शौच - सकाळी, रात्री कि प्रेशरनुसार? पाश्चात्य कि भारतीय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2020 - 17:56

हा धागा टवणे सरांच्या आंघोळ धाग्यातील चर्चेच्या ओघात विषय आला म्हणून स्वतंत्र चर्चेला घेतला असला तरी विरंगुळा वा विडंबन या कॅटेगरीत चर्चा अपेक्षित नाही. झाल्यास हरकतही नाही.

लहानपणापासून मनावर ठाम कोरलेले की सकाळी उठल्यावर दात घासायचे, मग टू नंबरला जायचे, मग आंघोळ आणि त्यानंतर न्याहारी. कॉलेजला जाईस्तोवर यात कधीही खंड पडला नाही. जे लोकं कधीही प्रेशर आले की जायचे ते मला बेशिस्त वाटायचे. एक भाऊ होता जो रोज रात्री झोपायच्या आधी जायचा त्याला मी शौचालयातले घुबड असे नाव ठेवले होते. एकूणच कुठली वेगळी सिस्टम मला पटलीच नव्हती.

मग कॉलेजला गेलो. कधीही लेक्चरला जाऊ लागलो. हॉस्टेलला राहू लागलो. विकेंडला, पीएलमध्ये, रात्र रात्र जागरण करू लागलो. एकूणच दैनंदिन व्यवहाराचे ताळतंत्र बिघडले. सवयीनुसार सकाळी जायचे आणि पाणी ओतून यायचे. खरे काम मात्र दिवसभरात कधीही होऊ लागले.

कॉलेज संपले ऑफिस सुरू झाले. आता सकाळी वेळेवर ऑफिसला जातो. माझ्या मूळ सवयी आणि संस्कारांप्रमाणे सकाळचा टाईम फिक्स करण्यास काही हरकत नव्हती. मात्र सकाळी ती पंधरा मिनिटे तिथे आजाs आजाss करण्यापेक्षा बिछान्यात लोळत पडलेले काय वाईट. तेवढेच पंधरा मिनिटे झोप जास्त या विचाराने ती सवय मोडली. मग ऑफिसला गेल्यावर कामाच्या नादात जेव्हा सुचेल, वेळ मिळेल, खरेच प्रेशर येईल, किंवा काम करून बोअर होईन तेव्हा चेंज म्हणून असे कधीही जाऊ लागलो. घरी तर शक्यतो सुट्टीच्या दिवशीच जाणे होऊ लागले आणि ते ही अर्थात केव्हाही. कारण सुट्टीच्या दिवशी मुळातच झोपायचा आणि ऊठायचा टाईम पार गंडलेला असतो.

आता यातही घरात ईंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकार आहेत. घरी आवर्जून भारतीय बैठकच वापरतो. पण ऑफिसमध्ये पर्याय नसल्याने वेस्टर्नच वापरावी लागते. म्हणजे एकंदरीत वेस्टर्न पद्धतीचा वापर जास्त होऊ लागला आहे, जे प्रेशर पुर्ण हलके करायच्या अनुषंगाने परिणामकारक तसेच सहज सुलभ नसते. मुळातच आतड्यापोटाचे आजार असलेल्या मला हे जास्त घातक वाटते.

आता काही दिवसांनी नवीन घरात शिफ्ट झाल्यावर तिथे मात्र दोन्ही पाश्चात्यच बैठकी असल्याने प्रकरण आणखी अवघड होणार आहे. लहानपणीच्या सारया सवयी, संस्कार आणि पद्धती बदलून जाणार आहेत. त्यामुळे एकूणच जगभरात काय पाळले जाते हे जाणून घेण्यास उत्सुक.

मला कल्पना आहे की या विषयावर आपल्याकडे उघडपणे बोलायला संकोचतात. त्यामुळे येणारया प्रतिसादांचे विशेष आभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूस जितका वेळ शौचालयात घालवतो त्याच्या दहा टक्के वेळात तो नव्वद टक्के शौच करतो आणि उरलेला नव्वद टक्के वेळ उरलेली दहा टक्के शौच बाहेर काढण्यात घालवतो....

त्यामुळे नव्वद टक्के शौच झाले कि बाहेर पडावे... परत प्रेशर आले कि परत जावे... उगाच वेळ वाया घालवू नये...

च्रप्स हो यात तथ्य आहे. पण नको त्या वेळी कळ मारली तर या भितीने ते वरचे दहा टक्के बॅलन्स ठेवणे काही लोकांना भितीदायक वाटत असेल. तसेच शेवटी ती शरीराने उत्सर्जित केलेली घाणच, ती पोटात घेऊन का फिरा असाही दृष्टीकोण असेल.

आणि वेळेचा मुद्दा म्हणाल तर तो असतो लोकांकडे. जे सकाळी जातात ते आरामात झोप उडवत बसतात. ऑफिसमध्ये जातात ते ऑफिसटाईममध्ये आपण काम न करता तिथे बसून मोबाईलवर टाईमपास करतोय असा विचार करण्यातच धन्यता मानतात. आणि मोबाईल सोबत नसला तरी या धकाधकीच्या जीवनात तो आपला एक पर्सनल टाईम एक पर्सनल स्पेस असते. मला कित्येक धागेही तिथे बसल्याबसल्याच सुचतात.

प्रवासात घाईची लागली अन शौचालय (ओपन एअर सोय सुद्धा चालेल) उपलब्ध नसेल तर या कल्पनेने मला अस्वस्थ होते.आयबीएस मुळे ते अधिक त्रासदायक वाटते.

