डोह !

Submitted by Swati Karve on 28 May, 2020 - 00:46

डोह !

डोळ्यात तुझ्या पाहताना…
नजरेत तुझ्या सारे काही वाचताना …
नजरेतूनच सारे काही सांगताना …
हृदयाची धड धड वाढत असताना…
खर तर खूप तारांबळ होत असते …
कधी स्वतःला हरवणे असते ..
कधी नव्याने सापडणे असते ….

डोहात तुझ्या चिंब होताना …
डोहाचा आभासी तळ गाठल्यानंतर ,
ती अथांगताना अनुभवताना…
त्या उत्कट स्पंदनांच्या जाणिवेत जगताना…
खरंतर खूप गोंधळून जायला होते …
डोहाचा तळ गाठावा कि मोह आवरून ,
स्वतःला सावरावे या संभ्रमात मन असते…
डोहाचा तळ गाठणे म्हणजे,
स्वत्व विसरून स्वतःला गमावणे असते …
आणि स्वतःला सावरणे म्हणजे,
मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या डोहाला मुकणे असते ...

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान