दुष्काळी बीडचा हवालदार अविनाश साबळे थेट ऑलिंपिक मध्ये......
(सियाचीन रणक्षेत्र ते ऑलिंपिकचे मैदान एक अनोखा प्रवास )
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका म्हणजे दुष्काळाचे माहेरघर. कोरडवाहू शेती करतच मुकुंद व वैशाली आपले आयुष्य जगत होते. अविनाश त्यांचा लहानगा त्यांचे लहानपणा पासूनचे कष्ट पाहात होता. शाळा शिकायला त्याला लैच लांब जावं लागे.सहा किलोमीटर पायी जायचे व परत सहा किलोमीटर. त्यात जर थोडा उशीर झाला तर गड्याला पळतच सुटावं लागायचे. त्याचं हे पळणे आणि आयुष्यात येणारे अडथळे त्याच्या आयुष्याला वेगळ्याच उंचीवर नेतील याची कल्पना पण त्याला नव्हती.
२०१९ मध्ये इंग्रजी वर्तमान पत्रातून अचानक बीड जिल्हा परत झळकायला लागला होता. तसा यावर्षी दुष्काळ पण नव्हता आणि काही इपरीत पण नव्हत घडलं. काय काय ते जबरदस्त मथळे झळकत होते. "Meteoric rise of Avinash Sable in Fed Cup", "Avinash Sable's long and winding road to worlds", मार्च मध्ये सुरवात झाली आणि अगदीच पूर्ण वर्षभर या अविनाश नावाच्या वेगाचे वेगळेच रूप आम्हाला पाहायला मिळाले.
रस्त्यावरून शाळेसाठी धावणारं इवलेशे हे पोर आज जगातील मोठे मोठे मैदान गाजवत होते. त्याच्या यशोगाथानी भारत भरून पावला होता मात्र आमच्या बीडातील भरतीसाठी अखंड परिश्रम करण्याऱ्या पोरांच्या पासून हे सगळे फार दूर होते.
आई वडिलांच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य दूर करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक तरुण सैनिक भरतीसाठी जीवाचं रान करतात. त्यातील एक चेहरा म्हणजे अविनाश साबळे. भारतीय सैन्यात जाण्यासाठीचे अचाट बळ त्यांला त्याच्या परिस्थितीमुळेच लाभलेलं होतं. केवळ अठरावर्ष आणि काही दिवस होताच हा तरुण सैन्यात भरती झाला आणि पहिली पोस्टिंग थेट सियाचीनच्या रणक्षेत्रात. उन्हाळ्यात काय ते मिटक्या मारील खाल्लेलं गारेगारच्या रंगीबेरंगी बर्फाची केवळ त्याची ओळख. समोर अखंड -४० अंश तापमानातील पांढऱ्या शुभ्र पण जीवघेण्या बर्फाच्या अस्तित्वात तो हवालदिल झाला पण त्यातून एक तगडा हवालदार अविनाश साबळे जन्मात आला.
जगातील सर्वात उंचीवरच्या रणक्षेत्रातून व भारताच्या अतिशीत भागातून त्याची बदली झाली ती अतिउष्ण राजस्थान मध्ये. बर्फाच्या वादळांशी मुकाबला करण्यात सरावलेला हा वीर आता वाळूंच्या वादळाशी दोन हात करत होता. भुकेची तीव्र कळ अनुभवणाऱ्या अविनाशला भरल्या पोटाने या सगळ्या अडथळ्यांना सामोरे जाणे सहजच शक्य होते. आता तो स्वप्न पाहू लागला होता. भूक माणसाच्या विचारांना गोठवते. तिचे जबर चटके सहन करून जो स्वप्न पाहु लागतो त्यावेळी त्याच्यासमोर यशश्री दासी म्हणून उभा असते. आयुष्याचा शर्यतीत भूक भागवण्यासाठी धावण्याच्या प्रेमात पडलेला अविनाश आता मैदानावर लांबपल्याच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागला. मोकळ्या मैदानावर असाच सुस्तावलेला असताना स्टीपलचेस क्रीडाप्रकाराचा सराव करणारे खेळाडू पाहून त्याला राहवले नाही. धावण्यासोबतच अडथळे हा त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता मग मैदानावर सुद्धा का नसावे ? तुफान धावत अडथळे एका पाठोपाठ एक मागे टाकणारा तो तरुण अमरीश कुमार या हाडाच्या प्रशिक्षकाच्या नजरेतून थोडाच चुकणार होता. त्यांनी त्याला हेरले व ३००० मीटर स्टीपलचेस धावणे हे अविनाशचे यापुढील आयुष्यच बनले.