कटप्पा सर, च्रप्स सर आणि ऋन्मेष सर आपण एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. इथे सर्वांनी वरून व्यक्त व्हावे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अविष्कार अनुभवावा हीच अपेक्षा.
आमच्या सरांच्या सुपीक डोक्यातून (फक्त) कधी काय प्रसवेल याचा नेम नाही. उगीचच फॅनक्लबात नाही.
दंडुकेवाले ताई दादा, भक्त सरांचे धागे वर काढणारच. या कारणावरून मंदीरातून बाहेर काढू नये ही विनंती.

हल्ली गुढग्याच्या इ आजारी लोकांना वेस्टर्नच सांगतात

मलादेखील वेस्टर्न आवडू लागले आहे, नवीन घरी हेच आहे

क्या बात.. ह्याच्यावर कडी करेल असा काही धागा बघायला मिळेल अशी शक्यता नसल्याने मी सुडोमिमो.

हेच बघायचं बाकी राहिलं होतं मायबोली वर....
धागा उघडुन "काय लिहिलय तरी काय बघु" असं वाटलं यातच ऋन्मेऽऽष साहेबांचे यश सामावले आहे..
धागा जोरात पळणार हे नक्की.... कंटाळा आला की अधुन मधुन येउन वाचत जाईन म्हणते Wink
.
.
.
.
अरेच्चा हा तर जुना धागा आहे.. तारीख पाहिलीच नव्हती... इतका ज्वलंत विषय असुन इतका ओस कसा काय ?

आता यातही घरात ईंडियन आणि वेस्टर्न दोन्ही प्रकार आहेत.
>>>>
जुना धागा आहे. तेव्हा मुंबईच्या घरांमध्ये, तसेच भाड्याच्या घरामध्ये असे दोन्ही पर्याय होते.
आता मात्र नवीन घर घेतले आहे तिथे दोन्ही बाथरूममध्ये वेस्टर्नच आहेत. ऑफिसमध्ये वेस्टर्नच. कुठे फिरायला गेले तरी मॉल, हॉटेल सगळीकडे वेस्टर्नच असतात. थोडक्यात भारतीय पद्धत माझ्यासाठी तरी लोप पावली आहे.
वेस्टर्नचा सर्वात मोठा फायदा, मोबाईल हातात घेत तासनतास बसता येते.

फक्त मोबाईल पडला तर लाकूडतोड्याच्या गोष्टीप्रमाणे कुणीतरी सोन्याचा मोबाईल वर आणून देईल. विशेष म्हणजे तो आपलाच असण्याची शक्यता आहे!

इंडियन मध्येही मोबाईल घेऊन बसता येते की >> तासनतास असेही म्हटलेय त्यात..

तसे परीक्षेच्या वेळी पुस्तक घेऊन जावे लागायचेच. स्पेशली फॉर्म्युले पाठ करायची उत्तम जागा. ईंजिनिअरींगचे सारे फॉर्म्युले मी तिथेच पाठ केलेत.

सर लोकोत्तर पुरुष रात्री रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात अभ्यास करत असे वाचले होते, पण आपण त्यांच्याहीपेक्षा लोकोत्तर आहात
आपल्या गौरवशाली ग्रंथात आपण कुठे बसून (हे महत्वाचे )आणि कसा अभ्यास केला हे प्रकरण तपशीलवार टाकूया

आशू Rofl

कॉलेजलापण जायचा की तिथेच असायचा. >>>> कॉलेजच्याच शौचालयात. परीक्षेच्या आदल्या रात्री कॉलेजलाच अभ्यासाला जायचो. लास्ट नाईट स्टडी असल्याने त्यातही अर्धी रात्र पत्ते कुटण्यात घालवली असल्याने, सकाळी एकेक मिनिट महत्वाचे. त्यात माजा कोटा जड. मला अर्धा तास आत बसायची सवय. त्यामुळे नाईलाज असायचा. आतही अभ्यास करावाच लागायचा. अर्थात ईंजिनीअरींगचे जाडजूड पुस्तक न्यायचो नाही, पण फॉर्म्युले एका बारीक वहीत लिहिलेले असायचे, ती न्यायचो.

का कोण जाणे, आशुचँपच्या सतत सर सर म्हणल्याने मला अमोल पालेकरच डोळ्या समोर आला. आशुचे लिखाण मी अमोल पालेकरच्या आवाजात कल्पुन ऐकले. Rofl

https://www.youtube.com/watch?v=BG2OeRzUHYg

स्वच्छतागृहात बसून पुस्तकं/पेपर वाचणे, बोलणे, फोन घेऊन बसणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच वाईट आहे. तिथे वेळ काढणे जमते तरी कसे?

लवकरात लवकर कार्यभाग आटपून बाहेर येऊन हातपाय स्वच्छ धुवावेत हे आरोग्यदृष्ट्या संमत आहे.

माझ्या एका मैत्रीणीकडे माझे एक पुस्तक होते. तिचा नवरा रोज आत नेऊन पुस्तकं वाचतो समजल्यानंतर मी बाहेरच्यांना पुस्तकं देणंही थांबवलं.

ईंजिनीअरींगचे जाडजूड पुस्तक न्यायचो नाही, पण फॉर्म्युले एका बारीक वहीत लिहिलेले असायचे, ती न्यायचो.>>

याला म्हणायची कल्पकता, दूरदृष्टी आणि व्यासंग

प्रतिभासाधनेच्या मार्गात येणाऱ्या अवजड गोष्टी टाळून त्यावर पर्याय कसा शोधावा हे सरांकडून शिकण्यासारखे आहे

स त कुडचेडकर यांच्यानंतर केवळ सर च फक्त

Pages