Submitted by सुप्रिया जाधव. on 11 July, 2020 - 14:39
मान्य आहे एकटे जगणे
जीव घेते एकटे पडणे
काढलेले चित्र तर आहे
राहिलेले चित्र रंगवणे
कंदिलाने काजळी धरली
प्राप्त आहे स्वच्छता करणे
प्रेम होते, मित्र तर राहू !
मारते इच्छे तुझे मरणे
मोजतो आहेस वेगाला
पाहिले नाहीस फरफटणे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुलेशु
पुलेशु