Submitted by प्रगल्भ on 2 July, 2020 - 22:55
मी अजुन सगळे लेख वाचलेले नाहीत 'बेफिकीर' यान्चे. गझल कशी लिहावी याबद्दल चे. तरिही ही एक गझल पेश करतो. मोह अनावर होतो म्हणून... नक्की कळावा ही गझल होऊ शकते का ते!!
होऊनी पिपासू चातक
वाट तिची बघतो
गर्द मेघांसरशी
गृहित तिलाही धरतो
हळव्या नाजूक हृदयी
ऊब तिला देतो
असेल तिला ठाव
मनाला सारखे सांगतो
रोजचं निळं आकाश
रितसर तिला देतो
अन मीच आमच्यामध्ये
‘तिर्हाईत’ म्हणवून घेतो
मिळतात सल्ले हल्ली
त्रास इतुकाच होतो
बोलणार्यांच्या तोंडी
मी 'बोलघेवडा' ठरतो
बोलून मनभर सारे
संवाद अबोल होतो
मिटल्या पापण्यांतून
थोडा रोज सांडतो
सांडलेले सारे वेचाया
आटोकाट प्रयत्न करतो
साठवू कोणासाठी, हा
प्रश्न शेवटी उरतो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बोलून मनभर सारे
बोलून मनभर सारे
संवाद अबोल होतो>>>>>>>
खूपच अप्रतिम आहे
"निशिकांत" यांची गझल वाचन करा
"निशिकांत" यांची गझल वाचन करा
बरच्या अर्थ पूर्ण असतात
माझ्या मेंदूत खोलवर ठसायला
माझ्या मेंदूत खोलवर ठसायला पाहीजे की गझल मधला शेर हा दोनच ओळींंचा असतो.
ते सवय झालीय चार ओळींचा लिहायची. मला दुपारीच लक्षात आलं होतं.पोस्ट केल्यावर.
मी वाचेन निशीकांत दादांच्या गझला!!
खूप छान...
खूप छान...
आवडली. स्तुत्य प्रयत्न. पण
आवडली. स्तुत्य प्रयत्न. पण कविता इतक्या छान करत आहात तर मग गझलचाच हट्ट कशाकरता? अभिव्यक्ती महत्वाची.