Submitted by सुप्रिया जाधव. on 25 June, 2020 - 23:38
काफिला गावाकडे जो चालला
पोचता, शहरास परतून लावला
अपयशावर आत्महत्या तोडगा ?
खेचतो ना उंच जाणारा झुला ?
भिंगरी स्थैर्यास होती बांधली
थांबल्यावरती गवसले मी मला
आपल्यांची फक्त होती वानवा
लॉकडाउनने उमगला मामला
शस्त्र नाही, रक्त नाही, युद्धही !
शांततेने डाव आहे साधला
वस्त्र विरहित मन कुठे कळते तुला ?
देह दिसतो मात्र कपड्याआतला
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह अशी दाद तरी कशी देऊ?
वाह अशी दाद तरी कशी देऊ?
गज़ल वाचताना अंगावर शहारा आला..
@मन्या +१०१
@मन्या +१०१
गज़ल वाचताना अंगावर शहारा आला
गज़ल वाचताना अंगावर शहारा आला.. >>>> +१
वस्त्र विरहित मन कुठे कळते
वस्त्र विरहित मन कुठे कळते तुला ?
देह दिसतो मात्र कपड्याआतला>>> सही!
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
वस्त्र विरहित मन कुठे कळते
वस्त्र विरहित मन कुठे कळते तुला ?
देह दिसतो मात्र कपड्याआतला>>> सही!
व्वाह!!!
व्वाह!!!
खुपच छान वस्तुस्थिति मांडलिये