Submitted by मधुमंजिरी on 24 July, 2020 - 13:59
पावसात उन्, उन्हात पाऊस
पावलात गिरकी, झोक्याची हौस
आषाढ सरला, कधी कोरडा कधी चिंब
श्रावण आला, जणू मनाचेच प्रतिबिंब
आषाढात आभाळ गच्च ओथंबलेलं
श्रावणी पावसात उन चमचमलेलं
पाऊस झाला धुवांधार, धरती गर्भवती
श्रावणात कोडकौतुक, निसर्गाची आरती
श्रावण गाणी गात, सखी निघाली डौलात,
मेंदीचा मादक गंध, भिनत जातो श्वासात
उनपावसाचा खेळ, ही तर श्रावणाची खूण
मन झाकोळ उदास, प्रसन्न बासरीची धून।
सौ मंजुषा थावरे (२४.७.२०२०)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप छान कविता लिहीलीय पुलेशु
खूप छान कविता लिहीलीय
पुलेशु