बाल्कनी गार्डन किंवा किचनच्या खिडकीजवळ म्हणजेच कमी जागेत लावण्यासाठी परिपूर्ण अशी गोष्ट म्हणजे microgreens (मायक्रोग्रींन्स). सर्वात सोप्पे, जलद आणि तेवढेच पोषकही.
Microgreens म्हणजे नक्की काय ?
एखादा रोपट्याची आपण बीपासून सुरुवात करतो. जेव्हा बिला अंकुर फुटत त्याला Cotyledon म्हणतात (जो बीचा एक भाग असतो), त्यानंतर true leaves (रोपट्याला येणारी पहिली पानं) येतात. आणि एकदा true leaves आल्यानंतर जर आपण त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला किंवा त्यांना harvest केलं तर त्यांना microgreens म्हणतात. microgreens दिसायलाही अगदी सुरेख असतात त्यामुळे microgreens मुख्यत्वे garnishing साठी, salads मध्ये अन्नाची पोषकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
Microgreens मध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील काही सोप्पे पर्याय म्हणजे मोहरी, पालक, मेथी, गाजर, कोथिंबीर, lettuce इत्यादी. ह्यांच्या बिया ४-५ इंच खोली असलेल्या मातीच्या भांड्यात किंवा ट्रेमध्ये दाटीवाटीने लावाव्या. प्रखर ऊन मिळणाऱ्या खिडकीजवळ हे भांड ठेवाव.आणि ७ - १४ दिवसांमध्ये microgreens कधीही हार्वेस्ट करावे. Cotyledon, true leaves आणि steam ह्या तिन्ही गोष्टींनी microgreens तयार होतात. ह्यात मुळांचा समावेश नसतो.
मोठ्या रोपट्याची छोटीशी प्रतिकृती म्हणजेच microgreens
म्हणजे मुळं कापून टाकायची ना?
म्हणजे मुळं कापून टाकायची ना? मस्त दिसतायत. कोवळ्या पानांची चव वेगळी लागत असेल.
खरचं भारी आहे..मी मेथी आणि
खरचं भारी आहे..मी मेथी आणि कोथिंबीर लावली होती..मेथी चांगली वाढली पण काय माहित काय झालं कोथिंबीर लागलीच नाही..
भाजीपाला लावायचा विचार चालू आहे घरी पण त्याबद्दल माहिती काहीच नसल्यामुळे अडचणी येतं आहेत..एखादा धागा असेल भाजीपाला गार्डन चा तर कृपया येथे द्या..
छान लेख हे पण मला करता येइल.
छान लेख हे पण मला करता येइल.
छान माहिती. घरच्या घरी भाज्या
छान माहिती. घरच्या घरी भाज्या मिळवा. लॉकडाऊन मध्ये आणि नेहमीच.
अशी मेथी वाळूत लावतात
अशी मेथी वाळूत लावतात
छान पोस्ट आहे अक्षता
छान पोस्ट आहे अक्षता
या पावसाळ्यात करून पाहेन.
उपयुक्त माहिती,धन्यवाद
उपयुक्त माहिती,धन्यवाद
@अमृताक्षर- धने अख्खे नाही पेरायचे, लाटणं किंवा हाताने चुरडून मगच लावायचे
@वावे
@वावे
होय. Microgreens मध्ये मूळ घेतली जात नाहीत. होय खरंच. ताज्या कोवळ्या पानांची चव खुप छान लागते
@अमा
धन्यवाद
नक्की लावा. १-२ आठवड्यात तयार होतात
@किशोर मुंढे
धन्यवाद
होय. खरंच. आणि आपण लावलेल्या भाज्यांची चव वेगळीच असते
@mi_anu
धन्यवाद
नक्की लावा !!
@तेजो
धन्यवाद
सहमत (@अमृताक्षर- धने अख्खे नाही पेरायचे, लाटणं किंवा हाताने चुरडून मगच लावायचे)
@अमृताक्षर
@अमृताक्षर
धन्यवाद
मेथी, पालक, कोथिंबीर लावण्यास अगदी सोप्पी आहे
कोथिंबीर न germinate होण्याची बरीच कारणं आहेत
१. जे धणे वापरत आहात त्यांचे दोन भाग करुन घ्यायचे(slight crush करायचे)
२. धण्यांचा germination rate कमी असल्यास
३. सुर्यप्रकाश न मिळाल्यास
@BLACKCAT
माहितीबद्दल धन्यवाद
सुंदर तजेलदार फोटो पण नक्की
सुंदर तजेलदार फोटो पण नक्की कुठली रोपं आहेत ती? प्रत्येक फोटोला नाव द्या ना म्हणजे कळेल.
रोपे ओळखा स्पर्धा
रोपं ओळखा स्पर्धा.
@वर्षा
@वर्षा
धन्यवाद
पहिल छायाचित्र - मोहरी
दुसरं आणि तिसर छायाचित्र - पालक
होय. पुढच्या वेळेपासून नक्की (प्रत्येक फोटोला नाव द्या ना म्हणजे कळेल.)
@किशोर मुंढे
@किशोर मुंढे
हाहाहाहाहाहाहाहाहाहा
Guess the plants
छान आणि उपयुक्त
छान आणि उपयुक्त
बिगरीतील प्रश्न : माती , कुंडी आणि बिटाच्या बिया कुठून मिळवल्यात हे सांगू शकाल का ?
@जाई.
@जाई.
माती , कुंडी आणि बिटाच्या बिया ह्या सगळ्या गोष्टी online shopping site/ online nursery वर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु, स्थानिक नर्सरी मध्ये ह्याच वस्तू कमी किंमतीत मिळतात.
धन्यवाद अक्षता.
धन्यवाद अक्षता.
(No subject)
माझ्याकडचे Microgreens.... गहू
@sonalisl मस्तच !!
@sonalisl
मस्तच !!
हा लेख आठवून कानफुटक्या कपात
हा लेख आठवून कानफुटक्या कपात मेथी च्या बिया आणि बिर्याणी बाय किलो च्या पार्सल साठी आलेल्या मडक्यात धणे लावले.दोन्ही व्यवस्थित आले.अर्थात कोथिंबीर फोटो काढण्या पूर्वीच पोह्यांवर घालून संपली.हा मेथीचा फोटो

मेथी खूप फास्ट आली.शक्य झाल्यास मायक्रो ग्रीन च्या बऱ्याच कुंड्या करून रोटेशन करायचा विचार आहे.फार कष्ट लागत नाहीयेत.