राहिले कसे पाहिजे ?

Submitted by मनोजकुमार देशमुख on 29 May, 2020 - 05:42

बोलले कसे पाहिजे? चालले कसे पाहिजे?
सांगा दुनियेत मला, राहिले कसे पाहिजे ?

चेहऱ्यावरी मुखवटे साऱ्यांनीच घातले
मी चेहऱ्यास माझ्या, झाकले कसे पाहिजे?

मी अर्थ काय लावू त्यांच्या शुभ्र कपड्यांचा?
जमते सहजच ज्यांना, मारले कसे पाहिजे?

दुनियेचे आघात झेलतो हसत मी सारे
घाव आपल्यांचे ते, सोसले कसे पाहिजे?

वेदनांच्या गर्दीत आहेत हरवले कुठे
सुखांच्या क्षणांना त्या, शोधले कसे पाहिजे?

नाही वागायचे चुकीचे मी ठरवले होते
नियमाला माझ्या या, मोडले कसे पाहिजे

अंदाज न घेताच हा लावतो जीव माझा
सवयीस याच माझ्या, सोडले कसे पाहिजे?

Group content visibility: 
Use group defaults

>>>>>अंदाज न घेताच हा लावतो जीव माझा
सवयीस याच माझ्या, सोडले कसे पाहिजे?>>>> वाह!!! क्या बात है!! देअर इज नो एस्केप. हे जीव लावणं, नंतर तुटणं, परत जीव लावणं - याला उतारा नाही. निदान भावनाप्रधान लोकांकरता तरी नाही.