लाँकडाऊनमध्ये असेही काम
लाँकडाऊनमध्ये सारेच कमीजास्त प्रमाणात भरडले जात आहे.शेतकऱी,कष्टकरी,मजूर वर्ग यांना ही झळ जास्त जाणवत आहे. परंतु अशा संकट काळात संधी वाट शोधत असते. आर्थिक संकटात सापडलेल्या सांगलीतल्या एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला कोकणातील गोरेगाव शाळेचे मुख्याध्यापक मदतीसीठी धावून आले. आपला मित्रपरिवार तसेच समाज माध्यमातून त्यांनी प्रसार केल्याने रायगड जिल्ह्यामध्ये या शेतक-यांने तब्बल 14 हजार किलो द्राक्षांची विक्री केली.त्यामुळे या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळले. या काळात अशी अनेक उदाहरणे पुढे येत आहेत.सांगायचे तात्पर्य प्रसिध्दी नसुन कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अनेक लहावसहान व्यवसायाला सामान्य माणूस मदत करु शकतो हा आहे. लहान-मोठे व्यवसायिक पूर्ण डबघाईस गेले आहेत. तर अनेकांना अन्नधान्य मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार केलेले पीक कुठे विकायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांची पिके शेतामध्येच कुजून जात आहेत. अशाच प्रकारे सांगली जिल्ह्यातील पलूस मधील सुधीर पाटील हे शेतकरीही द्राक्ष फिरवल्यानंतर त्याची विक्री कशी करायची या मोठ्या विवंचनेने मध्ये होते.त्यांनी केवळ द्राक्षेच पिकवलेली असल्यांने द्राक्षाचे नुकसान त्याचे आयुष्य उध्वस्त करणारे ठरले असते .परंतु त्यांच्या मदतीला मूळ सांगलीतील परंतु रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील ना.म.जोशी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले राजेंद्र पवार हे देवदूतासारखे धावून आले .राजेंद्र पवार यांनी आपला मित्र परिवार,सामाजिक संस्था शिक्षक,पोलिस,सरकारी कर्मचारी वर्ग तसेच व्हाट्सअँप वर फेसबुकच्या माध्यमातून या शेतकऱ्याला त्याची द्राक्षे विकत घेऊन आर्थिक मदत करावी असे आवाहन केले,केवळ यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी विक्री सुविधाही उपलब्ध केली. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, गोरेगाव, पाली ,रोहा व कोलाड याठिकाणी या शेतका-याची द्राक्षे विक्री होईल अशी सोय ही केली. त्यासाठी प्रत्येकाला शेतकऱ्याचा फोन नंबर दिला. त्यामुळे द्राक्षाची गाडी किती वाजता कोणत्या ठिकाणी येणार आहे याची ग्राहकाला माहिती मिळाली. कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळून ही द्राक्ष विक्री करण्यात आली. स्वतः राजेंद्र पवार यांच्या घरी चार दिवस वस्ती करून या शेतकऱ्यांनी तब्बल 14 हजार किलो द्राक्षे या भागात विकली. ही विकत असताना पाच किलो द्राक्षे केवळ दोनशे रुपयात विकून त्यांनी ग्राहकांनाही दिलासा दिला आपत्ती परिस्थितीमध्ये कोणतीही भाववाढ करुन ग्राहकांना लूटले नाही. त्यामुळे त्यांची द्राक्षे सहज संपली. यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टळले. आज कोकणातील आंबा तसेच इतर फळे व भाज्या यांचे दर आटोक्यात आणून असा प्रयत्न शेतक-यांनी करायला हवेत.
,,,,,,,,,,,,,,,,,
लाँकडाऊनमध्ये असेही काम
Submitted by sunil patkar on 27 April, 2020 - 06:24
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा छान.. पवारांनी खरच खूप छान
वा छान.. पवारांनी खरच खूप छान प्रकारे मदत केली.
Very good.. keep it up.
Very good.. keep it up. Inspirational messages.
उत्तम कार्य
उत्तम कार्य
गुलमोहर - प्रकाशचित्रण मधून हा धागा योग्य ठिकाणी हलवायला हवा
वा... टाळ्या.
वा... टाळ्या.
उत्तम कार्य !
उत्तम कार्य !
छान. फेसबुक, व्हॅटसअपचा योग्य
छान. फेसबुक, व्हॅटसअपचा योग्य वापर.