Submitted by शैलपुत्री on 17 May, 2020 - 23:29
ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन, 'कोरोना'शी झुंज संपली.. भावपूर्ण श्रद्धांजली..
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नौटंकी काय बातमी दिलीत हे
नौटंकी काय बातमी दिलीत हे खूप वाईट झाले .
जावई माझा भला नाटक मध्ये मी काम केले होते इकडे मंडळात .
एक चांगला नाटककार गमावला आज महाराष्ट्राने .
हो,अतिशय वाईट बातमी
हो,अतिशय वाईट बातमी
वाईट झालं, भावपूर्ण
वाईट झालं, भावपूर्ण श्रध्दांजली.
(No subject)
एक मायबोलीकर जया एम यांनी
एक मायबोलीकर जया एम यांनी रत्नाकर मतकरी यांची घेतलेली मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=kqsNethkfKw&feature=share&fbclid=IwAR3Io...
मतकरी यांना भावपूर्ण
मतकरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली....
नुकतीच त्यांची अॅडम वाचली.
नुकतीच त्यांची अॅडम वाचली. मराठीत असे काही प्रथमच वाचले. धाडसी वाटले.
भावपूर्ण श्रद्धांजली....
रत्नाकर मतकरींशी गप्पा..https
रत्नाकर मतकरींशी गप्पा..
https://www.youtube.com/watch?v=SITn_T_8jjA
मतकरी
मतकरी
नवीन पिढीत त्या दर्जाच्या गूढकथा लिहिणारे कोणी मराठी लेखक असल्यास सुचवा. मागच्या आठवड्यातच गहिरे पाणी परत वाचत होतो .
भावपूर्ण श्रद्धांजली. माझा
भावपूर्ण श्रद्धांजली. माझा आवडता लेखक.
कोरोना अजून काय काय आपल्यापासून हरपणार आहे काय माहीत.
रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण
रत्नाकर मतकरी यांना भावपूर्ण आदरांजली.
खेकडा वाचल्यावरच त्यांचा फॅन झालो होतो.
त्यांच्या गूढकथा व भयकथांचा प्रकार पूर्ण वेगळा होता.
भयकथा, गूढकथा व्यतिरिक्त त्यांचे इतर साहित्य सुद्धा आवडायचे.
वास्तविक मतकरी यांच्या गूढकथा व नारायण धारप यांच्या भयकथा यांच्यात फरक आहे, पण का कोण जाणे मला ते नारायण धारपांचे शिष्य वाटायचे.
सकस साहित्य लिहीणार्या लेखकास मुकलो.
त्यांच्या गूढकथा व भयकथांचा
त्यांच्या गूढकथा व भयकथांचा प्रकार पूर्ण वेगळा होता >>> त्या वास्तवदर्शी असल्याने मेंदूला भिडायच्या वाचकांच्या
खूप गुणी लेखक.त्यांची
खूप गुणी लेखक.त्यांची प्रत्येक गूढकथा हा एक नवा अनुभव आहे.सामाजिक कथा(म्हणजे थोड्या औपरोधीक शैलीत लिहिलेल्या समस्यांवर गोष्टी) पण खूप शिकवून जातात.
एक H I V झालेल्या अशिक्षित सुतार मुलाची कथा आहे.मनाला भिडणारी.
वेश्या वस्तीत चुकून हॉस्पिटलची जागा घेतलेल्या, गुंडाचे त्रास होणाऱ्या आणि तरीहि शेवटी त्या गरीब वेश्यांसाठी दवाखाना चालूच ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या एका डॉक्टर ची कथा पण नक्की वाचावी अशी आहे.
गूढ/भयकथा तर बेस्ट.कबंध, ऐक टोले पडतायत, निर्मनुष्य, रंगांधळा, फाशी बखळ कोणतीहि घ्या.वाचल्याशिवाय खाली ठेवणारच नाही.
मतकरींना चतुरस्रतेचे वरदान
मतकरींना चतुरस्रतेचे वरदान लाभले होते.
A Life lived well !
'चतुरस्रतेचे वरदान '-- अगदी
'चतुरस्रतेचे वरदान '-- अगदी सहमत.
आणि प्रखर सामाजिक भानही.
सभापरिसंवादातून त्यांचा वावर जवळून पाहाता आला. त्यांच्या कामात छोटासा सहभाग देण्याची संधी आली होती, प्राथमिक कामही झाले होते पण काम पुढे नाही जाऊ शकले. लोककथा78 चासुद्धा खूप प्रभाव पडला होता. बालनाट्याच्या क्षेत्रातले त्यांचे भरीव योगदान पायाभूत असे आहे. शेक्सपिअरचे एक सवैररूपांतरित नाटकही आवडले होते.
श्रद्धांजली
>> गूढ/भयकथा तर बेस्ट.कबंध,
>> गूढ/भयकथा तर बेस्ट.कबंध, ऐक टोले पडतायत, निर्मनुष्य, रंगांधळा, फाशी बखळ कोणतीहि घ्या.वाचल्याशिवाय खाली ठेवणारच नाही.
>> Submitted by mi_anu on 18 May, 2020 - 13:45
+१११ अगदी अगदी!
"आता पाच मिनिटापूर्वी देवळात जातो, तर सगळीकडे लख्ख प्रकाश– पल्याडच्या डोंगरांचा रंग तांबूस काळपट! अन् हे ऽ उन्हाचे चट्टेच्या चट्टे! अन् एवढ्यातल्या एवढ्यात, म्हणजे दर्शन करून घंटी बडवून बाहेर येतो तोवर अंधारायला लागलेलं. म्हणजे गंमतच आहे!"
मतकरींच्या एका कथासंग्रहात कधीकाळी कॉलेजमध्ये असताना वाचलेले हे वर्णन. का कुणास ठावूक मनात कायमचे राहून गेले होते हे दृश्य. काही काही लेखकांच्या काही ओळी मनात उगाचच कायमच्या राहून जातात. हे त्यापैकीच एक. इतकी वर्षे अधूनमधून हे आठवत असे. पण मतकरींच्या नेमक्या कोणत्या पुस्तकात वाचले ते मात्र आठवत नव्हते. आज मतकरी गेल्याची बातमी वाचली. मन खिन्न झाले. मग झपाटल्यासारखे शोधून काढले. "रंगांधळा" मधल्याच एका कथेत हे होते. किती कित्ती वर्षांनी पुन्हा वाचले. मतकरींच्या पुस्तकांचे वेड लागले होते तेंव्हा. लायब्ररीत पुस्तक बदलून आणायला गेलो कि दोन मधले एक पुस्तक मतकरींचेच असणार. अतिशय खिळवून ठेवणारे लिखाण. काही उतारे असे कायमचे मनात राहून गेलेले.
त्यांच्या अजून एका कथेतला नायक आठवतो. त्याच्या मनाची सतत दोलायमान अवस्था होत असते (मानसिक आजार कि कायसे). तो आपल्या प्रेयसी कि बायकोसमवेत असतो. ती झोपलेली असते आणि हा तिच्या चेहऱ्याकडे पाहत असताना मतकरींनी त्याच्या मनातले विचार फार फार प्रभावीपणे मांडले होते. मला जसेच्या तसे आठवत नाही पण साधारणपणे असे काहीसे:
"...किती सुंदर आहे ही. हिच्याकडे पाहिल्यावर सारी सारी दु:खे विसरून जायला होते. जगावे तर हिच्यासाठीच. हिला आयुष्यात काहीही कमी पडू द्यायचे नाही. खूप खूप काळजी घ्यायची हिची नेहमी. तिचे ते ओठ किती नाजूक आहेत. आणि चाफेकळी सारखे कोरीव नाक. आणि त्या गोऱ्या गोऱ्यापान गुलाबी गालांवर काळ्याभोर मुलायम केसांच्या बटा कशा अलगदपणे रूळताहेत. मेलीच पाहिजे. नालायक कुठली. जगणे हराम करून सोडलेय हिने माझे. आत्ताच्या आत्ता मेली पाहिजे ही. या दोन हातांचा फास हिचा गळयाभोवती आवळून मला हिचा जीव घ्यायला हवा आताच्या आता. हिला जिवंत सोडून उपयोगाचे नाही...."
इतके प्रभावी धक्कातंत्र मतकरी फार लीलया साधत. त्यांच्या अनेक कथांमधून स्तिमित करणारे असे प्रसंग खिळवून ठेवत. कॉलेज जीवनात भुरळ घातलेल्या एक प्रभावी लेखक आज निघून गेला. वाईट वाटले. श्रद्धांजली
एका प्रतिभाशाली साहित्यिक आणि
एका प्रतिभाशाली साहित्यिक आणि नाटककाराला भावपूर्ण श्रध्दांजली !
रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा, भय कथा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या सामान्य माणसांकडून / माणसांबाबतीत असे घडू शकते असे वाटणाऱ्या प्रकारातल्या असत. त्यामुळे मनात निर्माण होणारी भीती तात्पुरती का होईना खरी असे. त्यांच्या भयकथांमध्ये काल्पनिकतेकडे झुकणारा बीभत्स रस नसे.
श्रध्दांजली..
श्रध्दांजली..