Submitted by _तृप्ती_ on 5 June, 2020 - 02:44
जिथे मागण्या विरतात आणि संवेदना पोचतात
तिथे माझा देव
जिथे असण्याची प्रौढी नाही
अन नसण्याची भीती नाही
एकरूप, एकचित्त, एकतान
गवसे जिथे गाभारा मनीचा
तिथे माझा देव
तो असेल विठ्ठल, गजानन
किंवा येशू वा अल्ला
रंग जिथे एक होती
माझे मीपण गळे जिथे
तिथे माझा देव
उरे न कोणी आपला परका
न रंक कोणी न कोणी राजा
कुणी दुखवी न कुणा भावना
अनुभूती अशी मिळे जिथे
तिथे माझा देव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर!
सुंदर!
तृप्ती,
तुमच्या कवितेच्या निमित्ताने माडगुळकरांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी गायलेलं 'देव देव्हाऱ्यात नाही' हे गाणं आठवलं..