सुलभा सुब्रमण्यम हे समुपदेशनाच्या क्षेत्रातील एक सर्वांना परीचित आणि आदरणीय असलेले नाव. काही वर्षापूर्वी त्यांच्या एल ओ सी ग्रुपला भेट देऊन एक लेख लिहिला होता. तो अनेकांना आवडला. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून काही विषयांवर एक लेखमाला तयार करावी असे मनात होते. त्यावेळी ते जमले नाही. यावेळी ते जमवावे म्हणतो. लॉकडाऊनच्या काळात माणसाच्या मानसिक आरोग्याचा कस लागणार हे नक्की. ही बाब सर्वसामन्यांच्या बाबतीत जर खरी असेल तर आमच्या व्यसनी रुग्णमित्रांचे काय? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी ही लेखमाला सुलभाताईंच्या मदतीने सुरु करीत आहे. सुलभाताई काही एक मुद्दा घेऊन येथे मार्गदर्शन करणार आहेत. व्यसनी रुग्णमित्र, व्यसनमुक्तीच्या पथावर चालणारी मंडळी, त्यांचे सहचरी कुटुंबिय आणि व्यसनाशी संबंध नसलेल्यांनाही उपयुक्त अशीही लेखमाला होईल अशी आमची अपेक्षा आहे.
सुलभाताईंनी मार्गदर्शन करण्यास पटकन होकार दिला याबद्दल त्यांचे सर्वप्रथम खुप खुप आभार. ही लेखमाला प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात असेल. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य लोकांबरोबर व्यसनी माणसांची ससेहोलपट होताना दिसते आहे. अशावेळी घरातल्या घरात मोबाईल, इंटरनेट यांचे व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही व्यसने जर असतील तर त्यांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. इतर व्यसने मिळणे दुरापस्त झालेआहे. त्यामुळे विथड्रॉल, चीडचीड आणि इतर काही मानसिक लक्षणे दिसत असतील. अशावेळी काय करता येईल याबाबत ही लेखमाला मार्गदर्शन करेल.
अतुल ठाकुर
सुलभाताई स्वतः मैत्र हेल्पलाईनच्या फेसबुकपेजवर लिहित असतात. त्याचेही आपल्याला नियमित वाचन करता येईल. त्याची लिंक देत आहे.
https://www.facebook.com/Maitra-Emotional-Distress-Helpline-229722830395368