लॉकडाउनपर्वातील बाकरवडी
बाकरवडी हा काही घरी करण्याचा पदार्थ नाही परंतू सध्याच्या मास्कपर्वात सर्व मिठाई - नमकिनवाले बंद असल्याने घरी प्रयोग केला.
स्रोत : रसोई शो, कलर्स गुजराथी चानेल, ४ जुलै, जयगौरीपार्वती व्रतानिमित्त आषाढ महिन्यांतले पदार्थ. तिकडे गौरीला उपवासाचे पदार्थांशिवाय असे चमचमीतही लागतात.
फोटो १
साहित्य
१) एक वाटी किसलेले सुके खोबरे,
२) धणे जिरे बडिशेप,तीळ,खसखस,लवंग,दालचिनी,शेंगदाणे थोडे,
३) लाल तिखट,मीठ,आमचूर,हळद,धणे पावडर,
फोटो २
४)चिंच कोळ/ पाणी
५) कणिक, मैदा आणि बेसन (१:१:अर्धा वाटी प्रमाण)
६)तळायला तेल
कृती
सारण
* क्रमांक (१ ) आणि (२) वेगवेगळे भाजून नंतर एकत्र करून भरड वाटल्यावर एक वाटीभर केले. त्यात क्रमांक (३) घालून बाकरवडीतील सारणाची चव आणायची.
* क्रमांक (५) थोडे मोहन घालून मळल्यावर त्याच्या चार पोळ्या करता येतात.
* पोळीवर चिंचकोळ लावून सारण चिकटवून गुंडाळी करुन कापून बाकरवड्या केल्या.
फोटो ३
त्या तळायच्या.
-----------
सूचना
तळून खुसखुशित करणे एक तंत्र आहे. चिंचकोळ फार पाणीदार लावल्यास वडी मऊ पडते बहुतेक.
कसल्या यमी दिसतायत.
कसल्या यमी दिसतायत.
अरे व्वा, सहीच दिसताएत
अरे व्वा, सहीच दिसताएत
छान
छान
लई भारी. .. एकदम झक्कास
लई भारी. .. एकदम झक्कास
बाकरवडी आवडलीच आणि पदार्थाना
बाकरवडी आवडलीच आणि पदार्थाना अनुक्रम देऊन कृती लिहिण्याची पद्धत सुद्धा आवडली.
इथे कोणीतरी बेक्ड बाकरवडि
इथे कोणीतरी बेक्ड बाकरवडि टाकलेली , तीच एकदा पाहिली बनवून पण तळणीची चव नाहि आली.
खुप छान
खुप छान
वाह!
वाह!
मस्त!
मस्त!
छान
छान
मस्त !
मस्त !
जमल्यात.
जमल्यात.
बारीक शेव पण घाला सारणात.
बारीक शेव पण घाला सारणात. चितळेच्या वडीचं उत्खनन केल्यास बरीच सापडते. लसणीचीही थोडी चव जाणवते.
चिंच आणि साखर मिक्सरमधे कोरडी फिरवून तेलात कालवून ती वापरा मिश्रण चिकटवायला. पाणी नको. त्यानं मऊ पडते.
वा वा अप्रतिम झाल्यात.
वा वा अप्रतिम झाल्यात.
शेव पण घाला सारणात.
शेव पण घाला सारणात.
होय. पण घरात शेव थोडीच उरलीय आणि अजून दहा दिवस किराणासुद्धा बंद आहे. कडक बंद आहे.
थेट गुज्जु बाकरवडी दिसतेय.
थेट गुज्जु बाकरवडी दिसतेय. जमलीय.
मस्त. रेसिपीही अगदी सोप्या
मस्त. रेसिपीही अगदी सोप्या पद्धतीने दिलीय.
अरे वा!! मला वाटायचे की या
अरे वा!! मला वाटायचे की या वड्या करायला, अफाट अफाट अवघड असतात. आता करुन बघेन.
मस्त जमलीये...
मस्त जमलीये...
फार छान दिसताहेत बाकरवड्या !
फार छान दिसताहेत बाकरवड्या !!
आई ग्ग काय दिसताहेत.. मी
आई ग्ग काय दिसताहेत.. मी दोनदा उचलून तोण्डात टाकायचा प्रयत्न केला..
बाकरवड्या माझ्या फार आवडीच्या. अगदी त्याला आपण भाकरवड्या म्हणतो त्या वयापासूनच्या.
लहान असताना आई व्हीटीला जॉबला होती तिथून कुठूनतरी आणायची. ती चव आजही मिस करतो. त्या लांबोकड्या आकाराच्या कव्हर किंचित कडक असलेल्या कधी आजही कुठे दिसल्या की लगेच घेतो आणि फसगत होते. ती चव आजवर पुन्हा कधी सापडली नाही.
बाकी चितळे स्टाईल सुद्धा आवडतात. त्यांनी या पदार्थाचा ब्राण्ड बनवला म्हणून विशेष कौतुक वाटते.
मस्त. मीपण केल्या होत्या
मस्त. फोटो एकदम टेम्प्टिंग आलाय.
मीपण केल्या होत्या लॉकडाउन दरम्यान एकदा. फक्त लवंग, दालचिनी, शेंगदाणे घातले नव्हते. मी मधुराज् रेसिपी वरून केल्या होत्या.
डोळ्यांत बदाम. मेधावि+१.
डोळ्यांत बदाम.
मेधावि+१.
मी केली आज.
मी केली आज.

वाह! मस्त!!
वाह! मस्त!!
बादवे, कुणाला मऊ पडलेली बाकरवडी खायला आवडते का? मला बाकरवडी, जिलेबी, चकली मऊ पडल्यावर अधिक आवडते.
@पुंबा मला आईसक्रीम किंचीत
@पुंबा मला आईसक्रीम किंचीत मायक्रोवेव्ह्स काढुन खायला आवडतं अगदी १५-२० सेकंदस.
@ सामो, छान झाली आहे.
@ सामो, छान झाली आहे.
-------
तो कलर चानेल voor app वर पेड आहे.
युट्युबवर हा एपिसोड आहे पण " not available in your country" म्हणजे काय?
बाकी केबल आणि डिशवर लागतोच.
बादवे, कुणाला मऊ पडलेली
बादवे, कुणाला मऊ पडलेली बाकरवडी खायला आवडते का? मला बाकरवडी, जिलेबी, चकली मऊ पडल्यावर अधिक आवडते. << जिलेबी अन चकली मउ पडलेली आवडते. विशेष करुन जिलेबीमधल्या ज्या मधे मधे गाठी येतात ना त्या फार आवडतात.