याच काळात तो थोडा स्थिरावला होता. भरपेट खाताना त्याचे वजन चांगलेच वाढले. तशातच तो धावत होता व जखमी होत होता. त्याही पेक्षा मोठी जखम त्याला मनाला झाली जेव्हा इतर लोक म्हणू लागले की तू नाही धावू शकणार आता. नशीब म्हणून भूकेलेपण सोसणाऱ्या अविनाशला आता ध्येयासाठी फास्ट करणे अशक्यच नव्हते. काही महिन्यातच त्यांनी नुसते वजनच कमी नाही केले तर आपला धावण्याचा वेग प्रचंड वाढवला.
स्वतःतील बदल,क्रीडाप्रकारातील बदल अविनाशच्या भविष्यात एक सुखद व यशस्वी बदल ठरला. त्यानंतर तो अनेक स्पर्धा जिंकला. भुवनेश्वरच्या मैदानात मात्र तो जो सुसाट धावत सुटला व सरते शेवटी त्याने ३७ वर्षे जुना गोपाळ सैन्नीचे राष्ट्रीय रेकॉर्ड तोडले.आता त्याला स्वतःचेच नवीन रेकॉर्ड तोडण्याची उर्मी निर्माण झाली. वेगाच्या सोबतच त्याला सामना करावा लागला अतिशय अवघड परिस्थितीला. आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याच्या वेगाने तो धावत होता. अचानक अपघात झाला व तो जखमी झाला. त्याचे स्वप्न चोळामोळा झाले. निराशेच्या खोल गर्तेत जाऊन खेळ सोडून देण्याची भाषा तो करू लागला.त्याचे गृरू यावेळी मात्र त्यासाठी धावून आले. त्यांनी अविनाश मधील अविनाशी सैनिक जागा केला व तो परत वेगाने धावायला लागला.
वयाच्या पंचेवीशीत २०१९ च्या जागतिक मैदानी क्रीडास्पर्धेत त्याने आपले आधीचे रेकॉर्ड तोडत जागतिक पाळतीवर १३ वा क्रमांक मिळवत जपान मध्ये होणाऱ्या 2020 Summer Olympics मध्ये त्यांनी निर्विवाद प्रवेश मिळवला. आता त्याला अजून वेग वाढवावा लागणार आहे. त्याला आता विश्वास आहे की देशासाठी जगाच्या सर्वोच्य रणभूमीत लढणारा तो लढवय्या जगाच्या सर्वोच्य क्रीडास्पर्धेत जीवतोडून धावणारं तिरंगा उंचावण्यासाठी
प्रसाद, खूप धन्यवाद इथे
प्रसाद, खूप धन्यवाद इथे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अविनाशची ओळख करून दिल्याबद्दल! अविनाशचे अभिनंदन व शुभेच्छा!
अप्रतिम कामगिरी
अप्रतिम कामगिरी
जोरदार अभिनंदन
3000 मी स्टीपलचेस
चांगली माहिती. लिहिलीत ही छान
चांगली माहिती. लिहिलीत ही छान.
२०२० चं ऑलिंपिक होतंय का माहीत नाही.
पण अविनाशची प्रगती होत राहो.
चांगली माहिती. लिहिलीत ही छान
चांगली माहिती. लिहिलीत ही छान.
२०२० चं ऑलिंपिक होतंय का माहीत नाही.
पण अविनाशची प्रगती होत राहो. >>> अनुमोदन
चांगली माहिती. लिहिलीत ही छान
चांगली माहिती. लिहिलीत ही छान. >> +१
मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील
मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा... अविनाश साबळेंना..
चांगली माहिती. लिहिलीत ही छान
चांगली माहिती. लिहिलीत ही छान.
२०२० चं ऑलिंपिक होतंय का माहीत नाही.
पण अविनाशची प्रगती होत राहो.>>+१
चांगली माहिती. लिहिलीत ही छान
चांगली माहिती. लिहिलीत ही छान.
२०२० चं ऑलिंपिक होतंय का माहीत नाही.
पण अविनाशची प्रगती होत राहो.+१००
खूप छान
खूप छान
भारी !
भारी !
अभिनंदन आणि शुभेच्छा
येऊ दे एक पदक !
छान परिचय.
छान परिचय.
अविनाश यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
अविनाश चे खूप खूप अभिनंदन आणि
अविनाश चे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
ब्राव्हो!
ब्राव्हो!
अविनाश यांना मनापासून शुभेच्छा!
फारच छान! अविनाश यांना खूप
फारच छान! अविनाश यांना खूप सार्या शुभेच्छा!
