फूड चॅनलवरची ही रेसिपी मला माझ्या कलिगने दाखवली. मूळ रेसिपी मला खूप इंटरेस्टिंग वाटली नाही कारण ड्राय होती म्हणून मी आमच्या आवडीप्रमाणे मॉडिफाय केली.
जिन्नस- ४ पाईंट चेरी टोमॅटोज,
१/२ कप ऑलिव ऑईल,
लसणीच्या पाकळ्या - ४ ,५ मोठ्या- स्लाईस करुन किंवा बारीक चिरून,
हर्ब्ज- थाईम, पार्सले- ह्यांचा एक छोटा बॉक्स येतो ग्रोसरी स्टोअरला. त्यातले पूर्ण वापरायचे.
बेसिलची पानं- - भरपूर् /हवी तितकी. माझ्याकडे दोन कुंड्यांमध्ये लावलेलं आहे त्यामुळे मुबलक वापरता येतात.
मीठ आणि फ्रेश मिरपूड. लाल मिरच्यांचे फ्लेक्स.
पार्मेजान चीज- मूळ रेसिपीत भरपूर आहे पण मी तेवढं वापरलेलं नाही.
लिंग्वीनी किंवा स्पॅगेटी.
कृती- अतिशय सोपी आणि पटपट होणारी आहे.
प्रथम टोमॅटो धुवून निथळत ठेवावेत. एका पसरट पण जरा मोठ्या पॅनमध्ये अर्धा कप ऑऑ गरम करत ठेवावं. त्यात लसूण परतून त्यावर लगेच मीठ, थाईमची पानं, लाल मिरच्यांचे फ्लेक्स, मीरपूड घालून जरा परतावं. त्यावर निथळलेले टोमॅटो अख्खेच घालवेत. जरा शिजू द्यावेत. मग परतून त्यावर बेसील,पार्सले वगैरे घालावे. हे चालू असताना एकीकडे पास्ता पाकीटावरच्या इंस्ट्रक्शन्सप्रमाणे शिजवून घ्यावा. शिजला की ड्रेन करुन वरच्या पॅनमध्ये घालावा व सर्व करताना वरुन चीज घालावं.
ही मूळ रेसिपी- https://www.foodnetwork.com/recipes/ina-garten/capellini-with-tomatoes-a...
ह्यात तिने टोमॅटो शिजू देऊ नयेत्/फुटू देऊ नयेत म्हटलं आहेपपण त्याशिवाय त्याचं ज्यूस निघणार नाही आणि पास्ता ड्राय होईल म्हणून मी किंचित फुटू दिले आहेत. तसंच मी चीज पास्ता सॉसमध्ये न घालता प्रत्येकाला हवं तितकंच वाढलं.
चेरी टोमॅटोज आणि लिंग्विनी पास्ता
Submitted by सायो on 10 July, 2020 - 16:21
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख दिसतोय. ताजी हर्ब्स
सुरेख दिसतोय. ताजी हर्ब्स नाहीत सध्या पण ड्राईड आहेत.
पास्ता पण आहे; करून पाहायला हवी.
छान दिसते आहे. रेसिपीसाठी
छान दिसते आहे. रेसिपीसाठी धन्यवाद.
मस्त! सन ड्राइड टोमॅटो पण छान
मस्त! सन ड्राइड टोमॅटो पण छान लागतील असे वाटते ताज्या टोमॅटो ऐवजी.
सन ड्राईड कधी कधी खूप चामट
सन ड्राईड कधी कधी खूप चामट वाटतात. ताज्या टोमॅटोंचा थोडा रस निघतो त्यामुळे तेल आणि तो रस असा सॉस तयार होतो.
छाने रेसिपी
छाने रेसिपी
यात पेने पास्ता वापरून चांगली लागेल का?
मी अनू, नाही. पेन्ने टाईपच्या
मी अनू, नाही. पेने सारख्या पोकळ पास्त्याला सॉस असलेला चांगला नाहीतर खूप ड्राय वाटेल.
अहा... फोटो एकदम प्रोफेशनल
अहा... फोटो एकदम प्रोफेशनल दिसतोय. छान रेसिपी.
मी सध्या इन्स्टंट पॉटमध्ये पास्ता प्रयोग करण्याच्या विचारात आहे. जमलं तर ही रेसिपी त्यात ट्राय करेन.
मस्त रेसिपी. करुन पाहीन.
मस्त रेसिपी. करुन पाहीन.
वा! मस्त आलाय फोटो. करून
वा! मस्त आलाय फोटो. करून बघायला हवी.
मस्त.. करून बघणार. अनायसे
मस्त.. करून बघणार. अनायसे सगळं सामान पण आहे.
मस्तं.
मस्तं.
मी साधारण अशीच रेसिपी झुकिनी स्पायरल्स वापरून करते