थोडासा रफू करके देखिये.............. गुलजार साहेब

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 12 May, 2020 - 14:37

थोडासा रफू करके देखिये ना
फिर से नयी सी लगेगी
जिंदगी ही तो है......... गुलजार

आयुष्य खरच एक न उलगडणार कोड ! आयुष्याला कुणी विस्तीर्ण आकाशाची उपमा दिली आहे तर कुणी खोली न मोजता येणाऱ्या समुद्राची. पण व्यक्तिश: मला मात्र गदिमानी दिलेल्या सुख आणि दु:ख यांच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र म्हणजे आयुष्य ही उपमा सार्थ वाटते.

हे वस्त्र परिधान करून माणूस जन्माला येतो आणि आयुष्याचा मार्गावरून त्याचा प्रवास सुरु होतो. पण हे वस्त्र, कोणत्याही कारणाने मग तो खाद्या छोट्याशा दु:खाचा प्रसंग असो किंवा नातेसंबधातील तणाव असो , जीर्ण होऊ लागते. फाटू लागते. पण एखाद्या छोट्याशा कारणाने आयुष्यरूपी वस्त्राला छेद गेला म्हणून ते टाकून थोडेच द्यायचे असते? त्याच वस्त्राला रफू करायचे आणि ते पुन्हा नव्याने वापरू लागायचे जसे काही ते जीर्ण नव्हतेच. जरा सा रफू करके देखिये ना फिर से नयी सी लगेगी !

शेवटच्या ओळीत गुलजारजी लिहितात “ जिंदगीही तो है” आयुष्य किंवा त्याच्या संकटांचे अवडंबर माजवण्याचे कारण नाही. आयुष्य साध आणि सहज आहे. जसे वस्त्र रफू करून वापरू शकतो तसेच आयुष्य छोट्या मोठ्या गोष्टींच्या कडे दुर्लक्ष करून पुन्हा सहज आणि आनंदाने जगायचे जिंदगी ही तो है !

सतीश कुलकर्णी
9960796019

Group content visibility: 
Use group defaults