(धणे-मिरचीचं झटपट लोणचं) धनिया मिर्च अचार

Submitted by योकु on 16 July, 2020 - 10:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ऑनेस्ट किचन या युट्यूब चॅनल वर बहुधा बेडमी-पूडी च्या रेस्पीत त्या कूक नी हे झटपट लोणचं केलं. नेमकं कुठल्यात केलं हे काही आठवत नव्हतं पण साधारण घटक आणि कृती माहीती होती. तर आज करून पाहीलं. फारच मस्त होतं. नक्की करून पाहा.

१२-१५ हिरव्या मिरच्या (नेहेमीच्या तिखटपणाकरता घेतो त्या किंवा लांब लांब पोपटी मिरच्या मिळतात त्या घेतल्या तरी चालतील)
पाऊण चमचा धणेपूड
अर्धा चमचा जिर्‍याची पूड
चवीनुसार मीठ
चिमूटभर कसूरी मेथी किंवा मेथ्या (अर्थात दोघांची चव वेगवेगळी असेल. मी कसूरी मेथी वापरली आहे; मूळ कृतीत दोन्हीही नाही, बहुतेक)
पाव चमचा हळद
एका मध्यम मोठ्या लिंबाचा रस
एक/दोन टेबलस्पून तेल

क्रमवार पाककृती: 

मिरच्यांची डेखं काढून; धूवून, पूसून एका मिरचीचे दोन भाग करावेत आणि प्रत्येक अर्ध्या भागाला उभ्यात एक चीर द्यावी म्हणजे मसाला आतवर नीट जाईल.
एखाद्या पॅन मध्ये तेल चांगलं तापू द्यावं आणि यात मिरच्या घालाव्यात. जरा परतल्या गेल्यात की सगळे मसाले घालावेत आणि अजून एक ३-४ मिनिटं मसाला तेलात चांगला होऊ द्यावा.
एका वाटीत हे प्रकरण काढावं आणि मग त्यात लिंबूरस घालून चांगलं कालवावं.
लोणचं तयार आहे. कुठल्याही भाजी-पोळीसोबत, कचौडी सोबत मस्त लागतं. किती टिकतं काही माहीत नाही. मी चांगल्या तिखट मिरच्या घेतल्या होत्या पण फायनल प्रॉडक्ट फार काही तिखट झालं नाही. सोसणेबल तिखट होतं.

Dhaniya-Mirch.jpgमिरची तूफान
ही एक अजून रिक्षा.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याप्रमाणे
अधिक टिपा: 

मिरच्या तेलात चांगलाच नाच करतात (चिरा दिलेल्या असल्यानी गरम तेल सगळ्या भागात जातं अन बिया फुटतात अक्षरश:!) सो जरा जपून

माहितीचा स्रोत: 
ऑनेस्ट किचन या युट्यूब चॅनल वर बहुधा बेडमी-पूडी च्या रेस्पीत त्या कूक नी हे झटपट लोणचं केलं
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाडावर मिरच्या यायला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी ही रेसिपी आली त्यामुळे मज्जा वाटतेय. घरात एकच माणूस मिरच्या, "मिरच्या" म्हणून खाऊ शकतो. त्याच्यासाठी पाच सहा मिरच्यांची करून पाहिन Happy
मला हे आवडलं की अमका तमका लोणच्याचा मसाला नाही आहे. नाहीतर अशा लोणच्याबिणच्याच्या भानगडीत आम्ह्/इ पडत नाही. सो गूड फाइंड. केवळ त्यासाठी फोटो नसताना कमेंटरूपी मार्क दिलेत. फोटो टाक नक्की Happy

इंटरेस्टिंग !
करून बघण्यात येईल.
आमचूर पावडरीची आयडिया बेस्ट आहे.

फौलहे हा रेसिपीत..
सणसणीत तापलेली लोखंडी कढई कुठे आहे?
Lol

करून खाणार! भारी दिसून ऱ्हायली!

शोधली मूळ रेस्पी. ह्या युट्यूब लिंक वर ०५:१६ पासून आहे.
थोडा काय बराच फरक आहे माझ्या अन त्याच्या रेस्पीत.
आता हे वर्जन करून पाहाणं आलं. पुढल्या आठवड्यात करीन आता.

वर दिलेली रेस्पी करून पाहून आवर्जून इथे कळवल्याबद्दल धन्यवाद!

मी अगदी साधे केले

मिर्च्या , मीठ , साखर , बेडेकर मसाला एक करुन लिम्बु पिळले व थोड़े तेल ओतले

योकु, आज मीही केले.पण (हा नेहमी असतोच) बडीशेप आणि धण्याचे प्रमाण जास्त झाल्याने कोरडे झाले.
IMG_20200721_094738_1.jpg