एखाद्याचे आयुष्य असावे तर ते हेमंत देसाई यांच्या आयुष्यासारखे असावे. नोकरी, प्रमोशन्स, लग्न, मुल सगळ वेळच्यावेळी. त्यांच्या आयुष्यात प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट सुरळीत पार पडली . कुठे काही व्यत्यय असा नाहीच. अतिशय संपन्न आणि सुखासीन जीवन त्यांनी व्यतीत केले. मागच्याच महिन्यात ते सन्मानाने रिटायर झाले. मात्र आत्ता आत्ता एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की आपण आपल्या मुलींच्या लग्नाबाबत गाफील राहिलो. हेमंतरावांना दोन्ही मुली होत्या. मोठी मिताली अतिशय सुंदर, अतिशय हुशार त्यामुळे तिचे लग्न हा चिंतेचा विषय होऊ शकतो असे त्यांना कधी वाटलेच नाही. पण झाले काय की सौंदर्य आणि हुशारी यामुळे तिला सतत स्तुतीच ऐकायची सवय झाली. तिचा स्वभाव काहीसा गर्विष्ट बनला. त्यातच तिला सिग्मा सिस्टिम्स या कंपनीत चांगल्या पोस्टवर जॉब मिळाला. त्यामुळे ती चांगलीच शेफारली. तिला बरीच स्थळ सांगून आली पण ती प्रत्येक स्थळात काहीतरी खुसपट काढायची. आपण सुचवलेली स्थळे ही नाकारतेय म्हटल्यावर नातेवाईकांनी स्थळे सुचवायचे कमी केले. बघता बघता ती तिशीच्या उंबरठ्यावर पोहोचली. त्यामुळे चांगला पगार मिळवणाऱ्या देखण्या मुलीचे लग्न जमविण्यातही काही समस्या असू शकते याची हेमंतराव आणि त्यांची पत्नी सुनंदा यांना प्रकर्षाने जाणीव झाली.
त्यांची दुसरी मुलगी अनघा हीसुद्धा दिसायला बरी अभ्यासात ठीक होती. तिची नुकतीच small figures या कंपनीत trainee programmer या पदावर नेमणूक झाली होती. ती आत्ता पंचविशीत होती. म्हणजे मितालीचे जमलेकी की पाठोपाठ तिचेही बघावे लागणार होते. पण ती खूप समंजस होती. मितालीसारखी ती चिकित्सक नव्हती .त्यामुळे कदाचित तिचे सहज जमून जाण्याची शक्यता होती. तिचा टीम लीडर निखील सुमंत तिला मनापासून ट्रेनिंग देत होता. तो जे शिकवत होता ते ती पटापट ग्रास्प करत होती. त्या दोघांची केमिस्ट्री छान जमली होती. दोन तीन महिन्याच्या निकट सहवासामुळे ते एकमेकाच्या प्रेमात पडले. निखील त्याच्या आईवडिलांचा एकुलताएक असल्याने त्यांना निखिलच्या लग्नाची घाई होती. प्रेमाची चाहूल लागल्यावर लगेचच त्याने तिला लग्नाबद्दल विचारले पण ती म्हणाली...
“थांब ना,एवढी काय घाई आहे?”
असेच आणखी थोडे दिवस ट्रेनिंग कम प्रणयाराधन करण्यात गेले. एकदा निखील तिला म्हणाला...
“तू लग्नाची टाळाटाळ का करतेस ? तुझ्या घरून आपल्या लग्नाला विरोध होईल असे वाटते का ?”
“अरे असे काहीही नाही. आपल्या लग्नाला माझ्या घरून सहज परवानगी मिळेल. पण अडचण एवढीच आहे की माझ्या दिदीचे अजून कुठे जमत नाहीय. अशा परिस्थितीत मी आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगितले तर ते मला लगेच लग्नाला परवानगी देतील. पण दिदीच्या आधी माझे लग्न होणे आम्हाला अडचणीचे होणार आहे. थोड थांब. बाबांची दिदीसाठी जोरात मोहीम चालू आहे.”
निखीलपुढे काही पर्यायच नव्हता. त्याने विचार केला थांबूया थोडे दिवस. ट्रेनिंग पूर्ण होताच अनघाला फिलिपिन्सला प्रोजेक्ट मिळाला. ती सहा महिन्यासाठी फिलिपिन्सला रवाना झाली. जाताना तिने निखिलला बजावले...
“मी आल्यावर आपण आपापल्या घरी सांगू .पण तो पर्यंत तू कुठे बोलू नको.”
इकडे हेमंतराव प्रत्येक परिचिताला मितालीसाठी स्थळ पाहायला विनवत होते. त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सुमन्तांचा मुलगा निखील याचे स्थळ सुचविले. हेमंतरावांनी त्याचदिवशी सुमान्तांची भेट घेऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चीत केला. दुसरे दिवशी सुमंत मॉर्निंगवॉकला गेले असताना त्यांनी सहज म्हणून गृपमध्ये देसायांची मुलगी सांगून आली आहे असे सांगून टाकले. त्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला “खरच तुमचा निखील फार समंजस आहे. ह !”
