Submitted by किमयागार on 28 May, 2020 - 03:30
वाटा तश्या जुन्या या मी चालतो नव्याने
स्वप्ने तशी जुनी ती मी पाहतो नव्याने.
जखमा तुझ्या मनीच्या जी मांडते मुक्याने
ती लेखणीच हल्ली मी टाळतो नव्याने.
दिधली जिने उभारी दिधला जिने दिलासा
ती साथ त्या सुरांची मी मागतो नव्याने.
होऊन रातराणी गंधाळतेस जेव्हा
ती रात्रही सुगंधी मी जागतो नव्याने.
तू टाळतेस आता जे सांगणे जगाला
डोळ्यातुनी तुझ्या ते मी वाचतो नव्याने.
----------मयुरेश परांजपे----------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Nice
Nice
मी नव्याने हा रदीफ असायला हवा
मी नव्याने हा रदीफ असायला हवा इथे.....सगळीकडे मी असं घेतलंय तर हरकत नसावी
छान आवडले.
छान आवडले.