मस्तच! अविनाश साबळेला भरपूर
मस्तच! अविनाश साबळेला भरपूर शुभेच्छा!
कौतुकास्पद आहे अविनाश यांचा
कौतुकास्पद आहे अविनाश यांचा प्रवास. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा.
सैन्याच्या नोकरीतून नित्याचा सराव आणि पात्रता स्पर्धा यासाठी वेळ, सुटी कसे काय जमते? की खेळाडू सैनिकांसाठी वेगळे प्रोटोकॉल असतात?
छान
छान
छान परिचय करून दिला आहे .
छान परिचय करून दिला आहे . अविनाश साबळेंचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
खेळाडू सैनिकांना ड्युटी नसते
खेळाडू सैनिकांना ड्युटी नसते
त्यांना पूर्णवेळ सराव आणि मेहनत असते
अर्थात सैन्याला आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण करावेच लागते आधी
नंतर मग स्पोर्ट्स सेंटर ला रवानगी होते
तिथे आर्मीच्याच शिस्तीत यांचे ट्रेनिंग होते
इंटर आर्मी आणि वर्ल्ड आर्मी गेम्स पण खूप महत्वाचे असतात
नवीन Submitted by आशुचँप on
नवीन Submitted by आशुचँप on 27 July, 2020 - 19:33 >>>
धन्यवाद आशुचँप. कुठे आहे आपले आर्मी स्पोर्ट्स सेंटर ? तिथे काही मूल्यमापन होते का? जर एखाद्याची कामगिरी सातत्याने असमाधानकारक राहिली तर आर्मी काय करते? याबद्दल कुठे माहिती मिळेल ती वेबसाइट सांगितली तरी चालेल.
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आर्मी स्पोर्टस सेंटर आहेत
पुण्यात घोरपडी येथे आहे
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारच्या ट्रेनिंग सुरू असतात आणि त्या त्या प्रमाणे पोस्टिंग होते
कुस्ती वाले हरियाणा, बॉक्सिंग वाले बंगलोर असे
कामगिरी असमाधानकारक राहिली तर त्यांच्याकडून जास्तीची मेहनत करून घेतली जाते, त्यांच्या क्रीडा कौशल्यावर त्यांचे प्रमोशन आणि पगार वाढत असल्याने प्रत्येक जण जीव तोडून सराव करतात
आणि मुळात घेतानाच गुणवान खेळाडू असल्याने अगदीच काही कारण असल्याशिवाय कामगिरी खालावत नाही
आर्मी या खेळाडूंवर भरपूर खर्च करते, पुण्यात तर परदेशी प्रशिक्षक आणले जातात, त्यांना परदेशात पाठवले जाते
त्यामुळे तुम्ही पाहिलेत तर भारतीय खेळाडूंमध्ये सर्व्हिसेस म्हणजे आर्मी, नेव्ही, एअर फोर्स यातील खेळाडू उठून दिसतात
विशेषतः कुस्ती, बॉक्सिंग, शूटिंग, तिरंदाजी, रोइंग आणि मैदानी खेळ
छान माहिती दिली आहे. अविनाशला
छान माहिती दिली आहे. अविनाशला शुभेच्छा.
सुंदर परिचय!
सुंदर परिचय!
अविनाश साबळे यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
अविनाश यांना मनापासून
अविनाश यांना मनापासून शुभेच्छा!
छान माहीती आशु !
Submitted by आशुचँप on 27
Submitted by आशुचँप on 27 July, 2020 - 23:33 >>>> धन्यवाद. हे इतके सविस्तर नव्हते माहीत.
छान परिचय करून दिला आहे .
छान परिचय करून दिला आहे . अविनाश साबळेंचे अभिनंदन आणि शुभेच्छा!>>>>++1111
आशुचँप, तुम्हाला सुद्धा धन्यवाद.
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!!
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!!
धन्यवाद, ही सगळी प्रोसेस
धन्यवाद, ही सगळी प्रोसेस जवळून पहिली आहे
पुण्यातलाच एक मुलगा सिलेक्त झाला आणि योगायोगाने माझी त्याला मदत झाली
त्याबद्दल लिहायचे होते खरे तर पण उगाच स्वतःची टिमकी वाजवल्यासारखे होईल म्हणून टाळत होतो
सुंदर परिचय!
सुंदर परिचय!
अविनाश साबळे यांचे अभिनंदन व शुभेच्छा! >>>> + 999
अनेक धन्यवाद, प्रसादराव...
सुंदर परिचय! प्रेरणादायी.
सुंदर परिचय! प्रेरणादायी.
अविनाश साबळे यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
धन्यवाद.
Pages