“अरे देसायांची मुलगी निखीलला दाखवायला येणार आहे यात त्याच्या समंजसपणाचा काय संबंध आहे”
“असे बघ, देसायांच्या मुलीवर निखीलचे प्रेम आहे. पण त्याने तसे न सांगता दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला. म्हणजे तुमचा मान राखण्यासाठीच त्याने असे केले ना ?”
“असे आहे का ? आम्हाला काहीच कल्पना नाही.”
शरदरावांना खरच खूप आनंद झाला. आता काय मुलगी पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे फक्त फॉरमॅलीटी होती. त्यांच्यावर काही जबाबदारी नव्हती.रिवाज म्हणून मुलगी पहायची आणि हो म्हणून मोकळे व्हायचे. पण मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमात निखील फार अलिप्त का वागतोय ते त्यांना कळेचना ? मग त्यांनीही आपल्याला काही कळलेच नाही असेच नाटक केले.
चहा पोह्याचा कार्यक्रम उरकून घरी येताच हेमंतरावांनी मितालीला विचारले...
“आता तुझी काही शंका कुशंका नाहीना ? होकार कळवू ना.?”
मिताली म्हणाली...
“अहो काय बाबा,? तो किती पोरकट वाटत होता.. त्याच्या तोंडून काही शब्द तरी फुटत होता का ? त्याला काही महत्वाकांक्षा असेल असे वाटत नाही. आणि माझ्यापेक्षा त्याचे पॅकेज दीड लाखांनी कमीच आहे. तरी मी होकार देवू का ?”
“मिताली आता तुझा शहाणपणा बास झाला. या स्थळात काही सुद्धा दोष नाही. माझ्या ओळखीतून स्थळ आलेले आहे. मी होकार कळवणार आहे.” हेमंतरावांनी असे निक्षून सांगितल्यवर मिताली गप्प झाली. दुसरे दिवशी पहाटे उठून देसाई कुटुंबीयांनी अनघाला फोन लावून सविस्तर वृत्त सांगितले. ती पण आनंदून गेली. बोलता बोलता हेमंतराव म्हणाले...
“अग,तो मुलगा तुमच्या small figures मध्येच आहे. कदाचित तुला माहित असेल.”
“काय नाव?”
“निखील सुमंत. आहे का माहित?”
अनघाच्या घशात आवंढा दाटून आला. स्व:तवर ताबा मिळवत ती म्हणाली...
“हो बाबा, आहे मला माहिती. फार चांगले आहेत ते. ठरवायला काही हरकत नाही.”
अनघाकडून दुजोरा मिळाल्याने देसाईमंडळी रीलॅक्स झाली . अनघाने बाबांचा फोन कट केला आणि लगेचच तिला निखिलचा फोन आला... “अग, इकडे फार गोंधळ झालाय. काल मला दाखवायला एक मुलगी आली होती. तिच्याशी बोलताना लक्षात आले की ती तुझी बहिण आहे. आता आपण गप्प राहून चालणार नाही. मी आज बाबांना सगळे सांगून टाकतो.”
“नाही. आपण आपले प्रेम आता मनाच्या कप्प्यात बंद करून टाकायचे. तू दिदीशी लग्न कर.”
“नाही मला नाही तिच्याशी लग्न करायचे. मी सरळ नकार देवून टाकणार आहे.”
“तू तिच्याशी लग्न केलेस तर मला खूप आनंद होईल. पण तू तिला नकार दिलास तरी मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाहीच.”
“अग, असा काय तुझा विचित्र हट्ट. आपण आपले प्रेम का नाही व्यक्त करायचे”
“दिदी म्हणजे आमच्या कुटुंबाचा जीव की प्राण. तिच्यापेक्षा मला काही महत्वाचे नाही”. अनघाने फोन कट केला. नंतरही निखिलने तिला फोन करायचा प्रयत्न केला. पण कधी “नो रिप्लाय” तर कधी...
“आता आपले प्रेम हा विषय माझ्यासाठी संपला आहे” -- असे उत्तर.
हेमंत देसाईनी मध्यस्थामार्फत होकार कळविला. मिताली हिच निखीलची प्रेयसी आहे असे समजून शरदरावांनी होकार देऊन टाकला. मितालीची मूक संमती घेऊन तिची लहर फिरायच्या आत देसाईनी साधेपणाने साखरपुडा उरकून घेतला. लग्न मात्र अनघा परत आल्यानंतर थाटामाटाने संपन्न झाले.
दरम्यानच्या काळात भिशीतल्या बायकांनी कांताबाईंचे बौद्धिक पूर्ण केले. या नोकरी करणाऱ्यां बायका काहीही काम करत नाहीत. चहा, नाश्ता, डबा सगळ आपल्यालाच कराव लागत हे सगळ त्यांच्या मैत्रिणीनी त्यांना समजावून सांगितलं होते. त्यामुळे कान्ताबाईनी मितालीकडून शून्य अपेक्षा ठेवल्या होत्या. पण मिताली सवाई निघाली. त्यांच्या शून्य अपेक्षाही ती पूर्ण होऊ देत नसे. उदाहरणार्थ सकाळी त्या चहा बनवत आणि गाळून घेण्याचे काम निखील किंवा शरदराव करीत. पण एखाद्या दिवशी ते दोघेही नसले तर ती टेबलावर थोडावेळ वाट पाहून सरळ निघून जात असे. पण आपला आपला चहा घेत नसे. किंवा तिला डबा न्यायचा नसेल तर ती तसे संगतही नसे. कान्ताबाईना वाटे ती डबा विसरली म्हणून त्या निखिलला तिच्यामागे डबा घेऊन पळवत. तेंव्हा समजे की तिला डबा नको आहे. कांताबाई दोघांचा डबा अतिशय काळजीपूर्वक तयार करत. तूप माखलेल्या पोळ्या, छोट्या डब्यात दही, सॅलड ,भाजीचे नवनवीन प्रकार असे सगळे निगुतीने दिलेले असे...
...पण मितालीने कधीच “डबा छान होता” असे उद्गार काढले नाहीत. एकदा त्यांनी विचारलेच...
“अग, मिताली तुला डबा आवडतो की नाही?”
ती शांतपणे उत्तरली...
“आमच्या कंपनी इथिक्सप्रमाणे मी माझ्या कलीग आणि ज्युनिअरसमवेत जेवणे अपेक्षित आहे. लंच अवरमध्ये सगळ्यांचे डबे असे टेबलावर मांडलेले असतात. प्रत्येकजण जे हवे ते बफे पद्धतीने वाढून घेतो. त्यामुळे तुम्ही डब्यात काय दिलंय ते मला माहित नसते.”
कांताबाईनी कपाळावर हात मारून घेतला. अशा अनेक कुरबुरी होत्या. आपल्याला खूप काम पडतंय म्हणून तिनेही थोडा भार उचलावा हे सागण्यासाठी त्या म्हणाल्या...
“वैतागले मी या दिवसभराच्या कामाने. मी एकटी काय काय करू?”
मिताली म्हणाली...
“तुम्ही काय करा. एकूण काम किती आहे ? ते वेगवेगळ्या टाईम स्लॉटमध्ये कसे विभागता येईल ? आपल्याकडे किती मॅनपॉवरचा आहे आणि किती हायर करावी लागेल या सगळ्याचा आढावा घ्या. कारण प्लानिंग न करता डॉन्की वर्क करण्याला काही अर्थ नाही.”
मितालीची ही मुक्ताफळे ऐकून कांताबाईंच्या मस्तकाची शीर उडायला लागली. तिला कसे प्रत्युत्तर द्यावे तेच त्यांना कळेना. त्या बेसिनवर गेल्या. त्यांनी तोंडावर गार पाण्याचे हबके मारून घेतले आणि त्या बेडरूमकडे गेल्या. असे अनेक प्रसंग होते. तिचे स्व:तला सुपेरीअर समजणे, शिष्ठपणे बोलणे त्यांना अजिबात सहन होत नसे. शरदराव या सगळ्या प्रकाराकडे भीष्माचार्याच्या तठस्थतेने पाहत असत त्यामुळे कांताबाईंचा अधिकच संताप होत असे. एकदा त्या मैत्रिणीबरोबर बाजारात गेल्या असताना त्यांना समजले की त्यांच्या अपार्टमेन्टपासून जवळच एक flat विकायला निघाला आहे. घरी आल्याआल्या त्यांनी शरदरावाना विचारले...
“अहो ,तुम्ही किती रक्कम उभी करू शकता.?”
“का ग ?”
“समोरच एक सेकंड सेलचा flat विकायला निघालाय. मालक ऐशी लाख म्हणतोय. थोडेफार कमी होतील”.
“अरे वा ! अगदी इतम्भूत माहिती काढलीस की ? पण दुसरा flat घेऊन करणार काय?”
“मला या बाईबरोबर एकत्र राहणे शक्य नाही. रात्री सगळे असताना तुम्ही विषय काढा .म्हणवे आम्ही जमतील तेवढे पैसे देतो बाकी तुम्ही लोन काढा.”
“बघूया.”
रात्री जेवणाच्या टेबलावर सगळे एकत्र होते तरी शरदरावांना विषय काढणे जमले नाहीच, मग कांताबाईंनीच वाईटपणा पत्करुन सुतोवाच केले. मिताली म्हणाली...
“पण आपल्याला दुसरा flat का हवाय?”
“अग, तुम्ही राजाराणी रहा की निवांत. कशाला ते एकमेकांच्या पायात पाय.”
“पण पुढच्या वर्षी तर आम्ही हॉन्गकॉन्गला जाणार आहोत. तिथे एक नवीन ट्रेनींगसेंटर सुरु होतंय. बहुधा कोऑर्डीनेटर म्हणून माझे पोस्टिंग होईल”.
निखिलला हे काहीच माहित नव्हत तो म्हणाला...
“पण मी हॉन्गकॉन्गला येऊन काय करणार ? आमच्या कंपनीचे तिथे क्लायान्टेल नाही.”
त्याच्या पाठीवत थोपटत ती म्हणाली...
“That is my look out. you need not worry for that.” कांताबाईना याच गोष्टीचा राग यायचा. सगळ परस्पर ठरवणारी ही कोण ?.
अनघा कारणपरत्वे सुमन्तांच्या घरी येत असे. तेंव्हा दोघींच्या वागण्यातला फरक सगळ्यांना जाणवे. ती कान्ताबाईशी खूप आपुलकीने वागे. चहा नाश्ता सर्व्ह करायला पुढे येई. एकदा ती म्हणाली...
“काकू तुमच्या एकटीवर कामाचा खूप लोड असेल ना ? तुम्ही एखादी मुलगी ठेवा तुम्हाला कामात मदत होईल आणि कंपनी पण होइल.”
अशा पद्धतीने ती त्यांच्याशी सुसंवाद करत असे.
कांताबाई शरदरावांना म्हणाल्या...
“तुम्ही नीट माहिती घेतली नाहीत. मित्राने अर्धवट माहिती दिली आणि त्यावर विसंबून तुम्ही चुकीचा निर्णय घेतलात. नाहीतर ही छान मुलगी माझी सून झाली असती”.
असेच दिवस व्यतीत होत होते. एके दिवशी रात्री दहा वाजले तरी मिताली घरी आली नाही. फोन लावण्याचा प्रयत्न केला तर फोन स्विच ऑफ लागला. मितालीला कधीही फोन करा एंगेज नाहीतर स्विच ऑफ हे ठरलेले. तिघांनी जेवण उरकले. नंतर निखीलने तिच्या कलीगला फोन लावला. तो म्हणाला...
“परदेशातले क्लायंट आले आहेत, त्यांच्या बरोबर चर्चा चालू आहे. म्हणून तिने फोन बंद ठेवला आहे मिटिंग नंतर सगळे जेवायला जाणार आहेत. त्यामुळे घरी यायला तसा उशीरच होइल. पण काळजी करू नका. तिला घरी सोडायला मी येणार आहे.”
हा निरोप मिळाल्यावर निखीलचे आई बाबा झोपायला गेले.निखील हॉलमध्ये काम करत बसला. रात्री एकच्या सुमारास ती आली. ते दोघे झोपायाला गेले.
पहाटे चारच्या सुमारास मितालीच्या पोटात दुखायला लागले. तीव्र वेदनांमुळे ती विव्हळत होती.त्यांची चाहूल लागून त्याची आई बाहेर आली तेंव्हा तो मितालीला गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसला. आठच्या सुमारास दोन्ही घरचे लोक हॉस्पिटलमध्ये जमले. एकेकजण तिच्या रुममध्ये जाऊन भेटून आला. ती कोणाशी काहीच बोलली नाही. नंतर तिचे बाबा डॉक्टरना भेटून आले पण त्यांनीही तिला काय झालय या बद्दल काहीच भाष्य केले नाही. बहुधा फूड पॉयझनिंग असावे. दोन दिवस ती नीपचितच होती. तीसरे दिवशी सायंकाळी तिने प्राण सोडले. सगळे जण एका विचित्र कोंडीत सापडले. ज्या देसाईना दु:खाची ओळख नव्हती त्यांच्यावर डोंगरच कोसळला. काही दिवस दु:खाच्या सावटाखाली गेले. नंतर निखिलचे सहकारी त्याला म्हणू लागले...
“तू अनघाला लग्नाबद्दल विचार. तुमच अधुरे प्रेम पूर्णत्वास न्यावे अशी नियतीचीच इच्छा असावी.”
अनघाच्या मैत्रिणीनी तिला तोच सल्ला दिला.. कांताबाईनी शरदरावांना तीच गळ घातली. एक दिवस शरदराव मनाचा हिय्या करून देसयांच्या घरी पोहोचले. त्यांना विषय काढायला जड गेले. पण हेमंतराव आणि सुनंदाने समजूतदारपणा दाखवला. शरदरावांच्या प्रस्तावाला होकार दिला.मग मात्र घटनांना वेग आला. साखरपुडा करूया का नको ? लग्न साधेपणाने करायचे की थाटात यांवर चर्चा सुरु झाल्या. हळू हळू लग्नाची खरेदी सुरु झाली. मुहूर्तही ठरला.
एके दिवशी सकाळी अनघा झोपून उठली आणि बेडवरून उतरताना तिला उभेच राहता येईना. पायातले त्राण गेल्यासारखे झाले. तिने ओरडून वडिलांना हाक मारली. शरदराव हबकून गेले. ते तिला घेउन हॉस्पिटलला आले. ती चार दिवस ऍडमिट राहिली. ढीगभर तपासण्या झाल्या, काहीही उपयोग झाला नाही. तिला घरातल्या घरात फिरायलाही व्हीलचेअरची गरज भासू लागली. कोणीतरी सुपर स्पेशालीस्टला दाखवयाला सुचविले. त्यांनी बऱ्याच तपासण्या केल्या. काहीही निदान झाले नाही. मग आयुर्वेदिक उपचार करण्याचे ठरले. दिवसामागून दिवस जात होते. काहीही निष्पन्न होत नव्हते. निखील म्हणाला ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करून घेऊ. त्यामुळे तिला बरे व्हायला मानसिक उभारी येइल. त्याचा हा प्रस्ताव कोणालाच पटला नाही. पण तो रोज तिला भेटायला येत होता.
शरदरावांच्या एका मित्राने डॉ. मुतालीकांना दाखवायचा सल्ला दिला. दवाखान्यात गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की डॉ. मुतालिक सायक्यारीस्ट आहेत. त्यांनी मित्राला फोन केला...
“अरे तू आम्हाला सायकियारिस्टकडे कशाला पाठ्विलेस ?. तिचा आजार मानसिक नाही”.
“तिचा आजार मानसिक नाही हे मलाही माहित आहे. पण मुतालिक आपल्याला काहीना काही गायडन्स देतील. तू त्यांचे कन्सलटेशन घे”.
काहीशा नाराजीनेच ते अनघाला व्हीलचेअर बसवून डॉक्टरांच्या केबिन गेले. डॉक्टरांनी तिला खूप सारी माहिती विचारली. तिच्या कॉलेजच्या दिवसापासून मितालीच्या मृत्यूपर्यंत सगळी माहिती त्यांनी खोदून खोदून विचारली. तासभर प्रश्नोत्तरे झाल्यावर ते म्हणाले...
“ उद्या निखिलला मला भेटायला सांगा. येतील ना ते. त्यांना एकट्याला पाठवा.”
“हो, हो. नक्की येइल तो.”
निखील जेंव्हा डॉक्टरना भेटायला निघाला तेंव्हा त्याची आई हट्टाने त्याच्या सोबत आली. कारण त्यांना अंदाज आला होता की डॉक्टर निखिलला अनघाशी लग्न करायला सांगणार आणि नैतिक जबाबदारी समजून तो लगेच हो म्हणणार. पण त्यांना ते मान्य नव्हते. त्यांनी निक्षून विरोध करायचे ठरविले. डॉक्टरांनी काही जुजबी प्रश्न विचारले आणि मग कळीचा मुद्दा काढला “निखील तुम्ही लवकरात लवकर लग्न करा”
कांताबाईनी तातडीने हस्तक्षेप केला...
“नाही डॉक्टर, त्याला गळ घालू नका. ती अशी अपंग असतांना आम्ही लग्न करून तिला स्वीकारणार नाही. बरी होऊ दे , पहिल्या मुहूर्तावर करू.”
“थांबा वाहिनी जरा नीट ऐका . मी त्यांना अनघाशी लग्न करायला सांगत नाहीय. तुमच्या पसंतीच्या दुसऱ्या कोणत्याही मुलीशी करा.”
“तसे असेल तर त्याला एक मुलगी सांगून आलेलीच आहे. एक आठवड्यात त्याचे लग्न होऊ शकेल”.
“लगेच कामाला लागा. पुढच्या अद्वाड्यात याचे लग्न झाले पाहिजे”
पडत्या फळाची आज्ञा घेऊन कांताबाई लगबगीने घरी आल्या. लगेचच त्यांनी त्या स्थळाला फोन करून पसंती कळविली. आणखी काही फाटे फुटायला नकोत म्हणून त्यांनी घाई गडबड करून पहिल्या मुहूर्तावर निखीलचे लग्न उरकले.
निखिलचे लग्न झाल्यानंतर आठवडाभारतच अनघाला बरे वाटायला लागले. ती पूर्वी सारखी हिंडाफिरायला लागली. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पण निखिलच्या लग्नाचा आणि अनघाला बरे वाटायचा काय संबंध हे काही लक्षात येत नव्हते.
डॉक्टर मुतालीकांचे आभार मानायला देसाई पतीपत्नी दवाखान्यात पोहोचले. तेंव्हा डॉक्टरांनी सगळा उलगडा केला...
“ अनघा ही एक संवेदनशिल मुलगी आहे. पण ती जरा जास्तच संवेदनशील आहे.over sensitive. जेंव्हा तुम्ही मंडळींनी तिचे निखिलशी लग्न ठरवले तेंव्हा वरकरणी ती लग्नाला तयार झाली पण तिचे अंतर्मन तिला खायला उठले. तिच्या sub conscious मनात विचार सुरु झाले -----------
‘म्हणजे बहिण गेल्याचा आपल्याला फायदाच झाला की. आपले प्रेम मिळावे म्हणून आपण ती मरायची वाट तर पाहत नव्हतो ना ?’
तर दुसरीकडे तिचे बाह्य मन तिला हे लग्न मोडू देत नव्हते. कारण मितालीशी लग्न करायला लावून निखीलवर आपण अन्याय केलाय त्याचे परिमार्जन करायचे आहे . या दोन्ही विचारांचा ताण तिला असह्य झाला. तिच्या मेंदूने तिला संदेश दिला की तू अपंग झालीस तर हे लग्न मोडेल पण त्याचा दोष तुझ्यावर येणार नाही. तिच्या अन्तरमनाने ते मान्य केले. त्याप्रमाणे तिच्या मेंदूने तिच्या पायावरचे नियंत्रण बंद केले. निखीलचे लग्न झाल्यावर ते नियंत्रण परत आले. इतक साध आहे हे गणित.”
मुलीवरच्या प्रेमाने देसायांच्या डोळ्यातून पाणी पाझरू लागले.
(समाप्त)
र.दि.रा.
यावर काय कमेंट करावी हेच सुचत
यावर काय कमेंट करावी हेच सुचत नाहीये.
@ अज्ञातवासी, लेख वाचून
@ अज्ञातवासी, लेख वाचून झाल्यावर पहिला विचार मनात तोच आला जो तुम्ही लिहिला !
वरील दोन्ही कमेंटशी सहमत!!
वरील दोन्ही कमेंटशी सहमत!!
फ़ेबु वर एक पेज आहे ..दवनिय
फ़ेबु वर एक पेज आहे ..दवनिय अन्डे.... त्या सदरात नक्की बसेल हि कथा.
तीन चार लेखकांनी मिळून
तीन चार लेखकांनी मिळून लिहिलंय असे वाटत आहे...
शेंट परशेंट दवणीय
शेंट परशेंट दवणीय
ओह बापरे
ओह बापरे
व्यवस्थित जिच्यावर प्रेम आहे तिच्याशीच लग्न केले असते तर पुढची ट्राजेडी वाचली असती.
शिवाय हे मुलाचे मुलीवर प्रेम आहे सांगणारे मित्र 'कोणती मुलगी' सांगत नाहीत आणि ऐकणारेही नाव विचारत नाहीत
आपल्याला माहीत नसताना त्या मुलाचे प्रेम मोठ्या बहिणीऐवजी त्याच कंपनीत असणाऱ्या लहान बहिणीवर असण्याची शक्यता जास्त हे कोणाही बापाला वाटलं असतं.
दवणीय अंड्याला पाठवा ही कथा
दवणीय अंड्याला पाठवा ही कथा
छान आहे कथा. मला आवडली.
छान आहे कथा. मला आवडली.
आधी मला आईना चित्रपट आठवला. जॅकी जुही आणि सैफच्या बायकोचा. पण नंतर कथानक भन्नाट वळले.
यावर पिक्चर बनेल
फक्त शेवट थोडा बदलावा लागेल.
हिरो दुसरया लग्नाचे नाटक करतो. हिरोईन बरी झाली की मग सगळे मिळून तिला समजावतात आणि तिचे गिल्ट दूर् करतात.
किंवा मग ती दुसरी नकली बयको त्याला मुद्दाम छळते जेणेकरून हिरोईनला नवीन गिल्ट येते की अरेरे आपणच याच्याशी लग्न करायला हवे होते. मग ते तिला खरे सांगतात..
मराठीत चित्रपट बनवल्यास
हिरो - स्वप्निल
हिरोईन - मुक्ता
मोठी बहीण - सई
किंवा मग ती दुसरी नकली बयको
किंवा मग ती दुसरी नकली बयको त्याला मुद्दाम छळते जेणेकरून हिरोईनला नवीन गिल्ट येते की अरेरे आपणच याच्याशी लग्न करायला हवे होते. मग ते तिला खरे सांगतात..
मराठीत चित्रपट बनवल्यास
हिरो - स्वप्निल
हिरोईन - मुक्ता
मोठी बहीण - सई
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 11 May, 2020 - 22:15
Pathetic reply .. kunach ky ni kunach ky.. attension seeking mode on.. on others thread also
आले आले ड्यू आयडी आले .
आले आले ड्यू आयडी आले . मराठीत टाईप नाही केला म्हणजे ओळखता येणार नाही का ड्यू आयडी .
आले आले ड्यू आयडी आले .
आले आले ड्यू आयडी आले . मराठीत टाईप नाही केला म्हणजे ओळखता येणार नाही का ड्यू आयडी .
नवीन Submitted by कटप्पा on 12 May, 2020 - 00:07
Mr. Kattppa .. why u r interfairing in this.. profile chek kara Ani nntr bola... Dok jra thikanavr thevun pratisad Dyaycha. Half knowledge is always like an uneducation ... Grow up
अरे ड्यू आयड्या . ज्या
अरे ड्यू आयड्या . ज्या हक्काने तू एखाद्याला pathetic reply म्हणतोय ना . त्याच हक्काने मी इंटरफियर करतोय .
ते जरा मराठीत लिहायचे मनावर घ्या अज्ञातवास , निदान स्पेलिंग तरी नीट टाका .
बाई दवे शुभ सकाळ .
अरे अभिषेका, जर एकदा त्या
अरे अभिषेका, जर एकदा त्या प्रोफाइल ला जाऊन चेक कर की. फेक की जेन्यून.
येड्यासारखं बरळत सुटायचं काहीही.
आजकाल जरा जास्तच हाय व्हायला लागला आहेस वाटत..
अब आया ना ओरिजिनल आयडी पे .
अब आया ना ओरिजिनल आयडी पे . उर्मिला उर्फ अज्ञातवास
आले आले ड्यू आयडी आले .
आले आले ड्यू आयडी आले . मराठीत टाईप नाही केला म्हणजे ओळखता येणार नाही का ड्यू आयडी .
अब आया ना ओरिजिनल आयडी पे . उर्मिला उर्फ अज्ञातवास
नवीन Submitted by कटप्पा on 12 May, 2020 - 00:07 excuse me .. mr katappa .. mi tumchshi boltana bhan rakhun bolat aahe .. tumhi mla ekeri sambodhan karaych adhikar mi tumhala nahi dila ahe.. mi ek guinine stree Id aahe .. krupaya samparkatun mail karun aapla email id or phone no dyava ... Mg tumhala divsa tare dakhvte.. belapur gavat rahate mi ... Je khar nav aahe na .. tyanech I'd aahe maz .. himmat asel na tr tuzya original I'd be reply or mail kr.. Jr yapudhe kahi bolalat tr police complaint kren ..
ईथेही सुरु
ईथेही सुरु
ईथेही सुर
ईथेही सुर
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 May, 2020 - 12:25
To whom you are pointing mr. Runmesh
Dear all maybolikr.. ek prove
Dear all maybolikr.. ek prove zalay ki runmesh katappa ha ekch aahe.. Karan yala bolle ki tikdun dhur nighto ... And finally he is sick mentality person.. I think tyana Schizophrenia zalay ... If he suppose to get well soon he should meet good phychiatrist.. let's hope he will get well soon..
Some more information pls read
Schizophrenia is a serious mental disorder in which people interpret reality abnormally. Schizophrenia may result in some combination of hallucinations, delusions, and extremely disordered thinking and behavior that impairs daily functioning, and can be disabling. People with schizophrenia require lifelong treatment.
ओरिजिनल आयडी ने मराठीत लिही
ओरिजिनल आयडी ने मराठीत लिही मग वाचेन .
र. दि . रा. उगाच तुमच्या सुंदर धाग्यावर गोंधळ घालतायत हे . त्यांच्या वतीने मी माफी मागतो . मायबोलीवर स्वागत .
ओरिजिनल आयडी ने मराठीत लिही
ओरिजिनल आयडी ने मराठीत लिही मग वाचेन .
र. दि . रा. उगाच तुमच्या सुंदर धाग्यावर गोंधळ घालतायत हे . त्यांच्या वतीने मी माफी मागतो . मायबोलीवर स्वागत .
नवीन Submitted by कटप्पा on 12 May, 2020 - 15:38
Katappa tu na bindok Ani murkh aahes.. I exit this conversation .. tuza nadala lagle tr lok mla pn tuzasarkh samjtil .. carry on .. waiting for get together of mayboli .. khup lokanche gairsamaj dur hotil .. mala kalat nahi pn tu nakki kontya tondane yeshil .. murkha
कटप्पा फ्रॉफाईलवर फोटो लावला
कटप्पा फ्रॉफाईलवर फोटो लावला की तो ओरिजिनल आयडी होतो हा मायबोलीचा नियम तुम्हाला माहीत नाही का?
असले लोक खरंच असतात का ? एवढे
असले लोक खरंच असतात का ? एवढे अविचारी निर्णय घेणारे ? प्रियकर वगैरे बाजूला ठेवू . एका मुलीच्या बहिणीचं एका मुलाशी लग्न ठरत आहे पण तिला माहीत आहे की त्याचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे तर तिने तोंड मिटून गप्प राहणं ही शहाणपणाची गोष्ट आहे का .... " जर लग्न होऊनही त्या मुलाला बहिणीबाबत प्रेम निर्माण झालंच नाही तर " ही बेसिक शक्यता ही शिकलीसवरलेली मुलगी ध्यानात घेत नाही ?
बरं कुठला शहाणा मुलगा प्रेयसीने नकार जरी दिला तरी लगेच तिच्या मोठ्या बहिणीशी लग्न करून मोकळा होईल ? लग्न ही एवढी घाईघाईत उरकायची गोष्ट आहे ? अरेंज्ड मॅरेज जे करतात त्यांचं ठीक आहे , प्रेमविवाहासाठी योग्य व्यक्तीची भेट झाली नाही , योग जुळून आला नाही म्हणून ती वाट निवडतात .. पण जिच्यावर प्रेम आहे आणि जिचंही आपल्यावर प्रेम आहे अशी व्यक्ती आयुष्यात असताना , तिच्या बहिणीशी संसार करायला कोणता मॅच्युअर मुलगा तयार होईल ? स्वतःच्या आयुष्याचे एवढे महत्वाचे निर्णय क्षुल्लक फालतू परिस्थितीच्या अधीन होऊन लोक घेऊ शकतात की लग्न ही तेवढी महत्वाची गोष्ट वाटतच नाही ? ही नाही तर ती काय फरक पडतो ...
कुठलाही हुशार मुलगा अशा परिस्थितीत वेळीच गैरसमज दूर करेल , तोंडाला कुलूप लावून गोष्टी नको तेवढ्या पुढे जाऊच देणार नाही .. कुठलीही मॅच्युअर मुलगी , आपलं प्रेम वगैरे काही एवढं महत्वाचं नाही तू दिदीशी लग्न कर असला मूर्ख पवित्रा घेणार नाही .. आणि चुकून घेतलाच तर हुशार मुलगा ठीक आहे मला तुझ्या दिदीशी लग्न करायचं नाही म्हणून तिथेच ते प्रकरण निकालात काढेल ... 2 - 4 वर्षात दिदीचं लग्न होईल किंवा प्रेयसीचा निर्णय बदलण्याची खूप शक्यता असेल ... प्रेयसीच्या सुज्ञ आईवडिलांशी बोलून सगळे गैरसमज दूर केले तर ते तिला समजावतील आणि 2 - 4 वर्षंही थांबावं लागणार नाही ..
एखादी मुलगी सेम परिस्थितीत प्रियकराच्या भावाशी लग्न करून संसाराला तयार होईल असं वाटतं का ? ज्या मुलीवर प्रेम आहे , तिच्या बहिणीला पत्नी म्हणून स्वीकारणं हे माझ्यातरी आकलनशक्तीच्या पलीकडंचं आहे ... आणि हे जर एखाद्या मुलाला शक्य असेल तर ते प्रेम नाहीच , वयात आल्यावर सुटेबल जोडीदार शोधण्याच्या प्रयत्नातून जन्माला आलेलं आकर्षण आहे फक्त .. at least in my eyes
असे म्हणता स्ट्रेन्जर . मग मी
असे म्हणता स्ट्रेन्जर . मग मी पण इंटरनेट वरून रॅन्डम फोटो घेऊन लावतो प्रोफाईल ला .
waiting for get together of mayboli .. khup lokanche gairsamaj dur hotil
--> ड्यू आयडी चा गेट टुगेदर म्हणजे आटोपलाच कारभार . आभासी गेट टुगेदर . प्रमुख पाहुणे अज्ञात . बाकी सगळे त्यांचेच ड्यू आयडी . मला पण बोलवा . मी पण ड्यू आयडी आहे ना .
मला पण बोलवा . मी पण ड्यू
मित्रांनो एक विनंती आहे सर्वांना एखादा कथेचा वा जेन्युईन धागा डुआय चर्चांनी खराब करू नका.
चर्चा मजेशीर असेल तर मलाही मजा येते. खोटे का बोला.
पण धागाही तसाच टाईमपास असेल तर त्यातच काय तो गोंधळ घाला.
कथा काहीच्या काही आहे.
कथा काहीच्या काही आहे. इंग्लिश सॉरी मिंग्लिश मधून धमाल टाईमपास चालला आहे. दवे बाई इथेही आहेत
Katappa tu na bindok Ani
Katappa tu na bindok Ani murkh aahes.. I exit this conversation .. tuza nadala lagle tr lok mla pn tuzasarkh samjtil .. carry on .. waiting for get together of mayboli .. khup lokanche gairsamaj dur hotil .. mala kalat nahi pn tu nakki kontya tondane yeshil .. murkha
>>> लोल ... हा धागा कसा मिसला होता.....
छान कथा आहे...
छान कथा आहे...
... पण निखिलच्या लाईफ ची वाट लागली.
बाळबोध कथा आहे. एक अनघा मुर्ख
बाळबोध कथा आहे. एक अनघा मुर्ख असु शकते, निखिल ला हि कुणाही गाढवी शी लग्न लावले तरी चालतय की.
जाम च दवणिय!
निखिल ला हि कुणाही गाढवी शी
निखिल ला हि कुणाही गाढवी शी लग्न लावले तरी चालतय की.
>>>>
मोठी बहिण जास्त हुशार आणि सुंदर होती.
Pages