतो
स्वप्नी माझ्या, बहरलेली हिरवीगार राने होती
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा