Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:15
अडखळण्याचा अभाव नाही
पण पडण्याचा दबाव नाही
निघून जा तू घेऊन पाऊस
भिजणे माझा स्वभाव नाही
गाऊन थकलेलो होतो मी
सुरावटींचा बनाव नाही
रुक्षपणाची शर्यत आहे
गलबललो तर टिकाव नाही
खोद मुळाशी माती अलगद
उन्मळण्याचा सराव नाही
विचार घेऊन माघारी जा
मना तुझ्याशी लगाव नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"निघून जा तू घेऊन पाऊस
"निघून जा तू घेऊन पाऊस
भिजणे माझा स्वभाव नाही" --> बापरे!! जाम भारी दादा
"खोद मुळाशी माती अलगद
उन्मळण्याचा सराव नाही" --> मनच ठेचकाळलं बघा
छान...! लिहिते राहा.
छान...! लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे