ऑनेस्ट किचन या युट्यूब चॅनल वर बहुधा बेडमी-पूडी च्या रेस्पीत त्या कूक नी हे झटपट लोणचं केलं. नेमकं कुठल्यात केलं हे काही आठवत नव्हतं पण साधारण घटक आणि कृती माहीती होती. तर आज करून पाहीलं. फारच मस्त होतं. नक्की करून पाहा.
१२-१५ हिरव्या मिरच्या (नेहेमीच्या तिखटपणाकरता घेतो त्या किंवा लांब लांब पोपटी मिरच्या मिळतात त्या घेतल्या तरी चालतील)
पाऊण चमचा धणेपूड
अर्धा चमचा जिर्याची पूड
चवीनुसार मीठ
चिमूटभर कसूरी मेथी किंवा मेथ्या (अर्थात दोघांची चव वेगवेगळी असेल. मी कसूरी मेथी वापरली आहे; मूळ कृतीत दोन्हीही नाही, बहुतेक)
पाव चमचा हळद
एका मध्यम मोठ्या लिंबाचा रस
एक/दोन टेबलस्पून तेल
मिरच्यांची डेखं काढून; धूवून, पूसून एका मिरचीचे दोन भाग करावेत आणि प्रत्येक अर्ध्या भागाला उभ्यात एक चीर द्यावी म्हणजे मसाला आतवर नीट जाईल.
एखाद्या पॅन मध्ये तेल चांगलं तापू द्यावं आणि यात मिरच्या घालाव्यात. जरा परतल्या गेल्यात की सगळे मसाले घालावेत आणि अजून एक ३-४ मिनिटं मसाला तेलात चांगला होऊ द्यावा.
एका वाटीत हे प्रकरण काढावं आणि मग त्यात लिंबूरस घालून चांगलं कालवावं.
लोणचं तयार आहे. कुठल्याही भाजी-पोळीसोबत, कचौडी सोबत मस्त लागतं. किती टिकतं काही माहीत नाही. मी चांगल्या तिखट मिरच्या घेतल्या होत्या पण फायनल प्रॉडक्ट फार काही तिखट झालं नाही. सोसणेबल तिखट होतं.
मिरची तूफान
ही एक अजून रिक्षा.
मिरच्या तेलात चांगलाच नाच करतात (चिरा दिलेल्या असल्यानी गरम तेल सगळ्या भागात जातं अन बिया फुटतात अक्षरश:!) सो जरा जपून
आज हमरे पास फटू हय. देताय
आज हमरे पास फटू हय. देताय जराटैम मे...
तोंपासु! फोटो काढलास तर हात
तोंपासु! फोटो काढलास तर हात झडतील काय रे योक्या तुझे!
ओके गुड
ओके गुड
झाडावर मिरच्या यायला सुरुवात
झाडावर मिरच्या यायला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी ही रेसिपी आली त्यामुळे मज्जा वाटतेय. घरात एकच माणूस मिरच्या, "मिरच्या" म्हणून खाऊ शकतो. त्याच्यासाठी पाच सहा मिरच्यांची करून पाहिन
मला हे आवडलं की अमका तमका लोणच्याचा मसाला नाही आहे. नाहीतर अशा लोणच्याबिणच्याच्या भानगडीत आम्ह्/इ पडत नाही. सो गूड फाइंड. केवळ त्यासाठी फोटो नसताना कमेंटरूपी मार्क दिलेत. फोटो टाक नक्की
फोटो कुठेय
फोटो कुठेय
आम्ही वाट बघतोय फोटोची..
आम्ही वाट बघतोय फोटोची.. येऊद्यात लवकर.
छान वाटतेय रेसिपी!
छान वाटतेय रेसिपी!
फटू! फटू!! फटू!!!
फटू! फटू!! फटू!!!
तो तळल्या गेलेला मसाला जाम
तो तळल्या गेलेला मसाला जाम मझा आणतोय. आत्ताच एक पोळी अन हे लोणचं न राहावून स्वाहा केलंय. टूक टूक!
जीवघेणा फोटो आहे, मस्तच.
जीवघेणा फोटो आहे, मस्तच.
छान व सोपं आहे.
छान व सोपं आहे.
मी करते हे लोणचे, खूप छान
मी करते हे लोणचे, खूप छान लागते मी आमचूर सुद्धा घालते.
छान रेसिपी.
इंटरेस्टिंग !
इंटरेस्टिंग !
करून बघण्यात येईल.
आमचूर पावडरीची आयडिया बेस्ट आहे.
फोटू मस्त
फोटू मस्त
फौलहे हा रेसिपीत..
फौलहे हा रेसिपीत..
सणसणीत तापलेली लोखंडी कढई कुठे आहे?
करून खाणार! भारी दिसून ऱ्हायली!
तोंडाला पाणी सुटला... लयभारी
तोंडाला पाणी सुटला... लयभारी प्रकार आहे ...
मस्त !
मस्त !
मी मिरचीखाऊ नाही, तरी करून
मी मिरचीखाऊ नाही, तरी करून बघितली रेसिपी. खूप आवडली. अजिबात तिखट नाही, मस्त टेस्ट आली.
मस्त आहे रेसीपी योकु . मोहरी
मस्त आहे रेसीपी योकु . मोहरी डाळ जरा सुद्धा घालायची नाही का?
मोहरी डाळ जरा सुद्धा घालायची
मोहरी डाळ जरा सुद्धा घालायची नाही का? >>> नोप
शोधली मूळ रेस्पी. ह्या
शोधली मूळ रेस्पी. ह्या युट्यूब लिंक वर ०५:१६ पासून आहे.
थोडा काय बराच फरक आहे माझ्या अन त्याच्या रेस्पीत.
आता हे वर्जन करून पाहाणं आलं. पुढल्या आठवड्यात करीन आता.
वर दिलेली रेस्पी करून पाहून आवर्जून इथे कळवल्याबद्दल धन्यवाद!
मी अगदी साधे केले
मी अगदी साधे केले
मिर्च्या , मीठ , साखर , बेडेकर मसाला एक करुन लिम्बु पिळले व थोड़े तेल ओतले
योकु, आज मीही केले.पण (हा
योकु, आज मीही केले.पण (हा नेहमी असतोच) बडीशेप आणि धण्याचे प्रमाण जास्त झाल्याने कोरडे झाले.
मीही केलं आज. छान झालंय.
मीही केलं आज. छान झालंय.