Submitted by किमयागार on 27 July, 2020 - 08:21
दुनियेत माणसांच्या जगणे झकास नाही,
पैशास मोल आहे दुसऱ्या कशास नाही.
असतील भव्य वाडे शहरातल्या कुणाचे
पण झोपडीत माझ्या जगणे भकास नाही.
मी काय अर्थ काढू या गूढ जीवनाचा?
बुद्धीस हाय माझ्या असली मिजास नाही.
मज जायचेच आहे गंधाळल्या दिशेला,
वाटेत भेटणारा असली सुवास नाही.
थकलेत फार डोळे वाहून मेघ ओले,
म्हणणे तुझ्या व्यथांचे माझा कयास नाही.
सारे तसेच आहे येथे युगायुगांचे,
कुठल्याच माणसाने केला विकास नाही.
---------मयुरेश परांजपे----------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सहा खयाल म्हणजे सहा लेकरं
सहा खयाल म्हणजे सहा लेकरं
अगदी गोंडस आणि निव्वळ एकसारखी
एकाला झाका दुसऱ्याला काढा
- माझ्या सारख्या पामरानी काय ठरवावं
असं वाटतं की आपलं लिहिण बंद करावं
आणि गझला नुसत्या वाचत तर बसावं
पण कुठेतरी जपता आल आत तर जपावं
मी प्लीज या गझलेचा स्क्रीनशॉट माझ्या ड्राईव्ह वर स्टोर करू का तुमच्या खालच्या नावासकट
प्रगल्भजी काही हरकत नाही...
प्रगल्भजी काही हरकत नाही... मनापासून दाद कशी द्यावी हे मात्र आपल्याकडून शिकावं... खूप धन्यवाद