कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून नेटवर अनेक उपाय सापडतील.
१) कांदा कापताना आधी अर्धा करून लगेच पाण्यात टाका. आणि नंतर कापा. हा उपाय बरेच जण सांगतात. हे करून पाहिलं पण मला तरी काही काही फरक पडला नाही.
२) कांदा आधी काही वेळ फ्रीज मधे ठेवा. याचे काही प्रयोग करून पाहीले आणि योग्य वेळ जमली तर हा उपाय नक्कीच उपयोगी पडला.
आता कायम फ्रीज मधे १-२ कांदे असतात. जे कमीत कमी एक दिवस अगोदर पासून फ्रीज मधे असतात. ते कापताना अजिबात डोळ्यात पाणी येत नाही. एक कांदा वापरला की पुढील उपयोगासाठी पुन्हा दुसरा ठेवून देतो. कांदे न सोलता थेट तसेच ठेवतो.
थोडा वेळ कमी असेल तर , कापायच्या अगोदर १ तास फ्रीजर मधे ठेवला तरी हा परिणाम साधता येतोय. पण १ तासापेक्षा कमी वेळ ठेवला तर मात्र थोडेसे पाणी आलेच. थोडक्यात असे दिसतेय कि हा उपाय यशस्वी होण्यासाठी कांदा पुरेसा आतून थंड झाला असला पाहिजे.
मार्केटींग अफवा असेल. एवढा
मार्केटींग अफवा असेल. एवढा बावळट नसतो कुठलाच पुरुष >> +१
Prank म्हणून करत असेल तरी चू** आहे मग.
तोंडात काहीतरी चावत असताना
तोंडात काहीतरी चावत असताना कांदा कापला तर अजिबात पाणी येत नाही डोळ्यातुन. मी थोडीशी बडीशेप चावत राहते कांदा कापताना.
Ajay sir, do u happen to
Ajay sir, do u happen to check your mails which has been sent to the mail id which is there in संपर्क in your माबो profile?
आमच्याकडे म्हणतात सासुचं
आमच्याकडे म्हणतात सासुचं जास्त प्रेम असेल (कांदा कापणार्यावर) तर कांदा कापताना डोळ्यांना झोंबतो.
अजय तुमच्याकडे हा tear free
अजय तुमच्याकडे हा tear free कांदा मिळाला तर पहा.
Pages